Dhanshri Shintre
एअरटेल विविध रिचार्ज प्लॅन्ससह विस्तृत पर्याय ऑफर करते आणि काही निवडक प्लॅन्ससह खास सेवा देखील उपलब्ध करून देते.
एअरटेलचा ४४९ रुपयांचा प्लॅन २८ दिवसांसाठी वैध असून, यामध्ये डेटा, कॉलिंग आणि एसएमएसच्या सर्व फायदे ग्राहकांना मिळतात.
या एअरटेल प्लॅनमध्ये २८ दिवसांसाठी ५जी + ४ जीबी दैनिक डेटा, अमर्यादित कॉलिंग आणि दररोज १०० एसएमएससह सर्व फायदे उपलब्ध आहेत.
या प्लॅनमध्ये गुगल वन सबस्क्रिप्शन समाविष्ट असून ग्राहकांना ३० जीबी क्लाउड स्टोरेजसह अतिरिक्त फायदेही मिळतात.
या प्लॅनमध्ये ग्राहकांना २८ दिवसांसाठी JioHotstar मोबाईल अॅक्सेस मिळतो, तसेच Airtel Xstream Play Premium चा फायदा देखील या योजनेत समाविष्ट आहे.
या योजनेत ग्राहकांना अॅपल म्युझिकचा अॅक्सेस मिळेल, तसेच कंपनी एक वर्षासाठी पर्प्लेक्सिटी प्रो एआय सेवा देखील प्रदान करत आहे.
एक वर्षाच्या पर्प्लेक्सिटी प्रो एआय अॅक्सेसची किंमत साधारण ₹१७,००० आहे, तर या प्लॅनमध्ये कंपनी अमर्यादित ५जी डेटा सुविधा देखील प्रदान करत आहे.
४४९ रुपयांचा हा प्लॅन जास्त डेटा वापरणाऱ्यांसाठी आणि अतिरिक्त सेवांचा लाभ घ्यायचा असलेल्या ग्राहकांसाठी एक उत्कृष्ट पर्याय ठरतो.
एअरटेल आपल्या प्लॅन्ससह स्पॅम विरोधी सेवा देते, जी ग्राहकांना फसव्या कॉल आणि एसएमएसपासून सुरक्षित ठेवते व सतर्क राहण्यास मदत करते.