

DA Hike Latest News: येत्या सणासुदीच्या काळात सरकारी कर्मचाऱ्यांची चांदी होणा आहे. त्यातच तेलंगणा राज्यातल्या सरकारी कर्मचाऱ्यांसाठी दसऱ्याआधी आनंदाची बातमी समोर आली आहे. राज्य सरकारने महागाई भत्त्याच्या (DA) दोन हप्त्यांना मंजुरी दिल्याची माहिती समोर आलेली आहे. या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ होणार असून, त्यांना महागाई भत्त्याची थकबाकी सुद्धा मिळेल. त्यामुळे बऱ्याच दिवसांपासून डीए वाढची वाट पाहणाऱ्या कर्मचाऱ्यांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तेलंगणा सरकारने जानेवारी २०२४ आणि जुलै २०२४ या दोन कालावधींसाठी महागाई भत्त्याच्या हप्त्यांना मंजुरी दिली आहे. या वाढीचा लाभ ऑक्टोबर २०२६ च्या सॅलरीमध्ये मिळणार असल्याचं वृत्त आहे. ऑक्टोबर महिन्याचा पगार १ नोव्हेंबर २०२६ रोजी कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार असल्याने वाढील डीएटा फायदा त्यांना मिळू शकतो.
याशिवाय, संबंधित कालावधीतल्या डीएची थकबाकीही कर्मचाऱ्यांना दिली जाणार असल्याची माहिती आहे. पण थकबाकीचे प्रत्यक्ष वितरण आणि त्याचे वेळापत्रक याबाबत कर्मचाऱ्यांनी सरकाचे अधिकृत आदेश तपासणं महत्वाचं आहे.
डीएच्या दोन्ही हप्त्यांमुळे तेलंगणा सरकारच्या तिजोरीवर मोठा आर्थिक भार पडणार आहे. उपलब्ध वृत्तानुसार, या निर्णयामुळे सरकारला दरवर्षी ३,०५७ कोटी रुपये जास्त खर्च करावा लागेल. यामध्ये जानेवारी २०२४ च्या हप्त्यासाठी १,७४७ कोटी रुपये, तर जुलै २०२४ च्या हप्त्यासाठी अंदाजे १,३१० कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.
तसेच या निर्णयाचा लाभ फक्त नियमित सरकारी कर्मचाऱ्यांपुरता मर्यादित नसून, इतर पात्र कर्मचारी वर्गांनाही मिळणार आहे. यामध्ये पुढील कर्मचाऱ्यांचा समावेश आहे -
१. यूजीसी (UGC) आणि एआयसीटीई (AICTE) वेतनश्रेणीतले कर्मचारी.
२. जिल्हा आणि मंडळ परिषदांमधील पात्र कर्मचारी.
३. नगरपालिकांसह स्थानिक स्वराज्य संस्थांमधील नियमित वेतनश्रेणीतले कर्मचारी.
४. पूर्णवेळ कंटिंजंट कर्मचारी.
एकूणच, तेलंगणा सरकारच्या या निर्णयामुळे पात्र कर्मचाऱ्यांना वाढीव महागाई भत्ता आणि थकबाकीचा लाभ मिळेल अशी शक्यता आहे. पण प्रत्यक्ष लाभाची रक्कम, लागू अटी आणि पैसे जमा होण्याची तारीख यासाठी संबंधित विभागाचा अधिकृत शासन आदेश तपासावा.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.