Raksha Bandhan Gift Ideas : रक्षाबंधनला हे स्वस्तात मस्त बजेटफ्रेंडली गिफ्टस देऊन बहिणींना करा खुश

Raksha Bandhan 2023 : भाऊ बहिणीच्या नात्याला साजरा करण्याचा दिवस म्हणजे रक्षाबंधन. रक्षाबंधनाला बहिण भावाला ओवाळते.
Raksha Bandhan Gift Ideas
Raksha Bandhan Gift Ideas Saam Tv
Published On

Raksha Bandhan Ideas : भाऊ बहिणीच्या नात्याला साजरा करण्याचा दिवस म्हणजे रक्षाबंधन. रक्षाबंधनाला बहिण भावाला ओवाळते. भाऊ बहिणीला प्रेमाने आणलेली भेटवस्तू देतो. येत्या काही दिवसांवर रक्षाबंधन आलं आहे. जर तुम्हाला तुमच्या बहिणीला बजेटमध्ये छान गिफ्ट द्यायचा विचार करात असाल... तर ही माहिती नक्की वाचा.

30 ऑगस्टला रक्षाबंधन साजरा (Celebrate) केला जाणार आहे. वर्षभर भाऊ बहिण या सणाची वाट पाहत असतात. भावाला बहिणीला काय गिफ्ट द्यावे हा प्रश्न असतो. तर आज तुमच्या बजेटमधील 5 गिफ्टचे पर्याय तुम्हाला सांगणार आहोत.

Raksha Bandhan Gift Ideas
Recipe For Raksha Bandhan : रक्षाबंधनाला घरच्या घरी बनवा स्वादिष्ट मिठाई बनवा अन् पैसे वाचवा; पहा रेसीपी

बहिणीसाठी बजेट फ्रेंडली गिफ्ट

घड्याळ किंवा ब्रेसलेट

रक्षाबंधनाला तुमची बहिण तुम्हाला राखी बांधते. याचवेळी तुम्ही तिला घड्याळ गिफ्ट (Gift) देऊ शकतात. घड्याळ ही वस्तू नेहमी गरजेची असते. त्यामुळे तिला हे गिफ्ट नक्की आवडेल. किंवा तुम्ही तिला ब्रेसलेटही गिफ्ट देऊ शकतो.

मेकअप किट

मुलींना मेकअपची आवड असतेच. अशा वेळी, रक्षाबंधनाला तुम्ही तुमच्या बहिणीला छानसा मेकअप किट देऊ शकता. लिपस्टिक किंवा इतर मेकअपचे प्रोडक्टस देऊ शकता.

Raksha Bandhan Gift Ideas
Raksha Bandhan 2023 : भावंडांना रक्षाबंधनाला द्या हे खास गिफ्ट, खुश होतील, पहा यादी

स्मार्चवॉच

आजकाल सर्व जग स्मार्ट झाले आहे. स्मार्टफोननंतर स्मार्टवॉचही बाजारात आले आहे. अशा परिस्थितीत, तुम्ही तुमच्या बहिणीला स्मार्ट वॉच गिफ्ट म्हणून देऊ शकतात.

इअरबड्स

रक्षाबंधनाला तुम्ही तुमच्या बहिणीला इअरबड्स गिफ्ट करु शकतात. आजकाल मोबाईलसोबत (Mobile) इअरफोन मिळत नाही, त्यामुळे तुम्ही तिला इअरबड्स दिल्याने तिला नक्कीच आनंद होईल.

Raksha Bandhan Gift Ideas
Rakshabandhan 2023 Muhurt: भद्राचं सावट! दोन दिवस रक्षाबंधनाचा शुभ मुहूर्त; जाणून घ्या राखी बांधण्याची तिथी व वेळ

कस्टमाइज गिफ्ट

तुम्ही तुमच्या बहिणीला काहीतरी कस्टमाइज भेटवस्तू देऊ शकता. कस्टमाइज म्हणजे स्वतः बनवलेली वस्तू किंवा इतरांकडून बनवून घेतलेली वस्तू. तुम्ही यामध्ये भाऊ बहिणीचा फोटो असलेले टी शर्च किंवा प्रिटेंड कप, ग्रिटिंग कार्ड अशा गोष्टी देऊ शकता.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com