Pregnancy Health: गर्भधारणेदरम्यान स्तनाच्या कर्करोगाचा उपचार सुरक्षित आहे का?

Breast Cancer Treatment During Pregnancy: महिलांमध्ये स्तनाचा कर्करोग सर्रास होत आहे. भारतातील महिलांमध्ये होणाऱ्या सर्व कर्करोगांपैकी २८.२ टक्के स्तनाचा कर्करोग होतो. पण गरोदरपणात स्तनाचा कर्करोग होणे खूप आव्हानात्मक असतो. गरोदपणात कर्करोगाचा उपचार केल्याने गर्भाला हानी होऊ शकते.
Breast Cancer in pregnent woman
Pregnancy HealthYandex
Published On

स्तनाचा कर्करोग हा एक आजार आहे जो सामान्यतः स्त्रियांमध्ये दिसून येतो. मात्र, योग्य वेळी हा आजार ओळखता आला तर त्यावर उपचार करणे शक्य आहे. अनेक अभिनेत्रींवर यशस्वी उपचारही झाले असून आज त्या पूर्णपणे सुरक्षित आहेत. मात्र, गर्भवती महिलांमध्ये उपचार करणे आव्हानांनी भरलेले असू शकते. कारण या काळात मातेचे तसेच गर्भाचे संरक्षण करणे अत्यंत गरजेचे असते. अशा स्थितीत प्रश्न पडतो की, गर्भवती महिलेसाठी स्तनाच्या कर्करोगावर उपचार करणे कितपत सुरक्षित आहे आणि त्यामुळे गर्भाला हानी पोहोचू शकते का?

इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चच्या आकडेवारीनुसार, भारतातील महिलांमध्ये होणाऱ्या सर्व कर्करोगांपैकी २८.२ टक्के स्तनाचा कर्करोग होतो. तथापि, गर्भधारणेदरम्यान स्तनाचा कर्करोग खूप आव्हानात्मक आहे. हा आजार साधारणपणे ३२ ते ३८ वयोगटातील महिलांना होतो.

गरोदरपणात स्तनांमध्ये होणाऱ्या बदलांमुळे कर्करोग सहजासहजी समजत नाही. कारण या काळात स्तनाला सूज येते. तसेच, ते दुधाने भरलेले असल्याने, गुठळ्या शोधणे कठीण होऊ शकते. याशिवाय गरोदर महिलांनी एक स्तन दुस-यापेक्षा मोठा दिसतो की नाही हेही पाहणे आवश्यक आहे. तसे असल्यास त्यांनी त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

Breast Cancer in pregnent woman
History of Tea: 'चहा' भारतात कधी आणि कसा पोहोचला तुम्हाला माहिती आहे का?

गर्भधारणेदरम्यान स्तनाचा कर्करोग उपचार

उपचाराचा कोर्स रुग्णाच्या इच्छेवर अवलंबून असतो की तिला गर्भधारणा चालू ठेवायची आहे की नाही. उदाहरणार्थ, जर स्त्री गर्भधारणेच्या सुरुवातीच्या टप्प्यात असेल आणि तिचे कुटुंब पूर्ण झाले असेल, तर ती गर्भधारणा संपुष्टात आणणे निवडू शकते. साधारणपणे, गर्भधारणेदरम्यान स्तनाच्या कर्करोगावर तीन मुख्य मार्गांनी उपचार केले जाऊ शकतात. ते खालीलप्रमाणे आहेत-

१. शस्त्रक्रिया

गर्भवती महिलेसाठी शस्त्रक्रिया हा सर्वात सामान्य आणि सुरक्षित उपचार पर्याय असू शकतो. यामध्ये स्तनाचा प्रभावित भाग काढून टाकला जातो. ऑपरेशन दरम्यान गर्भाला कोणताही धोका नसतो.

२. केमोथेरपी

केमोथेरपीचा वापर स्तनाच्या कर्करोगावर उपचार करण्यासाठी केला जातो, परंतु गर्भवती महिलेसाठी काही जोखीम असू शकतात. पहिल्या तिमाहीत केमोथेरपी गर्भासाठी धोकादायक असू शकते, कारण या काळात अवयव विकसित होत आहेत. तथापि, तिसऱ्या तिमाहीत उपचार केल्यास त्याचे परिणाम कमी होऊ शकतात.

३.रेडिएशन थेरपी

गर्भधारणेदरम्यान रेडिएशन टाळण्याचा सल्ला दिला जातो. रेडिएशनच्या प्रभावामुळे गर्भाच्या विकासावर नकारात्मक परिणाम होतो, ज्यामुळे मानसिक आणि शारीरिक समस्या उद्भवू शकतात.

Breast Cancer in pregnent woman
Liver Health: हे '४' पेय करतात यकृतावर गंभीर परिणाम ; तुम्हीही करता का या पेयांचे सेवन, वेळीच व्हा सावध

गर्भाला संभाव्य धोके

गर्भधारणेदरम्यान स्तनाच्या कर्करोगावर उपचार केल्यास गर्भाला काही धोके होऊ शकतात.  केमोथेरपी आणि रेडिएशन गर्भाच्या अवयवांच्या विकासावर परिणाम करू शकतात आणि काही प्रकरणांमध्ये गर्भपात देखील होऊ शकतो. त्याचबरोबर गर्भवती महिलांना दिल्या जाणाऱ्या औषधे आणि उपचारांमुळे गर्भाला धोका निर्माण होऊ शकतो.

गर्भवती महिलांमध्ये स्तनाच्या कर्करोगाची कारणे

कौटुंबिक इतिहास

उशीरा गर्भवती होणे

दीर्घकाळ स्तनपान करण्यास असमर्थता

हार्मोनल बदल

स्थिती आणि वय

Edited by - Archana Chavan

टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

Breast Cancer in pregnent woman
Health: घसादुखीमुळे होऊ शकतात ५ धोकादायक आजार, चुकूनही दुर्लक्ष करु नका, अन्यथा...

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com