Bank Holidays In May 2024: मे महिन्यात इतके दिवस राहणार बँका बंद; आजच यादी बघा

List of Bank Holidays In May 2024: मे महिना सुरु व्हायला अवघे काही दिवस उरले आहेत. मे महिन्यात बँका किती दिवस बंद असणार आहे याची यादी समोर आली आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने दिलेल्या यादीनुसार मे महिन्यात जवळपास १२ दिवस बँका बंद राहणार आहेत.
List of Bank Holidays
List of Bank HolidaysSaam Tv

Bank Holidays In May 2024

मे महिना सुरु व्हायला अवघे काही दिवस उरले आहेत. मे महिन्यात बँका किती दिवस बंद असणार आहे याची यादी समोर आली आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने दिलेल्या यादीनुसार मे महिन्यात जवळपास १२ दिवस बँका बंद राहणार आहेत.

आजकाल सर्व कामे ऑनलाइन होतात. परंतु काही कामांसाठी अनेकांना बँकेत जावे लागते. जर तुमचेही बँकेत काही काम असेल तर ही यादी नक्की बघून जा. मे महिन्यात इंटरनेट बँकिग सेवा चालू राहणार आहे.

List of Bank Holidays
Old VS New Tax Regime: जुन्या की नव्या कोणत्या कर प्रणालीने तुमचा टॅक्स वाचेल, जाणून घ्या

मे महिन्यात बँका या दिवशी बंद राहतील

  • १ मे- महाराष्ट्र दिवस/ कामगार दिन (१ मेला बेलापुर, बेंगळुरु, चैन्नई, गुवाहाटी, हैदराबाद, आंध्र प्रदेश, तेलंगणा, इंफाळ, कोची, कोलकत्ता, मुंबई, नागपूर, पणजी, पटना, तिरुवनंतपुरम या राज्यात बँका बंद राहणार आहेत.)

  • ५ मे- रविवार (रविवारी सर्व राज्यातील सर्व बँका बंद राहणार आहेत.)

  • ८ मे- रविंद्रनाथ टागोर जयंती (यानिमित्त कोलकत्तामधील सर्व बँका बंद राहणार आहेत.)

  • १० मे- बसव जयंती/ अक्षय तृतीया (यानिमित्त बेंगळुरुमधील सर्व बँका बंद राहणार आहेत.)

  • ११ मे- दुसरा शनिवारी (सर्व बँका बंद राहणार आहेत.)

  • १२ मे- रविवार

  • १६ मे- राज्य दिवस (यानिमित्त गंगटोक येथील सर्व बँका बंद राहतील.)

  • २० मे - लोकसभा निवडणूक (यानिमित्त बेलापूर आणि मुंबईतील सर्व बँका बंद राहतील.)

  • २३ मे- बुद्ध पोर्णिमा (यानिमित्त आगरतळा, बेलापूर, भोपाळ, चंदीगड, देहराडून, जम्मू, कोलकत्ता, लखनऊ, मुंबई, नागपूर, नवी दिल्ली, रायपूर, रांची, शिमला, श्रीनगर येथील सर्व बँका बंद राहतील. )

List of Bank Holidays
Zomato Platform Fee: झोमॅटोचा ग्राहकांना मोठा झटका; प्रत्येक ऑर्डरमागे मोजावे लागणार अधिकचे पैसे, 'ही' सेवा केली बंद

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com