Government Scheme For Electricty: आता लाईटबिलचं नो टेन्शन, मनसोक्त वापरा वीज; केंद्र सरकाराच्या 'या' योजनेसाठी असा करा अर्ज

PM Surya Ghar Mofat Vij Yojana: राबवल्या आहेत. यातील एका योजनेअंतर्गत नागरिकांना मोफत वीज मिळते.
Government Scheme For Electricty: आता लाईटबिलचं नो टेन्शन, मनसोक्त वापरा वीज; केंद्र सरकाराच्या 'या' योजनेसाठी असा करा अर्ज
PM Surya Ghar Muft Bijli YojanaSaam TV

सरकार नागरिकांसाठी वेगवेगळ्या योजना राबवत असतात. नागरिकांना कमी पैशात चांगल्या सुविधा मिळवून देण्यासाठी सरकारच्या अनेक योजना आहेत. त्यातील एक म्हणजे पीएम सूर्य घर योजना. पीएम सूर्य घर योजनेअंतर्गत केंद्र सरकार नागरिकांना ३०० युनिट मोफत वीज देते. त्यामुळे नागरिकांचा खर्च वाचतो. तसेच केंद्र सरकार ७८००० रुपयांपर्यंतचे अनुदानही देते.

केंद्र सरकारने पीएम सूर्य घर- मोफत वीज या योजनेअंतर्गत १ कोटी घरांमध्ये सौर पॅनेल बसवणार आहे. या योजनेत नागरिकांनी अर्ज केले आहे. या योजनेत ३०० युनिट मोफत वीज मिळते. त्याशिवाय घरावर सौर पॅनेज बसवण्यासाठीही सरकार खर्चावर सवलत देते. सौर पॅनेलच्या क्षमतेनुसार, सरकार १८००० ते ७८००० रुपयांपर्यंत सूट देते.

केंद्र सरकारच्या मोफत वीज योजनेअंतर्गत, एक किलोवॅटचे सौर पॅनल बसवण्यासाठी खर्चावर १८ हजार रुपये अनुदान देते. तर दोन किलोवॅटच्या खर्चावर जवळपास ३० हजार रुपये अनुदान देते. तुमच्या सोर पॅनेलच्या किलोवॅटनुसार अनुदानाची रक्कम ठरवली जाते. आतापर्यंत या योजनेचा लाभ अनेक नागरिकांनी घेतला आहे.

या योजनेत तुम्ही ऑनलाइन अर्ज दाखल करु शकता. तुम्ही https://pmsuryaghar.gov.in या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन अर्ज भरु शकता. याचसोबत तुम्ही तुमच्या जवळच्या पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन नोंदणी करु शकता.

Government Scheme For Electricty: आता लाईटबिलचं नो टेन्शन, मनसोक्त वापरा वीज; केंद्र सरकाराच्या 'या' योजनेसाठी असा करा अर्ज
Gold Silver Price Down : सोन्यासह चांदीचा भाव पुन्हा उतरला; वाचा मुंबई-पुण्यातील आजचे दर

सर्वप्रथम तुम्हाला पोर्टलवर नोंदणी करावी लागेल. त्यानंतर तुमचे राज्य आणि विज वितरण कंपनी निवडा. यानंतर वीज ग्राहक नंबर, मोबाईल नंबर आणि ई- मेल आयडी टाकावा. ही माहिती भरल्यानंतर तुम्ही ग्राहक नंबर आणि मोबाईल नंबरसह लॉग इन करा. त्यानंतर रुफटॉप सोलरसाठी अर्ज करा. यानंतर Discom कडून व्यवहार्यता मंजुरीची प्रतिक्षा करा. त्यानंतर व्यवहार्यता मंजूर मिळाल्यावर तुमच्या डिस्कॉमधील कोणत्याही विक्रेत्याकडून प्लांट स्थापित करा.

यानंतर सोलर इन्स्टॉलेशन पूर्ण झाल्यावर प्लांटची माहिती सबमिट करा. नेट मीटरसाठी अर्ज करा. नेट मीटर बसवल्यानंतर डिस्कॉमद्वारे तपासणी केली जाते. त्यानंतर तुम्ही पोर्टलवरुन कमिशनिंग प्रमाणपत्र तयार करु शकता. कमीशनिंग प्रमाणपत्र मिळाल्यानंतर पोर्टलद्वारे बँक खात्याचे तपशील आणि चेक सबमिट करा. यानंतर तुम्हाला ३० दिवसांच्या आत सबसिडी मिळेल.

Government Scheme For Electricty: आता लाईटबिलचं नो टेन्शन, मनसोक्त वापरा वीज; केंद्र सरकाराच्या 'या' योजनेसाठी असा करा अर्ज
Vegetable Price High : भाज्यांचे दर वाढल्याने सामान्यांना फुटला घाम; फरसबी, वाटाण्यासह दोडक्याचे दर १०० पार

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com