ॲपलकडून पहिला टचस्क्रीन 'MacBook Pro' लाँच; M5 चिप आणि डायनॅमिक आयलंडसह भन्नाट फीचर्स जाणून घ्या

Touchscreen MacBook Pro : तंत्रज्ञान जगतातील दिग्गज कंपनी ॲपलने लॅपटॉप जगतात मोठा बदल करत आपला पहिला टचस्क्रीन मॅकबुक प्रो अधिकृतपणे लाँच केला आहे. M5 चिप आणि डायनॅमिक आयलंडसह भन्नाट फीचर्स असतील.
Apple first touchscreen MacBook Pro with M5 chip features
Apple first touchscreen MacBook Pro with M5 chip features saam tv
Published On: 

अॅपलने आपल्या बहुप्रतिक्षित 'Pro and Tell' या खास सोहळ्यात आपला पहिला टचस्क्रीन लॅपटॉप टचस्क्रीन मॅकबुक प्रो अधिकृतपणे लाँच केला आहे. यामध्ये कंपनीने नवीन मॉडेल्समध्ये ओएलईडी डिस्प्ले आणि टच स्क्रीनसाठी सपोर्ट दिला आहे. ॲपलच्या इतिहासातील टचस्क्रीन डिझाइन असलेला हा पहिलाच लॅपटॉप असल्याने जगभरातील टेक जगतात याबद्दल प्रचंड उत्सुकता पाहायला मिळत आहे.

हा नवीन मॅकबुक प्रो १४-इंच आणि १६-इंच अशा दोन वेगवेगळ्या व्हेरियंट्समध्ये उपलब्ध होणार आहे. परफॉर्मन्स आणि स्पीडच्या बाबतीत कोणतीही तडजोड न करता यासाठी ॲपलच्या अत्यंत शक्तिशाली M5 Pro आणि M5 Max चिप्सचा वापर करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, लॅपटॉपमध्ये पहिल्यांदाच आयफोनप्रमाणे डायनॅमिक आयलंड फीचर देण्यात आले आहे.

Apple first touchscreen MacBook Pro with M5 chip features
EPFO Update: ३० कोटी कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, EPFO मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

या लॅपटॉपमध्ये उत्कृष्ट व्हिज्युअल अनुभवासाठी XDR डिस्प्ले देण्यात आला असून तो १२८ GB युनिफाइड मेमरीसह सज्ज आहे. भारतात या प्रीमियम लॅपटॉपची सुरुवातीची किंमत ३,४९,९०० रुपये ठेवण्यात आली आहे. नवीन डिझाइन आणि प्रगत तंत्रज्ञानामुळे हा लॅपटॉप व्यावसायिक, व्हिडिओ एडिटर्स आणि टेक प्रेमींसाठी एक उत्कृष्ट पर्याय ठरेल.

Apple first touchscreen MacBook Pro with M5 chip features
PM Kisan Yojana : पीएम किसानचा २४ वा हप्ता उद्या खात्यात जमा होणार, तुम्हाला मिळणार की नाही? घरबसल्या असं तपासा

ओएलईडी डिस्प्लेच्या थिनर पॅनेलमुळे या लॅपटॉपचे वजन लक्षणीयरीत्या कमी झाले आहे. १४ इंच मॉडेलचे वजन अवघे १.३८ किलो तर १६ इंच मॉडेलचे वजन १.८ किलो आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, यात २४ तासांपर्यंतची बॅटरी लाईफ मिळते आणि फास्ट चार्जिंगच्या मदतीने हा लॅपटॉप केवळ ३० मिनिटांत ५० टक्के चार्ज होणार आहे. कनेक्टिव्हिटीसाठी यात अत्याधुनिक Thunderbolt ५ पोर्ट्स, Wi-Fi ७ आणि ब्लूटूथ ६ चा सपोर्ट देण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com