Aadhaar Update : आधार कार्डधारकांसाठी मोठी बातमी! फोटो, पत्ता आणि बायोमेट्रिक अपडेटचे नवे शुल्क जाणून घ्या

Aadhaar update charges : आधार कार्डवरील फोटो, पत्ता किंवा बायोमेट्रिक तपशीलात बदल करणे आता पूर्वीपेक्षा अधिक सोपे झाले आहे. UIDAI च्या नव्या नियमांनुसार कोणत्या अपडेटसाठी किती शुल्क आकारले जाते, याची संपूर्ण माहिती जाणून घ्या.
AADHAAR CARD UPDATE FEES 2026
AADHAAR CARD UPDATE FEES 2026saam tv
Published On: 

आधार कार्ड हे आजच्या काळातील महत्त्वाचे ओळखपत्र आहे. बँक खाते उघडण्यापासून ते सरकारी योजनांचा लाभ घेण्यापर्यंत अनेक कामांसाठी आधार कार्ड आवश्यक असते. त्यामुळे आधार कार्डवरील नाव, पत्ता, जन्मतारीख, मोबाइल नंबर आणि फोटो यांसारखी माहिती अचूक व अद्ययावत असणे गरजेचे आहे. मात्र, आधारमधील वेगवेगळ्या माहितीमध्ये बदल करण्यासाठी किती शुल्क आकारले जाते, याची अनेकांना माहिती नसते. भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाने (UIDAI) यासाठी वेगवेगळे शुल्क निश्चित केले आहे.

फोटो आणि बायोमेट्रिक अपडेटसाठी १२५ रुपये

आधार कार्डवरील फोटो बदलणे हे बायोमेट्रिक अपडेटमध्ये समाविष्ट आहे. याशिवाय बोटांचे ठसे आणि डोळ्यांच्या बुबुळांचे स्कॅन अपडेट करण्यासाठीही बायोमेट्रिक शुल्क लागू होते. यासाठी सर्वसाधारणपणे १२५ रुपये आकारले जातात.

AADHAAR CARD UPDATE FEES 2026
Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेचे ₹3,000 एकत्र मिळणार? ऑक्टोबर-नोव्हेंबरच्या हप्त्याबाबत मोठी अपडेट
  • मात्र, मुलांसाठी काही वयोगटांत ही सुविधा मोफत आहे.

  • ५ ते ७ वर्षे पहिल्यांदा अनिवार्य बायोमेट्रिक अपडेट मोफत.

  • ७ ते १५ वर्षे ३० सप्टेंबर २०२७ पर्यंत बायोमेट्रिक अपडेट मोफत.

  • १५ ते १७ वर्षे पहिल्यांदा किंवा दुसऱ्यांदा अनिवार्य बायोमेट्रिक अपडेट मोफत.

  • इतर वयोगट १२५ रुपये शुल्क.

  • नाव, पत्ता आणि मोबाइल नंबर बदलण्यासाठी ७५ रुपये

AADHAAR CARD UPDATE FEES 2026
Ayushman Bharat Card : तुमच्याकडे आहे का आयुष्मान कार्ड? वर्षाला ₹5 लाखांपर्यंत मोफत उपचार, असा करा ऑनलाइन अर्ज

आधार कार्डमधील नाव, पत्ता, जन्मतारीख, लिंग किंवा मोबाईल नंबरमध्ये बदल करायचा असल्यास स्वतंत्रपणे ७५ रुपये शुल्क द्यावे लागते. मात्र, बायोमेट्रिक अपडेटसोबत ही माहिती बदलल्यास त्यासाठी वेगळे शुल्क आकारले जात नाही.

ई-मेल अपडेटची सुविधा मोफत

आधार ॲपच्या माध्यमातून केवळ ई-मेल आयडी अपडेट करण्याची सुविधा ३१ डिसेंबर २०२६ पर्यंत मोफत उपलब्ध आहे. तसेच ओळखपत्र आणि पत्त्याचा पुरावा ऑनलाइन myAadhaar पोर्टलवर १४ जून २०२७ पर्यंत मोफत अपडेट करता येणार आहे. आधार केंद्रावर कागदपत्रे अपडेट करण्यासाठी ७५ रुपये शुल्क आकारले जाते. त्यामुळे आधारमध्ये बदल करण्यापूर्वी संबंधित शुल्क आणि नियम UIDAI च्या अधिकृत वेबसाइटवर तपासून घ्यावेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.