Home Buying Tips: बायकोच्या नावावर घर खरेदी केल्यावर मिळतात जबरदस्त फायदे; होते लाखो रुपयांची बचत

Benefits of Purchasing Home On Wife Name: घर खरेदी करण्याचे स्वप्न पाहणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. जर तुम्ही घर खरेदी करत असाल तर बायकोच्या नावावर करा. त्यामुळे तुम्हाला टॅक्समधून सूट मिळते.
Home Buying Tips
Home Buying TipsSaam Tv
Published On

प्रत्येकाचे स्वतः चे घर घेण्याचे स्वप्न असते. सध्या मुंबई-पुण्यासारख्या शहरात महागाई खूप वाढत आहे. त्यामुळे घराच्या किंमतीही खूप वाढत आहे. यामुळे घर खरेदी करायचे की नाही असा प्रश्न सर्वसामान्यांना पडलेला आहे. तुम्ही जर बायकोच्या नावावर घर खरेदी केले तर तुम्हाला टॅक्समध्येही बचत करता येईल. याचसोबत तुमचेही पैसे वाचतील.

Home Buying Tips
MHADA Lottery : कल्याण-ठाण्यात हक्काच्या घराचं स्वप्न पूर्ण होणार, जुलैमध्ये ४००० घरांची लॉटरी निघणार, वाचा सविस्तर

घर खरेदी करताना अनेकदा लोन घ्यावे लागते. त्याचसोबत घर खरेदी करताना रजिस्टर चार्ज, स्टॅम्प ड्यूटी आणि इतर अनेक खर्च असतात. अशा परिस्थितीत तुम्ही बायकोच्या नावावर घर घेऊन पैशांची बचत करु शकतात. बायकोच्या नावावर घर खरेदी करण्याचे फायदे जाणून घ्या.

जर तुम्ही घरातील स्त्रीच्या नावावर घर खरेदी केले तर तुम्हाला टॅक्समध्येही सूट मिळेल. याचसोबत २ लाख रुपयांचीही बचत करता येणार नाही.

कलम 80C अंतर्गत टॅक्स सूट

जर तुम्ही कोणत्या महिलेच्या नावावर घर खरेदी करतात आणि त्यांच्या नावावर होम लोन घेतात तेव्हा इन्कम टॅक्सपासून सूट मिळते.

कलम 80C अंतर्गत ही सूट दिली जाते. यामध्ये होम लोनच्या प्रिंसिपल रीपेमेंटवर १.५ लाख रुपयांची सूट मिळणार आहे. ही टॅक्स सूट मिळणार आहे. ही टॅक्स सूट या महिलांनाच मिळणार आहे जे लोक पतीसोबत संपत्तीचे मालक आहेत.

कलम 24 (B) अंतर्गत अतिरिक्त टॅक्स सूट

होम लोनच्या व्याजावरदेखील टॅक्स सूट मिळते. ही कर सूट कलम 24 (B) अंतर्गत असते. यामध्ये तुम्हाला दिलेल्या व्याजावर २ लाख रुपयांपर्यंत टॅक्स डिडक्शन मिळतो. जर तुम्ही तुमच्या बायकोच्या नावावर घर खरेदी करता तेव्हा तुम्हाला २ लाखांपर्यंत सूट मिळते.

Home Buying Tips
ITR Filling: उशिरा आयटीआर फाइल केल्यास किती दंड भरावा लागतो? वाचा सविस्तर

स्टॅम्प ड्युटी कमी लागते

भारतातील अनेक राज्यांमध्ये महिलांच्या नावावर घर खरेदी केल्यावर स्टॅम्प ड्युटीमधून सूट मिळते. जवळपास १ ते २ टक्के सूट दिली जाते. जर तुम्ही ५० लाखांचं घर खरेदी केले असेल आणि तुमच्या राज्यात स्टॅम्प ड्युटी ७ टक्के असेल. अशा परिस्थितीत तुम्हाला ३.५ लाख रुपये स्टॅम्प ड्युटी द्यावी लागते. जर तुम्ही महिलांच्या नावावर घर खरेदी केले तर ५०,००० ते १ लाख रुपयांची बचत करु शकतात.

सब्सिडी आणि सरकारी योजना

भारत सरकारने महिलांसाठी अनेक योजना राबवल्या आहेत. यामध्येही तुम्हाला सूट मिळू शकते. प्रधानमंत्री आवास योजनेत जर महिलेच्या नावावर घर असेल तर सब्सिडी मिळते.

Home Buying Tips
ITR Filling: आयटीआर फाइल करताना ही कागदपत्रे महत्त्वाची, नसेल तर अडचणी येतील, लिस्ट वाचा

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com