Loan Scheme For Farmers: सरकारची भन्नाट योजना; शेतकऱ्यांना मिळणार २ कोटींचं कर्ज, 'असा' करा अर्ज

Agriculture Infrastructure Fund Scheme: सरकार शेतकऱ्यांच्या हितासाठी नेहमी प्रयत्न करत असते. आता सरकारने अशीच एक योजना आणली आहे, ज्या अंतर्गत शेतकऱ्यांना दोन कोटींपर्यंत कर्ज मिळणार आहे.
Scheme For Farmers
Scheme For FarmersYandex
Published On

Farming Loan Sarkari Yojana

कृषी पायाभूत सुविधा निधी योजनेंतर्गत कोल्ड स्टोरेज, प्रक्रिया युनिट, गोदाम, पॅकेजिंग युनिट उभारण्यासाठी शेतकऱ्यांना 2 कोटी रुपयांपर्यंत कर्ज दिलं जातं. हे कर्ज जास्तीत जास्त 7 वर्षांसाठी दिलं (Loan Scheme For Farmers) जातं. या कर्जावरील व्याजात 3 टक्क्यांपर्यंत सूट दिली जाते. या योजनेचा लाभ कसा मिळवायचा ते आपण जाणून घेऊ या.  (latest sarkari yojana)

भारतातील कृषी पायाभूत सुविधा निधी (AIF) कृषी क्षेत्राच्या विकास आणि सुधारणांना प्रोत्साहन देण्यासाठी वापरला जातो. त्याचा मुख्य उद्देश कृषी पायाभूत सुविधांचा (रस्ते, पूल, सिंचन सुविधा, गोदामे ) विकास आणि बांधकामात गुंतवणूक करणं आहे. भारतातील सरकारी आणि खाजगी संस्था कृषी क्षेत्राच्या संरचनात्मक विकासात मदत करण्यासाठी समर्थन देतात.

 ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

कृषी क्षेत्राच्या विकासासाठी सहाय्य

या योजनेद्वारे शेतकऱ्यांना तांत्रिक ज्ञान, आर्थिक रचना आणि इतर संबंधित सेवा उपलब्ध करून दिल्या जातात. या योजनेंतर्गत कोल्ड स्टोरेज, प्रक्रिया युनिट, गोदाम, पॅकेजिंग युनिट उभारण्यासाठी शेतकऱ्यांना 2 कोटी रुपयांपर्यंतचे कर्ज दिले (Sarkari Yojana) जाते. केंद्र सरकार शेतकऱ्यांना जास्तीत जास्त 7 वर्षांसाठी 2 कोटी रुपयांपर्यंतच्या कर्जावर 3 टक्क्यांपर्यंत व्याज सवलत देते.

या निधीच्या माध्यमातून कृषी क्षेत्राच्या विविध गरजा पूर्ण करण्यासाठी आर्थिक मदत दिली जाते. कृषी पायाभूत सुविधा निधीद्वारे शेतकऱ्यांना तांत्रिक सहाय्य, आर्थिक संरचना आणि इतर संबंधित सेवा उपलब्ध करून दिल्या (Agriculture Infrastructure Fund Scheme) जातात. या योजनेमुळे शेतकऱ्यांना आर्थिक फायदा होणार आहे.

Scheme For Farmers
Sarpanch Ladli Bahin Yojana : लग्नादिवशी गावातील वधूस मिळणार साेन्याची अंगठी, भांडी; जाणून घ्या 'सरपंच लाडली बहीण' योजना

योजनेचा लाभ कसा घ्यायचा?

कृषी क्षेत्र हा भारतीय अर्थव्यवस्थेचा मुख्य आधार आहे. त्यामुळे कृषी क्षेत्राला बळकट करून अर्थव्यवस्थेच्या प्रगतीसाठी हा निधी मदत करतो. या निधीद्वारे कृषी क्षेत्रात गुंतवणूक केल्याने रोजगाराच्या संधीही (Farming Loan) वाढतात. त्यामुळे ग्रामीण भागातील रोजगाराची स्थिती सुधारते.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी लागेल. येथे तुम्हाला विनंती केलेली सर्व माहिती भरावी लागेल. यानंतर, तुम्ही सबमिट बटणावर क्लिक करताच तुमची नोंदणी होईल. अर्ज केल्यानंतर दोन दिवसांनी अर्जदाराची कृषी मंत्रालयाकडून पडताळणी केली (Scheme For Farmers) जाईल. यानंतर तुम्हाला इतर आवश्यक औपचारिकता पूर्ण करण्यासाठी बँकेशी संपर्क साधावा लागेल. पडताळणी केल्यानंतर, तुम्हाला बँकेकडून संपूर्ण माहिती मिळेल. हे सर्व काम झाल्यानंतर बँकेकडून 60 दिवसांत कर्जाची प्रक्रिया केली जाईल.

Scheme For Farmers
Stree Shakti Yojana: महिलांना व्यवसायात आत्मनिर्भर बनवण्यासाठी सरकारची जबरदस्त योजना, मिळणार २५ लाखांचं कर्ज

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com