

आता कार्डशिवाय काढता येणार एटीएममधून पैसे
एटीएम पासवर्ड विसरलात तरी काढता येणार पैसे
एटीएममधून पैसे काढण्यासाठी ही प्रोसेस करा फॉलो
प्रत्येकाचे बँक अकाउंट हे असते. बँक अकाउंटमधून पैसे काढताना अनेकजण एटीएमचा वापर करतात. अवघ्या काही मिनिटांत एटीएममधून पैसे काढता येतात. अनेकदा आपण रोख रक्कम स्वतः जवळ ठेवत नाही.त्यामुळे जवळपास एटीएम दिसल्यावर पैसे काढतो. परंतु अनेकदा डेबिट कार्ड विसरतो किंवा पासवर्डदेखील विसरतो. अशावेळीदेखील तुम्हाला पैसे काढता येणार आहेत.
फोन पे स्कॅनरद्वारे काढता येणार पैसे
तुम्हाला फोन पे स्कॅनरद्वारे एटीएममधून पैसे काढता येणार आहेत. यामुळे तुम्हाला खूप फायदा होणार आहे. अनेकदा एटीएमबाहेर असलेले चोरटे तुमची फसवणूक करतात किंवा एटीएम मशीनमधून हात घालून पैसे काढतात. कार्डचीदेखील अदलाबदल करतात त्यामुळे अशा परिस्थिती सावध राहायचे आहे. यामुळे तुम्हील एटीएम कार्ड नसतानाही पैसे काढू शकतात.
ही प्रोसेस करा फॉलो
सुरुवातीला डेबिट कार्ड किंवा क्रेडिट कार्ड हा ऑप्शन निवडावा लागेल. यानंतर किती रक्कम काढायची ते टाकावे लागेल. यानंतर तुम्हाला पिन निवडताना खाली स्कॅनरचा ऑप्शन दिसेल. त्यावर क्लिक केल्यावर स्कॅनर ओपन होईल. हा मोबाईलच्या स्कॅनवर स्कॅन करा. यानंतर तुमची रक्कम तुम्हाला काढता येणार आहे.
अनेकदा एटीएमचा पासवर्ड लक्षात राहत नाही. यावेळी तुम्ही बँक खात्याशी लिंक असलेल्या मोबाईल नंबरवरुन नवीन पासवर्ड तयार करता येतो. गुगलवर बँकेचे नाव टाकून वेबसाइटवर जाऊन पिन तयार करु शकतात. यामुळे तुम्हाला कोणतीही अडचण येणार नाही. ही प्रोसेस एकदम सोपी आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.