हवामान विभागाने दिलेला अंदाज खरा ठरवत आज अवकाळी पावसाने पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणाला अक्षरश: झोडपून काढल. अनेक ठिकाणी रस्त्यांवर झाडं उन्मळून पडली, त्यामुळे वाहतूक ठप्प झाली होती. तर काही ठिकाणी ऐन उन्हाळ्यात पाणी आल्यामुळे गावांचा संपर्क तुटलेला पहायला मिळाल. वीड अंगावर पडून एका ८ वर्षांच्या मुलीचाही दुर्दैवी मृत्यू झाला आहे. मका आणि काढणीला आलेल्या पिकांना अवकाळी पावसाचा मोठा फटका बसला आहे, मात्र उष्णतेमुळे हैराण झालेल्या नागरिकांना आणि प्राण्यांना हवेत गारवा निर्माण झाल्यामुळे काहीसा दिलासा मिळाल्याचं पहायला मिळालं.
शहरातील विविध ठिकाणी झाडे उन्मळून पडली आहेत. त्यात सिडको एन-३, शहानुरवाडी, बीड बायपास, मयूरबन कॉलनी उस्मानपुरा आणि पंचवटी या भागांचा समावेश आहे. पंचवटी येथे झाड कोसडल्याने त्याच्याखाली चार ते पाच जण अडकले होते त्यांना सुखरूप बाहेर काढण्यात आलेले आहे, अशी माहिती संबंधित विभागातर्फे प्राप्त झाली आहे.
दक्षिण सोलापूर तालुक्यातील मुस्ती गावात मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे. अंगावर विज पडून ८ वर्षांच्या चिमुकलीचा मृत्यू झाला आहे. लावण्या हनुमंता माशाळे असं या मुलीचं नावं असून हळहळ व्यक्त होत आहे.
सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोटमध्ये अवकाळी पावसाचा तडाखा बसला आहे. जवळपास दीड तासांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे नदीनाल्यांना पाणी आली आहे. नाल्याला अचानक पाणी आल्यामुळे अक्कलकोट तालुक्यातील बासलेगाव -गरोळगी या दोन गावांचा संपर्क तुटला आहे. पिकांचंही मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे.
उत्तर पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यात अवकाळी पावसाला सुरुवात झाली आहे. खेड तालुक्यातील चाकण, आळंदी, भोसे, शेलपिंपळगाव, काळुस, बहुळ आणि दावडी परिसरात अवकाळी पावसामुळे काही ठिकाणा फटका बसला आहे तर काही ठिकाणच्या पिकांना याचा फायदा होणा आहे. अवकाळी पावसामुळे उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला आहे.
दक्षिण रायगडमध्ये वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाच्या सरी बरसल्या, तर दक्षिण रायगडला पावसाने झोडपून काढलं आहे.धाराशिव जिल्ह्यातील उमरगा, लोहारा,नळदुर्ग,तुळजापूर,धाराशिव व कळंब,परंडा परिसरात पावराची जोरदार बॅटींग सुरू आहे. या फळबागांना मोठा फटका बसला आहे. लातूर जिल्ह्यात आज झालेल्या गारपिटीने निलंगा, औसा, रेनापूर, लातूर या भागातील आंबा फळबागांना मोठा फटका आहे. जिल्ह्यातल्या
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.