8th Pay Commission: सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! ८व्या वेतन आयोगात पगार किती वाढणार? २.१५ फिटमेंट फॅक्टरचे गणित आत्ताच घ्या समजून

8th Pay Commission Salary : आठव्या वेतन आयोगात २.१५ फिटमेंट फॅक्टर आणि डीए मर्ज झाल्याने सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार किती वाढेल? लेव्हल ६,७ आणि ८ च्या संभाव्य वेतनाची गणना जाणून घ्या.
DA Hike
DA Hikemeta ai
Published On: 

8th Pay Commission Latest News: आठव्या वेतन आयोगाबाबत सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांमध्ये उत्सुकता वाढलेली आहे. पगार, पेन्शन आणि वेगवेगळ्या भत्त्यांबद्दल कर्मचारी संघटना आणि संबंधित प्रतिनिधींशी चर्चा सुरू असून वेतन आयोगाच्या शिफारशींकडे सर्वाचं लक्ष लागलं आहे. दरम्यान २.१५ फिटमेंट फॅक्टर आणि महागाई भत्ता (DA) मर्ज केल्याने पगार किती होईल, याची संभाव्य आकडेवारी समोर आली आहे. मात्र, अंतिम पगार किती असेल, हे आयोगाच्या शिफारशी आणि सरकारच्या निर्णयानंतरच स्पष्ट होईल.

२.१५ फिटमेंट फॅक्टरनुसार पगाराचे गणित

सध्या सातव्या वेतन आयोगानुसार लेव्हल ६, ७ आणि ८ मधील कर्मचाऱ्यांचे बेसिक सॅलरी अनुक्रमे ३५,४०० रुपये, ४४,९०० रुपये आणि ४७,६०० रुपये आहे. दिलेल्या वृत्तानुसार, सध्याचा ६० टक्के महागाई भत्ता बेसिक सॅलरीत एकत्र केल्यावर वेतनाची आधाररक्कम वाढू शकते.

लेव्हल ६ - बेसिक सॅलरी ३५,४०० रुपये असून, ६० टक्के DA मर्ज केल्यानंतर रक्कम ५६,६४० रुपये होईल.

लेव्हल ७ - बेसिक सॅलरी ४४,९०० रुपये असून, DA मर्ज केल्यानंतर रक्कम ७१,८४० रुपये होईल.

लेव्हल ८ - बेसिक सॅलरी ४७,६०० रुपये असून, DA मर्ज केल्यानंतर रक्कम ७६, १६० रुपये होईल.

DA Hike
DA Hike : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी जॅकपॉट! एकाच वेळी २ महागाई भत्ते मंजूर; 'या' दिवशी बँक खात्यात जमा होणार वाढीव पगार

२५ टक्के DA गृहीत धरल्याने किती होईल पगार?

२.१५ फिटमेंट फॅक्टर आणि २५ टक्के DA गृहीत धरून केलेल्या गणनेनुसार संभाव्य वेतन पुढीलप्रमाणे आहे.

लेव्हल ६ - बेसिक सॅलरी ७६,११० रुपये आणि २५ टक्के DA म्हणजे १९,०२८ रुपये. एकूण रक्कम ९५,१३८ रुपये होऊ शकते.

लेव्हल ७ - बेसिक सॅलरी ७६,५३५ रुपये आणि २४,१३४ रुपये धरल्याने एकूण रक्कम १,२०,६६९ रुपये होऊ शकते.

DA Hike
Namo Shetkari Yojana : नमो शेतकरी योजनेचे ₹२००० खात्यात कधी जमा होणार? समोर आली मोठी अपडेट; असे तपासा यादीत तुमचे नाव

लेव्हल ८ - दिलेल्या वृत्तातही एकूण वेतन १,२०,६६९ रुपये नमूद केले आहे. मात्र, या स्तरासाठी दिलेल्या बेसिक सॅलरीच्या आकड्यांमध्ये विसंगती असल्याने हा आकडा अधिकृत मानता येणार नाही.

अंतिम पगार कधी कळणार?

आठव्या वेतन आयोगाचा अंतिम फिटमेंट फॅक्टर, DA मर्ज करण्याची पद्धत आणि सुधारित वेतनश्रेणी अद्याप अधिकृतपणे ठरलेली नाही. वरचे आकडे हे फक्त अंदाजे म्हणून पाहणं योग्य ठरेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com