8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगाआधीच 'या' सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार वाढला; किती होणार फायदा?

8th Pay Commission Salary and Pension Hike: सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आठवा वेतन आयोग लागू झाला आहे. दरम्यान, आता आठवा वेतन आयोग प्रत्यक्षात लागू होण्याआधीच सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ झाली आहे.
8th Pay Commission
8th Pay CommissionSaam Tv
Published On
Summary

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी

आठव्या वेतन आयोगाआधीच या सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार वाढणार

विमा कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आठवा वेतन आयोग लागू करण्यात आला आहे. दरम्यान, सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारवाढीसाठी अजून वेळ आहे. दरम्यान, त्याआधीच काही सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार वाढणार आहे. केंद्र सरकारची सार्वजनिक क्षेत्रातील विमा कंपनी (PSGICs), नाबार्ड, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या कर्मचाऱ्यांच्या पेन्शन आणि वेतनात वाढ करण्यासाठी मंजूरी दिली आहे.

सरकारी विमा कंपनीतील कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ केली जाणार आहे. यामुळे ४६,३२२ कर्मचारी आणि २३,५७० पेन्शनधारक आणि २३,२६० फॅमिली पेन्शनधारकांना फायदा होणार आहे.

8th Pay Commission
8th Pay Commission: आठवा वेतन आयोग लागू झाल्यावर कर्मचाऱ्यांना मिळणार लाखो रुपये; वाचा एरियरचं कॅल्क्युलेशन

एका सरकारी रिपोर्टनुसार, सार्वजनिक क्षेत्रातील विमा कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांचा पगार १ ऑगस्ट २०२२ पासून लागू होणार आहे. यामुळे वेतनात एकूण १२.४१ टक्क्यांनी वाढ होणार आहे. मूळ वेतन आणि महागाई भत्त्याच १४ टक्क्यांची वाढ करण्यात आली आहे. या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांना फायदा होणार आहे. १ एप्रिल २०१० नंतर रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांच्या एनपीएसमधील योगदान १० टक्क्यांवरुन १४ टक्के करण्यात आले आहेत.

पगार कितीने वाढणार?

कुटुंब पेन्शनमध्ये ३० टक्क्यांनी वाढ केली आहे. याचा फायदा १५,५८२ विद्यमान कुटुंब पेन्शनधारकांना होणार आहे. या सुधारणेचा आर्थिक परिणाम ८१७०.३० कोटी असमार आहे. यामध्ये वेतन थकबाकीसाठी ५८२२.६८ कोटी, एनपीएससाठी २५०.१५ कोटी आणि कुटुंब पेन्शनसाठी २०९७.४७ कोटींचा समावेश आहे.

PSGIC मध्ये नॅशनल इन्श्युरन्स कंपनी लिमिटेड, न्यू इंडिया अश्युरन्स कंपनी लिमिटेड, ओरिएंटल इन्श्युरन्स कंपनी लिमिटेड, युनायटेड इंडिया इन्श्युरन्स कंपनी लिमिटेड, जनरल इन्श्युरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया आणि अॅग्रीकल्चर इन्श्युरन्स कंपनी लिमिटेड सारख्या कंपन्यांचा समावेश आहे.

8th Pay Commission
8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगाबाबत मोठी अपडेट; अर्थसंकल्पानंतर सरकारी कर्मचाऱ्यांचा वाढणार पगार? वाचा

नाबार्डमध्ये किती पगार वाढणार?

नाबार्डमध्ये वेतनवाढ १ नोव्हेंबर २०२२ पासून लागू करण्यात आली आहे. यामुळे गट अ, ब आणि क कर्मचाऱ्यांच्या पगारात आणि भत्त्यांमध्ये २० टक्के वाढ होणार आहे.

आरबीआय पेन्शनमध्ये वाढ

निवृत्त आरबीआय कर्मचारी आणि पेन्शनमध्ये वाढ करण्याक आली आहे. या वाढीचा फायदा ३०,७६९ कर्मचाऱ्यांना होणार आहे. २२,५८० पेन्शनधारक आणि ८,१८९ कुटुंब पेन्शनधारकांना फायदा होणार आहे.

8th Pay Commission
8th Pay Commission: सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारवाढीबाबत लवकरच निर्णय; आठव्या वेतन आयोगाबाबत नवीन अपडेट

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com