Birdev Done IPS: आमचा बिरदेव साहेब झाला... मेंढपाळाच्या पोरानं UPSC ची तयारी कशी केली?

Birdev Done IPS Interview: कोल्हापूरच्या मेंढपाळाच्या मुलाने यूपीएससी परीक्षा क्रॅक केली आहे. बिरदेव डोणेने यूपीएससी परीक्षेची तयारी कशी केली? हे जाणून घ्या.
Birdev Done IPS
Birdev Done IPSSaam Tv
Published On

कोल्हापूरच्या बिरदेव डोणे (Birdev Done IPS) यांनी यूपीएससी परीक्षा क्रॅक केली आहे. मेंढपाळाचा मुलगा हा आता आयपीएस होणार आहे. बिरदेवच्या या यशाने त्याच्या कुटुंबियांना खूप आनंद झाला आहे. त्याच्या या कामगिरीमुळे देशातील अनेक तरुणांना प्रेरणा मिळाली. बिरदेव याने प्रचंड मेहनत, यशाच्या जोरावर हे यश मिळवलं आहे. बिरदेव याने यूपीएससी परीक्षेची तयारी कशी केली याबाबत एका मुलाखतीत माहिती दिली आहे.

Birdev Done IPS
Farmer Success Story : १५ एकरातून तब्बल ७० टन डाळींब उत्पादन; सतरा वर्षीय शेतकऱ्याचा यशस्वी प्रयोग, वर्षाला १ कोटीहून अधिक उत्पन्न

बिरदेवने यूपीएससी परीक्षा पास करण्यासाठी खूप मेहनत केली. त्याने एप्रिल २०२१ पासून यूपीएससी परीक्षेची तयारी सुरु केली होती. त्याने सांगितले की माझ्या मित्राच्या आजोबांचे एक विद्यार्थी होते, अजित शाह त्यांनी मला खूप मदत केली. त्यांनी एका फोनवर दिल्लीत यूपीएससीचे क्लासेस लावण्यासाठी २ लाख ३५ हजार रुपये पाठवून दिले. दिल्लीमध्ये क्लास लावण्याचे मुख्य कारण म्हणजे मला २-३ वर्षे सेल्फ स्टडी करुनदेखील मला यश मिळाले नाही तर त्यावेळीच दिल्लीत क्लासेस लावते असते तर बरं झालं असतं, असं वाटायला नको म्हणून क्लास लावले.

पैसे जमा करता येतात पण वेळ नाही मिळवता येत- बिरदेव

बिरदेव याचं आयुष्यात काहीतरी मोठं होण्याचं स्वप्न होतं. त्याच्या मते, पैसे हे जमा करता येतात. परंतु वेळ परत येत नाही. त्यामुळे आयुष्यात पुढे कधीच पश्चात्ताप होईल, असं वाटायला नको म्हणून त्याने दिल्लीत क्लासेस लावले.हातातली वेळ एकदा गेली की गेलीच, असं त्याचं मत आहे. त्यामुळे त्याने वेळेचं सोनं केलं आणि यूपीएससी परीक्षा दिली.

Birdev Done IPS
UPSC Success Story : लय बळ आलं...! वडील प्रिंटिंग प्रेसमध्ये तर आई गृहिणी; क्लासेस न लावता सृष्टी UPSC परीक्षेत उत्तीर्ण!

यूपीएससी परीक्षेची तयारी कशी केली? (Birdev Done UPSC Preparation)

बिरदेवने २०२२ मध्ये पहिल्यांदा यूपीएससी परीक्षा दिली होती. त्या परीक्षेत यश मिळालं नाही. २०२२ जानेवारी मध्ये त्यांची मावशी वारली त्यानंतर आजोबांचंदेखील निधन झालं. त्यांच्या अंत्यसंस्कारासाठीही बिरदेवला येता आलं नाही. यातून माणूस खूप काही शिकतो. त्याला या घटनांमधूनच अजून स्ट्राँग बनवलं आणि पुढे जाण्यासाठी प्रेरित केले.

दोनदा यूपीएससीत अपयश

बिरदेवने २०२३ मध्ये पुन्हा यूपीएससी (UPSC) परीक्षा दिली. cse आणि forest ची मेन्स दिली होती. त्याची मेन्स फक्त ३ मार्कांनी क्लिअर झाली नव्हती. त्याच्या दोन्ही मित्रांची मेन्स क्लिअर झाली. २०२४ मध्ये पुन्हा मी यूपीएससी परीक्षा दिली. ऑक्टोबरमध्ये परीक्षा क्लिअर झाल्याचे समजले. डिसेंबर महिन्यात माझा इंटरव्ह्यू होता.फक्त एका महिन्यातच त्याने इंटरव्ह्यू क्लिअर केला. मित्रांच्या मदतीने इंटरव्ह्यूसाठी मदत केली. शूज कसे घालायचे पासून ते घड्याळ घालायचे नाही या सर्व गोष्टी मी शिकलो.

Birdev Done IPS
Success story: माझी आई, माझे कान आणि आवाज आहे! कर्णबधीर असूनही जिद्दीच्या जोरावर रत्नाकर यांनी गाठलं यशाचं शिखर

UPSC इंटरव्ह्यूची तयारी कशी केली? (Birdev Done IPS Interview)

२०२० मध्ये पोस्टात नोकरी केली होती. पुण्यातून इंजिनियरिंग केले. तिथेही मला चांगले गुण होते. या सगळ्यांसाठी मीनी मॉक्स घेतले होते. त्यामुळे त्याला इंटरव्ह्यूसाठी खूप मदत झाली. एका सरांनी मला खूप मदत दिली. प्रश्नांची उत्तरे कशी द्यायची, याबाबत सर्व माहिती मला सरांनी दिली.

५ जानेवारीपर्यंत बिरदेव हा कोल्हापूरलाच होता.वडिलांची सर्जरी होती. वडिलांची सर्जरी झाल्यानंतर बिरदेव हा दिल्लीला गेला. १५ दिवसांनी इंटरव्ह्यू होता.त्यामुळे दिल्लीला जाऊन मॉक टेस्ट दिल्या.

Birdev Done IPS
Success Story: सहावीत फेल; हार नाही मानली; कोणत्याही कोचिंग क्लासेसशविाय पहिल्याच प्रयत्नात UPSC क्रॅक; IAS रुक्मिणी रियार यांचा प्रवास

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com