Success story: चौथीनंतर शाळा सुटली अन् ट्रकवर क्लिनर बनला; एका व्हिडीओमुळे १० वी पास झालेल्या अरुण कुमारची थक्क करणारी कहाणी

viral Indian boy: अरुण कुमारची प्रेरणादायी कथा गरिबी, संघर्ष आणि शिक्षणातील अडचणींवर मात करून यश मिळवण्याची आहे. सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर त्याच्या आयुष्यात आलेला बदल आणि ट्रक ड्रायव्हर नेहरू यांच्या मार्गदर्शनाने मिळालेले यश जाणून घ्या.
viral Indian boy
viral Indian boysaam tv
Published On

सोशल मीडियावर रील्स पाहताना तुम्हीही या मुलाला अनेकदा पाहिलं असेल. त्याचं ते हास्य, मनमोकळं हसणं आणि चेहऱ्यावरचा आनंद अनेक व्हिडिओंमध्ये दिसतो. त्याची हसण्याची स्टाईल इतकी वेगळी आहे की त्याचा व्हिडिओ पाहून तुम्हालाही हसू येतं. या मुलाला तुम्ही एखाद्या रीलच्या व्हिडीओमध्ये नक्कीच पाहिलं असेल. पण जगाला आनंद देणाऱ्या या मुलाच्या स्वतःच्या आयुष्यात मात्र संघर्ष आणि अडचणींचीच साथ होती.

आज सोशल मीडियावर लाखो लोकांच्या ओळखीचा झालेला अरुण कुमार हा मुलगा एकेकाळी गरिबीशी झुंज देत होता. त्याच्या आयुष्याचा प्रवास हा खरोखरच प्रेरणा देणारा आहे.

गरिबीमुळे शिक्षण अर्धवट सोडावं लागलं

अरुण फक्त दहा वर्षांचा होता. त्या वयात मुलं शाळेत जातात, मित्रांसोबत खेळतात आणि भविष्यातील स्वप्नं पाहतात. पण अरुणचं वास्तव वेगळंच होतं. घरची परिस्थिती इतकी कठीण होती की त्याला चौथी इयत्तेनंतर शिक्षण सोडावं लागलं. घर चालवण्यासाठी काहीतरी काम करणं गरजेचं होतं. अशाच काळात त्याची ओळख नेहरू नावाच्या ट्रक चालकासोबत झाली. नेहरू यांनी अरुणला आपल्या ट्रकवर क्लिनर म्हणून काम दिलं. त्या दिवसापासून अरुणचा संघर्षमय प्रवास सुरू झाला.

viral Indian boy
Success Story: डोबिंवलीतील १४ वर्षांच्या लेकाने नाव गाजवलं! खुल्या समुद्रात पोहण्याचा केला विक्रम, ४ तासात केलं २३ किमी अंतर पार

एका व्हिडिओने बदलून टाकलं आयुष्य

एक दिवस दुपारी कामाच्या दरम्यान अरुण आणि नेहरू चहा पीत बसले होते. गप्पा मारताना एका गोष्टीवर अरुण मोठ्याने हसू लागला. त्याचं ते मन जिंकणारं हसणं पाहून नेहरू यांनी मोबाईलमध्ये त्याचा व्हिडिओ रेकॉर्ड केला. नंतर त्यांनी तो व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड केला. दुसऱ्या दिवशी सकाळी जे घडलं, त्याची कुणालाच अपेक्षा नव्हती. तो व्हिडिओ वेगाने व्हायरल झाला आणि अरुण एका रात्रीत इंटरनेटवर प्रसिद्ध झाला.

लोकांना त्याचं हे हसू आवडू लागलं. हजारो कमेंट्स, लाखो व्ह्यूज आणि सोशल मीडियावर मोठी लोकप्रियता त्याला मिळाली. पण या प्रसिद्धीमागे एक वेदनादायक सत्य लपलेलं होतं.

लोकांचं कौतुक तो वाचू शकत नव्हता

अरुणचा व्हिडिओ पाहून अनेक लोक त्याचं कौतुक करत होते. त्याच्यासाठी चांगल्या प्रतिक्रिया लिहित होते. मात्र अरुणला त्या प्रतिक्रिया वाचताही येत नव्हत्या. कारण शिक्षण अर्धवट राहिल्यामुळे तो नीट वाचू आणि लिहू शकत नव्हता. जग त्याला व्हायरल स्टार म्हणून पाहत होतं. ल आयुष्य दिसत होतं.

ट्रक ड्रायव्हर नव्हे, तर खरा गुरु

नेहरू यांनाही एकेकाळी शिक्षण अर्धवट सोडावं लागलं होतं. घरच्या जबाबदाऱ्यांमुळे त्यांची कॉलेजची स्वप्नं पूर्ण होऊ शकली नव्हती. त्यामुळे त्यांनी ठरवलं की अरुणच्या बाबतीत तरी असं होऊ द्यायचं नाही. यामुळे त्यांनी त्यांनी अरुणला पुन्हा शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचा निर्णय घेतला. स्वतःच्या पैशातून त्याच्यासाठी पुस्तकं विकत घेतली आणि परीक्षेची फी भरली. दहावीच्या परीक्षेसाठी लागणारी सर्व कागदपत्रांची कामंही त्यांनी स्वतः पूर्ण केली.

viral Indian boy
Success Story : अपमानाचे शब्द थेट काळजाला भिडले! रिक्षाचालकाचा मुलगा थेट IAS अधिकारी झाला

हळूहळू ट्रकचं केबिन हाच अरुणचा वर्ग बनला. लांबच्या प्रवासात ट्रक रस्त्यावर धावत असताना नेहरू त्याला अक्षरं, इंग्रजीची सुरुवात, गणिताचे धडे आणि इतर विषय शिकवत असत. कामासोबत शिक्षणाचीही गाडी सुरू झाली.

मेहनतीचं फळ अखेर मिळालं

सोशल मीडियावर प्रसिद्धी मिळाल्यानंतर अनेक जण त्याला फक्त मनोरंजन करणारा मुलगा म्हणून पाहत होते. पण अरुणने स्वतःसाठी वेगळं स्वप्न पाहिलं होतं. त्याला शिक्षण पूर्ण करायचं होतं आणि आयुष्यात काहीतरी करून दाखवायचं होतं. नेहरू यांच्या मार्गदर्शनाखाली त्याने खूप मेहनत घेतली. अभ्यास केला, अडचणींवर मात केली आणि आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित ठेवलं.

अखेर 2026 मध्ये निकाल लागला आणि अरुण दहावीची परीक्षा उत्तीर्ण झाला. त्याच्या मेहनतीचं आणि जिद्दीचं हे मोठं यश होतं.

viral Indian boy
Success Story: बीडच्या लेकींनी नाव कमावलं! ऊसतोडणी कामगाराच्या मुलींची गगनभरारी, ४ सख्ख्या बहिणी एकाच वेळी झाल्या पोलिस

आज 18 वर्षांचा अरुण कुमार केवळ सोशल मीडियावरील व्हायरल चेहरा राहिलेला नाही. त्याने सिद्ध करून दाखवलं आहे की प्रसिद्धी एका क्षणात मिळू शकते, पण आयुष्यात खरं यश मिळवण्यासाठी मेहनत, जिद्द आणि योग्य मार्गदर्शन आवश्यक असतं.

अरूणची कथा सांगते की, परिस्थिती कितीही कठीण असली तरी हार मानायची नसते. आणि नेहरू यांच्यासारखे लोक हेही दाखवून देतात की खरा गुरु तोच असतो, जो फक्त सल्ला देत नाही, तर आपल्या विद्यार्थ्याला योग्य दिशेने चालायला शिकवतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com