Petrol Diesel Price Today (26 August): कुठे स्वस्त तर कुठे महाग; तुमच्या शहरातील आजचे पेट्रोल-डिझेलचे दर तपासले का?

Petrol Diesel Price Today 26th August 2023: WTI क्रूड ऑइल देखील ०.९९ टक्क्यांनी वाढलं असून ७९.८३ रुपये प्रति बॅरलने विकलं जातंय.
Petrol Diesel Prices
Petrol Diesel PricesSaam TV
Published On

Petrol Diesel Price in Mumbai (Marathi):

सरकारी तेल कंपन्या दररोज सकाळी ६ वाजता पेट्रोल-डिझेलच्या किंमती जाहिर करतात. शनिवारी अनेक शहरांमध्ये पेट्रोल-डिझेलच्या किंमतींमध्ये बदल झाला आहे. चार प्रमुख महानगरांमधील कच्च्या तेलाच्या किंमती देखील स्थिर आहेत. मात्र चेन्नईमध्ये बदल झाला आहे.

1. कच्च्या तेलाच्या किंमती

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतींमध्ये वाढ झाली आहे. ब्रेंट क्रूड ऑइल १.३४ टक्क्यांनी वाढलं असून प्रति बॅरल ८४.४८ रुपये प्रति लिटरवर पोहचलं आहे. WTI क्रूड ऑइल देखील ०.९९ टक्क्यांनी वाढलं असून ७९.८३ रुपये प्रति बॅरलने विकलं जातंय.

Petrol Diesel Prices
Mouni Roy New Business: मौनी रॉयनं अभिनय सोडलं?, अभिनेत्रीने सुरू केला नवा व्यवसाय; चाहत्यांनी केलं तोंडभरून कौतुक

2. कुठे स्वस्त तर कुठे महाग?

कच्च्या तेलाच्या किंमतींमध्ये वाढ झाली असली तरी देखील बऱ्याच शहरांमधील पेट्रोल-डिझेलच्या किंमती कमी झाल्याचे दिसत आहे. फक्त गुरुग्राममध्ये पेट्रोल १२ पैशांनी महागलं असून ९७.०१ रुपये प्रति लिटर आणि डिझेल ११ पैशांनी महागलं असून ८९.८८ रुपये प्रति लिटरने विकलं जातंय. आग्रामध्ये पेट्रोल ५१ पैशांनी स्वस्त झालं असून ९६.२० रुपये प्रति लिटर आणि डिझेल ५० पैशांनी स्वस्त झाले असून ८९.३७ रुपये प्रति लिटर विकलं जातंय.

3. महानगरांमधील पेट्रोल-डिझेलचे दर

मुंबई- पेट्रोल १०६.३१ रुपये, डिझेल ९४.२७ रुपये प्रति लिटर

नवी दिल्ली - पेट्रोल ९६.७२रु., डिझेल ८९.६२ रुपये प्रति लिटर

चेन्नई- पेट्रोल १०२.६३ रुपये, डिझेल ९४.२४ रुपये प्रति लिटर

कोलकाता- पेट्रोल १०६.०३ रुपये, डिझेल ९२.७६ रुपये प्रति लिटर

Petrol Diesel Prices
Honda Money Bike : होंडाने लॉन्च केली 70 KM चा एव्हरेज देणारी बाईक! काय आहे खासियत?

4. शहरानुसार पेट्रोल-डिझेलच्या किंमती कशा तपासायच्या?

भारतात पेट्रोल आणि डिझेलचे दर दररोज तेल कंपन्या ठरवतात. शहरे आणि राज्यानुसार या किमती निश्चित केल्या जातात. अशा परिस्थितीत, जर तुम्हाला तुमच्या शहराची नवीनतम किंमत जाणून घ्यायची असेल, तर तुम्ही एसएमएसद्वारेच तपासू शकता. जर तुम्ही इंडियन ऑइलचे ग्राहक असाल तर इंधनाचे दर जाणून घेण्यासाठी RSP<deलर कोड> लिहा आणि ९२२४९९२२४९ वर मेसेज पाठवा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com