Ayushman Bharat Yojana: ५ लाखांपर्यंत मोफत उपचार, कोणत्या हॉस्पिटलमध्ये घेता येणार उपचार; पाहा लिस्ट

Ayushman Bharat Yojana Hospitals List: केंद्र सरकारने आयुष्मान भारत योजना सुरु केली आहे. आयुष्मान भारत योजनेअंतर्गत नागरिकांना ५ लाखांपर्येत मोफत उपचार दिले जातात.
Ayushman Bharat Yojana
Ayushman Bharat YojanaSaam Tv
Published On

केंद्र सरकारने नागरिकांसाठी आयुष्मान भारत योजना सुरु केली आहे. आयुष्मान भारत योजनेअंतर्गत गरीब कुटुंबातील नागरिकांना ५ लाखांपर्यंत मोफत उपचार मिळतात. यासाठी आयुष्मान कार्ड बनवले जाते. केंद्र सरकारच्या या योजनेचा लाभ घेऊन नागरिक मोफत उपचार करु शकतात.

आयुष्मान भारत योजनात आतापर्यंत कोट्यवधी लोकांना फायदा झाला आहे. या योजनेअंतर्गत आयुष्मान कार्ड बनवले जाते.हे कार्ड तुम्ही हॉस्पिलमध्ये द्यायचे आहे. त्यानंतर थेट हॉस्पिटलमध्ये पैसे जमा होणार आहेत. या योजनेत तुम्ही कोण-कोणत्या हॉस्पिलमध्ये उपचार घेऊ शकता, याची यादी जाहीर केली जाते.

Ayushman Bharat Yojana
Post Office Scheme: पोस्ट ऑफिसची जबरदस्त योजना! दर महिन्याला मिळणार ९००० रुपये; कसं? जाणून घ्या

रुग्णालयांची नावे कशी चेक करायची?

  • तुम्ही तुमच्या जिल्ह्यातील कोणत्याही रुग्णालयात आयु्ष्मान योजनेअंतर्गत उपचार घेऊ शकतात, हे ऑनलाइन पद्धतीने चेक करु शकतात.

  • या योजनेत तुमच्या जिल्ह्यातील रुग्णालये चेक करण्यासाठी सर्वप्रथम www.pmjay.gov.in या वेबसाइटला भेट द्यावी लागेल.

  • यानंतर तुम्हाला Empanelment Type या ऑप्शनवर क्लिक करावे लागेल. यानंतर PMJAY यावर क्लिक करावे लागेल. यानंतर कॅप्चा कोड टाकावा लागेल.

  • यानंतर स्क्रिनवर दिलेल्या जिल्ह्यांमध्ये तुमचा जिल्हा सिलेक्ट करा. यानंतर हॉस्पिटलची लिस्ट तुमच्यासमोर येईल.

  • या योजनेतील लिस्टेड हॉस्पिटलमध्ये तुम्ही उपचार घेऊ शकतात.याचसोबत तुम्ही कोण- कोणत्या आजारांवर उपचार घेऊ शकतात, हेदेखील तुम्हाला समजेल.

  • आयुष्मान कार्ड दाखवून तुम्ही कॅशलेस उपचार घेऊ शकतात.

Ayushman Bharat Yojana
Post Office Scheme: सरकारचा मोठा निर्णय! पोस्ट ऑफिसच्या या योजनेत आता व्याज मिळणार नाही, तुम्हीही केली होती का गुंतवणूक?

७० वर्षांवरील नागरिकांना मोफत उपचार

आयुष्मान भारत योजनेअंतर्गत आता ७० वर्षांवरील नागरिकांनादेखील मोफत उपचार मिळणार आहे. याआधी फक्त ६५ वयापर्यंत नागरिकांना ५ लाखांपर्यंत मोफत उपचार दिले होते. त्यानंतर आता ७० वर्षांवरील नागरिकदेखील मोफत उपचार मिळवू शकतात. सध्या ७० वर्षांपेक्षा जास्त वयोगटातील नागरिकांना आयुष्मान कार्ड दिले जात आहेत.

Ayushman Bharat Yojana
PMJAY Scheme: 5 लाख रुपयांचा विमा मोफत कसा मिळणार? जाणून सर्व प्रक्रिया

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com