प्रत्येकजण आपल्याकडे रोख रक्कम ठेवत नाही. जेव्हा रोख रक्कमेची गरज असते. तेव्हा एटीएममधून काढतात. एटीएममधून पैसे काढणे खूप सोपे आहे. रोज बँकेत जाऊन पैसे काढण्यापेक्षा एटीएमचा वापर करणे जास्त सोयीस्कर आहे. मात्र, आता एटीएममधून पैसे काढण्यासाठी तुम्हाला जास्त शुल्क भरावे लागणार आहे.
एटीएममधून पैसे काढताना काही ठरावीक रक्कमेपर्यंत तुम्हाला पैसे काढण्यासाठी कोणतेही शुल्क लागत नाही. परंतु मर्यादेपेक्षा जास्त पैसे काढले तर तुम्हाला शुल्क भरावे लागते. हेच शुल्क आता वाढणार असल्याचे सांगण्यात येत आहे. एटीएम ऑपरेटर्सने रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडे एटीएममधून पैसे काढण्यावर दिले जाणारे इंटरचेंज शुल्क वाढण्यासाठी संपर्क साधला आहे. मनी कंट्रोलने याबाबत माहिती दिली आहे.
एटीएम ऑपरेटर्स आणि सीएटीएमआयने एटीममधून पैसे काढण्यासाठी प्रत्येक ट्रान्झॅक्शनला २३ रुपये शुल्क आकारावे, असे सांगितले आहे. दोन वर्षांपूर्वी इंटरचेंज शुल्क वाढवण्यात आले होते. हे दर वाढवून २१ रुपये करण्यात यावी, असे CATMI चे म्हणणे आहे. तर एटीएम ऑपरेटर्सनी हे शुल्क २३ रुपये करण्याची मागणी केली आहे.
गेल्यावेळी इंटरचेंज फी वाढवण्यासाठी खूप वर्षाचा कालावधी लागला. परंतु यावेळी इंटरचेंज फी वाढवण्यासाठी सर्वजण आग्रही आहेत, असे एटीएम ऑपरेटर्सने सांगितले. २०२१ मध्ये एटीएम व्यव्हरांवरील इंटरचेंज शुल्क १५ रुपयांवरुन वाढवून १७ रुपये करण्यात आले होते. एटीएम कार्ज ज्या बँकेचे आहे. त्या बँकेले हे पैसे दिले जातात.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.