Arratai App: व्हॉट्सअ‍ॅपला नवा पर्याय, भारतात WhatsAppला टक्कर द्यायला नवीन अ‍ॅप लाँच, 'हे' आहेत ५ खास वैशिष्ट्ये

Arratai VsWhats App: अरत्ताई अ‍ॅप आता भारतात उपलब्ध झाले आहे. हे मोफत मेसेजिंग अ‍ॅप असून यात व्हॉइस-व्हिडिओ कॉल, मीडिया शेअरिंग, ग्रुप चॅट आणि डेस्कटॉप सपोर्ट यांसारख्या सुविधा मिळतात.
Arratai App: व्हॉट्सअ‍ॅपला नवा पर्याय, भारतात WhatsAppला टक्कर द्यायला नवीन अ‍ॅप लाँच, 'हे' आहेत ५ खास वैशिष्ट्ये
Published On

भारतीय टेक कंपनी झोहोने नुकतेच आपले नवीन मेसेजिंग आणि कॉलिंग अ‍ॅप "Arattai" सादर केले आहे. हे अ‍ॅप व्हॉट्सअॅपचा भारतीय पर्याय म्हणून समोर आले असून त्यात व्हॉइस आणि व्हिडिओ कॉलिंग, ग्रुप चॅट्स, चॅनेल, स्टोरीज आणि ऑनलाइन मीटिंग्ज अशी विविध वैशिष्ट्ये उपलब्ध आहेत. लाँच होताच Arattaiने लोकप्रियतेत झेप घेतली असून अ‍ॅप स्टोअरवरील नंबर वन सोशल नेटवर्किंग अ‍ॅप बनले असून त्याने व्हॉट्सअॅपलाही मागे टाकले आहे.

झोहोचा दावा आहे की हे अ‍ॅप कमी क्षमतेच्या डिव्हाइसवर आणि कमकुवत नेटवर्क कनेक्शनवरही सहजतेने चालते. यामुळे ग्रामीण भागातील किंवा मर्यादित नेटवर्क असलेल्या यूजर्सनाही याचा फायदा होईल. यूजर्स एकाहून एक चॅट, ग्रुप संभाषण आणि फोटो, व्हिडिओ, कागदपत्रे किंवा व्हॉइस नोट्स सहज शेअर करू शकतात. कॉलिंगसाठी अ‍ॅप थेट चॅटमधून व्हॉइस किंवा व्हिडिओ कॉल करण्याची सुविधा देते.

Arratai App: व्हॉट्सअ‍ॅपला नवा पर्याय, भारतात WhatsAppला टक्कर द्यायला नवीन अ‍ॅप लाँच, 'हे' आहेत ५ खास वैशिष्ट्ये
Jio Recharge Plan: नवीन धमाका ऑफर! वार्षिक प्लॅन नको? मग घ्या जिओचा २०० दिवसांसाठी किफायतशीर प्रीपेड पॅक

Arattaiचे वैशिष्ट्य केवळ चॅटिंगपुरते मर्यादित नाही. यात ग्रुप डिस्कशन्ससोबत चॅनेल्स, स्टोरीज आणि अगदी ऑनलाइन मीटिंग्ज शेड्यूल करण्याची सोय दिली आहे. मीटिंग्ससाठी यूजर्स को-होस्ट जोडू शकतात, टाइमझोन सेट करू शकतात आणि हे अ‍ॅप फक्त मोबाइलवरच नव्हे तर डेस्कटॉप (विंडोज, मॅकओएस, लिनक्स) तसेच अँड्रॉइड टीव्हीवरही चालते.

Arratai App: व्हॉट्सअ‍ॅपला नवा पर्याय, भारतात WhatsAppला टक्कर द्यायला नवीन अ‍ॅप लाँच, 'हे' आहेत ५ खास वैशिष्ट्ये
Airtel Recharge Plan: एअरटेलने आणला खास प्लॅन, गुगल आणि JioHotstarसह बरंच काही..., एकदा पाहाच

सुरक्षेच्या दृष्टीने अ‍ॅपमध्ये व्हॉइस आणि व्हिडिओ कॉल एंड-टू-एंड एन्क्रिप्शनसह सुरक्षित केले गेले आहेत. मात्र मेसेजिंग एन्क्रिप्शनचे काम अद्याप पूर्णपणे सुरू झालेले नसल्याने संवेदनशील माहिती शेअर न करण्याचा सल्ला देण्यात येतो. कंपनीने लवकरच त्याचे अपडेटेड व्हर्जन आणणार असल्याचे सांगितले आहे, ज्यामुळे सुरक्षा आणि कामगिरी आणखी सुधारेल.

अरट्टाई सध्या गुगल प्ले स्टोअर आणि अ‍ॅपल अ‍ॅप स्टोअरवर उपलब्ध आहे. अँड्रॉइड यूजर्स ‘Arattai Messenger (Zoho Corporation)’ या नावाने ते शोधून इन्स्टॉल करू शकतात, तर आयफोन यूजर्ससाठीही ते सहज डाउनलोड करता येते. शिवाय इच्छुकांना झोहोच्या अधिकृत वेबसाइटवरून अ‍ॅप मिळू शकते. इन्स्टॉलेशननंतर मोबाईल नंबर ओटीपीच्या माध्यमातून पडताळावा लागतो. त्यानंतर अ‍ॅप संपर्क, कॅमेरा आणि मायक्रोफोनमध्ये प्रवेश विचारते. यूजर्स प्रोफाइल नाव व फोटो सेट करून खाते सक्रिय करू शकतात आणि संपर्क यादीत नसलेल्या लोकांना एसएमएस आमंत्रणही पाठवू शकतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com