Bajaj Pulsur N160 And N150: डॅशिंग लूक, पॉवरफुल इंजिन; दोन नवीन पल्सर भारतात लॉन्च; कमी किंमतीत जबरदस्त फीचर्स

Bajaj Pulsur :बजाज कंपनी ही ऑटोमोबाईल क्षेत्रात अग्रेसर आहे. कंपनीची पल्सर सीरीज ग्राहकांमध्ये चांगली ओळख निर्माण केली आहे. कंपनीने नुकतीच Pulsur N160 आणि N150 मॉडेल लाँच केले आहे.
Bajaj Pulsur
Bajaj PulsurSaam Tv

Bajaj Pulsur N160 And N150 Price Features:

बजाज कंपनी ही ऑटोमोबाईल क्षेत्रात अग्रेसर आहे. कंपनीची पल्सर सीरीज ग्राहकांमध्ये चांगली ओळख निर्माण केली आहे. कंपनीने नुकतीच Pulsur N160 आणि N150 मॉडेल लाँच केले आहे. कंपनीची ही बाईक आकर्षक लूक आणि फीचरसह लाँच केली आहे. (Latest News)

किंमत

कंपनीची Pulsur N160 बाईकची किंमत १,३०,५६० रुपये आहे. तर Pulsur N150 बाईकची किंमत १,१७,६७७ आहे.

कंपनीची Pulsur N160 बाईक काळा, लाल आणि निळ्या रंगामध्ये उपलब्ध आहे. तर Pulsur N150 बाईक काळ्या आणि पांढऱ्या रंगामध्ये उपलब्ध आहे. या नवीन बाईकची रचना Pulsur N250 सारखीच आहे.

कंपनीच्या या दोन्ही कारमध्ये नवीन तंत्रज्ञानासह संपूर्ण डिजिटल इन्स्ट्रुमेंट LCD क्लस्टप मिळतो. हा नवीन क्लस्टर डेडिकेटेड बजाज राइटसह कनेक्टेड अॅपला ब्लूटूथ कनेक्टिव्हिटिला सपोर्ट करते. नवीन बाईकमध्ये डाव्या स्विचगियरसह एक नवीन बटण देण्यात आले आहे.

Bajaj Pulsur
Google Map: गुगल मॅपवरुन तुमचा डेटा चोरीला जाऊ शकतो? या पद्धतीने डिलीट करा हिस्ट्री

Pulsur N160 आणि N150 मध्ये उपलब्ध असलेली ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी रायडर्संना अॅपशी कनेक्ट करते. यामुळे कॉल घेणे किंवा कॉल कट करणे, मोबाईल नोटिफिकेशन अलर्ट, बॅटरी लेव्हल याची माहिती मिळते. याशिवाय गियर पोझिशन इंडिकेटर, इन्स्टंट फ्लुएल इकोनॉमी आणि अॅव्हरेज फ्लुएल इकोनॉमी फीचर देण्यात आले आहे.

या नवीन बाईकमध्ये बॉडी पॅनेल, इंधनाची टाकी, हेडलॅम्प असेंब्ली देण्यात आली आहे. Pulsur N160 मध्ये 164.82cc DTS-i इंजिन देण्यात आले आहे. जे 15.8bhp पॉवर आणि 14.65Nm टॉर्क जनरेट करते. हे इंजिन 45km/l मायलेज देऊ शकते. तर Pulsur N150मध्ये 149.68cc इंजिन देण्यात आले आहे. जे 14.3bhp पॉवर आणि 13.5Nm टॉर्क जनरेट करते.

Bajaj Pulsur
Challan : गुगल मॅप वाचवेल तुमचा भुर्दंड; कार चालकांनो 'या' खास फीचर्सची आहे का माहिती?

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com