Bank Holiday: सलग तीन दिवस बँका बंद; तुमच्या शहरात कधी असणार सुट्टी? जाणून घ्या संपूर्ण माहिती

RBI Holiday List : बँका शेवटच्या आठवड्यात सलग ३ दिवस बंद राहण्याची शक्यता आहे. तुमच्या शहरातल्या सुट्ट्या, RBI चे वेळापत्रक आणि सरू राहणाऱ्या डिजिटल बँकिंग सेवांची माहिती जाणून घ्या.
Bank Holiday October 24–26
Bank Holiday October 24–26saam tv
Published On: 

बँकेत महत्त्वाचं काम असेल, तर शाखेत जाण्याआधी सुट्ट्यांचं वेळापत्रक तपासणं आवश्यक आहे. २४ ते २६ ऑक्टोबरदरम्यान काही शहरांमध्ये बँकांच्या शाखा सलग तीन दिवस बंद राहणार आहेत. त्यामुळे चेक जमा करणं, पैसे काढणं किंवा इतर शाखेशी संबंधित कामांचं नियोजन करताना ग्राहकांना सुट्ट्यांची माहिती जाणून घ्यावी.

२४ ऑक्टोबरला बँका बंद का?

भारतीय रिझर्व्ह बँकेच्या (RBI) नियमानुसार, प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी बँकांना सुट्टी असते. त्यामुळे २४ ऑक्टोबर हा चौथा शनिवार असल्यामुळे बँकांच्या शाखा बंद राहतील. त्यानंतर २५ ऑक्टोबरला रविवार असल्यामुळे देशभरातल्या बँकांना साप्ताहिक सुट्टी असेल.

Bank Holiday October 24–26
EPFO Rules: निवृत्तीनंतर PF वर व्याज मिळतं की नाही? जाणून घ्या महत्त्वाचा नियम

या शहरांमध्ये सलग तीन दिवस बँकां बंद

२६ ऑक्टोबर रोजी काही शहरांमध्ये स्थानिक सण आणि विशेष दिवसांमुळे बँकांच्या शाखांना सुट्टी असेल. अगरतळा, बेंगळुरू, चंदीगड, जम्मू, शिमला आणि श्रीनगर या शहरांचा त्यात समावेश आहे. या दिवशी लक्ष्मीपूजा, जम्मू-काश्मीर विलीनीकरण दिन आणि महर्षि वाल्मीकी जयंती यांसारख्या स्थानिक सुट्ट्यांमुळे संबंधित भागातल्या बँकांचं कामकाज बंद राहू शकते. मात्र, सुट्टीचं कारण आणि लागू असलेली तारीख शहरानुसार वेगवेगळी असू शकते. त्यामुळे ग्राहकांनी RBI च्या अधिकृत बँक सुट्टीच्या यादीतून आपल्या शहराची माहिती तपासावी.

Bank Holiday October 24–26
DA Hike : खुशखबर! केंद्रीय कर्मचाऱ्यांना दिवाळीपूर्वी मिळणार मोठी भेट, DA मध्ये 3% वाढीबाबत महत्त्वाची अपडेट

बँका बंद असताना कोणत्या सेवा सुरू राहतील?

बँकांच्या शाखांना सुट्टी असली, तरी बऱ्याच डिजिटल बँकिंग सेवा सुरू राहतात. ग्राहक पुढच्या सेवांचा वापर करू शकतात.

UPI व्यवहार - ऑनलाइन पैसे पाठवणे आणि स्वीकारणे.

मोबाइल व इंटरनेट बँकिंग - खात्यातील शिल्लक तपासणे आणि पात्र ऑनलाइन व्यवहार करणे.

ATM सेवा - उपलब्धतेनुसार पैसे काढणे आणि इतर सुविधांचा तुम्ही लाभ घेऊ शकता. पण, चेक क्लिअरन्स, शाखेतून होणारी कामं आणि काही विशिष्ट व्यवहारांना सुट्ट्यांमुळे उशीर होऊ शकतो. त्यामुळे बँकेत जाण्याआधी सुट्ट्यांचं वेळापत्रक तपासा आणि शक्य असेल तर महत्त्वाची कामं आधीच पूर्ण करा. तुमच्या शहरातल्या बँकेची अचूक सुट्टी जाणून घेण्यासाठी RBI ची अधिकृत माहिती पाहणं सर्वात योग्य ठरेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com