APY Scheme: म्हातारपणी पैशांची समस्या सोडवा! केवळ २५० पेक्षा रुपये जमा करुन घ्या महिना एवढ्या रुपयांच्या पेन्शनचा लाभ

Atal Pension Yojana : अटल पेन्शन योजनेचा लोक मोठ्या प्रमाणात लाभ घेतात.
Atal Pension Yojana
Atal Pension YojanaSaam Tv
Published On: 

Atal Pension Yojana Benefits : प्रत्येकालाच आपलं आयुष्य हे सुरक्षित आणि आरामदायी हवे असते. प्रत्येकजण आपल्या भविष्यासाठी तरतुदी करत असतात. निवृत्तीनंतर त्या पैशांनी त्यांचे आयुष्य सुरक्षित होते. त्यासाठी सरकारच्या अनेक योजना उपलब्ध आहेत. त्यातील अटल पेन्शन योजनेचा लोक मोठ्या प्रमाणात लाभ घेतात.

निवृत्तीनंतर पेन्शन हा एक आर्थिक आधार असतो. यासाठी तुम्ही अटल पेन्शन योजनेत गुंतवणूक केल्यास तुम्हाला फायदेशीर ठरेल. या योजनेत तुम्ही दर महिन्याला काही रक्कम जमा करु शकतात. निवृत्तीनंतर १००० ते ५००० पर्यंतच्या मासिक पेन्शनचा लाभ तुम्ही घेऊ शकता.

Atal Pension Yojana
International Dog Day 2023 : कुत्रा पाळा आणि आयुष्यातील ताणतणाव पळवा, कसे ते पाहा

प्रत्येकजण आपल्या कमाईतून काही रक्कम बचत करण्याचा प्रयत्न करतात. ही रक्कम योग्य ठिकाणी गुतंवणूक करू इच्छितात. आज अनेक योजना आहेत ज्यात तुम्ही गुंतवणूक करु शकतात. परंतु त्यातील अटल पेन्शन योजना ही लोकप्रिय आहे. ही योजना निवृत्तीनंतर तुम्हाला आर्थिकदृष्ट्या सक्षम करते.

५ कोटींहून अधिक लोकांनी केली गुंतवणूक

२०१५-१६ मध्ये सरकारने अटल पेन्शन योजना सुरू केली. पगादारांना नेहमी नियमित उतपन्न मिळावे हा यामागचा उद्देश आहे. या योजनेचा फायदा म्हणजे जे लोक कोणत्याही प्रकारच्या सरकारी पेन्शनचा लाभ घेऊ शकत नाही. त्यांना या योजनेत गुंतवणूक करुन उत्पन्नाची खात्री करु शकता. या योजनेच खूप लोकांनी गुंतवणूक केली आहे. या योजनेत आतापर्यंत ५ कोटींहून अधिक लोक सामील झाले आहेत.

Atal Pension Yojana
Raksha Bandhan Gift Ideas : रक्षाबंधनला हे स्वस्तात मस्त बजेटफ्रेंडली गिफ्टस देऊन बहिणींना करा खुश

निवृत्तीनंतर ताण नाही

निवृत्तीनंतर पेन्शन हा सर्वात मोठा आर्थिक आधार असतो. त्यासाठी अटल पेन्शन योजनेत गुंतवणूक करणे फायदेशीर आहे. दर महिना काही रक्कम गुंतवणूक करुन निवृत्तीनंतर तुम्ही १००० ते ५००० पर्यंतच्या मासिक पेन्शनचा लाभ घेऊ शकता. यामध्ये गुंतवणकीसाठी १८ ते ४० वर्षांची वयोमर्यादा आहे. दरमहा 5,000 रुपये पेन्शन मिळविण्यासाठी, तुम्हाला APY योजनेमध्ये दरमहा 210 रुपये गुंतवावे लागतील. 

वयाची मर्यादा

या योजनेअंतरगत खाते उघडण्यासाठी काही अटी आहेत. गुंतवणूक करणारी व्यक्ती भारताची नागरिक असणे आवश्यक आहे. अर्जदाराचे नाव १८ ते ४० वर्षांच्या दरम्यान असावे. त्याच्याकडे त्याचे बँक खाते असणे आवश्यक आहे. ते आधार कार्डाशी जोडलेले असायला हवे. याशिवाय मोबाईल नंबर असायला हवा. याआधी अटल पेन्शनचा लाभार्थी नसावा. यामध्ये गुंतवणूक करण्यासाठी कालावधी २० वर्षांचा निश्चित करण्यात आला आहे.

Atal Pension Yojana
Petrol Diesel Price Today (26 August): कुठे स्वस्त तर कुठे महाग; तुमच्या शहरातील आजचे पेट्रोल-डिझेलचे दर तपासले का?

गेल्या वर्षी नियमात बदल

गेल्या महिन्यात या योजनेत बदल केला होता. सरकारच्या नियमानुसार आयकर भरणारे या योजनेचा लाभ घेऊ शकत नाही. हा बदल १ ऑक्टोबर २०२२ पासून लागू करण्यात आला आहे. अटल पेन्शन योजनेत गुंतवणूक करणाऱ्यांना आयकरमध्ये विशेष तरतूद आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.