8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! 8व्या वेतन आयोगाबाबत लवकरच मोठा निर्णय होणार, किती असेल फिटमेंट फॅक्टर? वाचा...

8th CPC News: कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची माहिती समोर आली आहे. आठव्या वेतन आयोगाच्या चर्चांनी जोर धरला असताना आता आयोग विविध शहरांना भेट देत असल्याची माहिती मिळाली आहे. अनेक शहरांमध्ये आयोग भेट देऊन बैठका घेत आहे.
Central Government Employees
8th Pay Commissiongoogle
Published On

केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत महत्वाची बातमी आहे. सध्या सुरु असणार्‍या आठव्या वेतन आयोगाबाबत ही माहिती आहे. प्रत्येक कर्मचार्‍याला आणि पेन्शनधारकाला महागाई भत्ता आणि फिटमेंट फॅक्टर किती टक्क्यांनी वाढवून भेटणार? याकडे लक्ष लागलं आहे. त्याच संदर्भात लखनऊमध्ये २२ आणि २३ जून २०२६ रोजी बैठक आहे.

आठव्या वेतन आयोग लागू करण्यापुर्वी आयोग अनेक शहरांना भेट देत आहे. तसेच बैठकाही घेत आहे. कारण प्रत्येकाच्या समस्या आणि मागण्यांचा विचार घेऊनच आयोगाचा रिपोर्ट तयार केला जाईल. लखनऊच्या आधीही अनेक शहरांमध्ये आयोगाने बैठका घेतल्या आहेत. त्यात दिल्ली आणि जम्मू काश्मीरचाही समावेश आहे. आता लखनऊ बैठक पार पडणार असून पुढे कोलकाता आणि भुवनेश्वर या शहरांना भेट देण्यात येणार आहे.

Central Government Employees
Ladki Bahin Yojana : वटपौर्णिमेला लाडकीच्या खात्यात जमा होणार १५०० रुपये? जून महिन्याच्या हप्ताबद्दल मोठी अपडेट समोर

तुम्हाला आठव्या वेतन आयोगाबाबत कोणतीही अपेडट किंवा माहिती मिळवायची असेल तर तुम्ही अधिकृत वेब पोर्टेल https://8cpc.gov.in/ या वेबसाईटला भेट द्या. टाइम्स ऑफ इंडियाट्या रिपोर्टनुसाप ऑल इंडियाने दिलेल्या माहितीनुसार, शैलेंद्र दूबे यांनी राज्य सरकारी कर्मचारी आणि वीज क्षेत्रातल्या कर्मचाऱ्यांना आयोगाच्या बैठकीसाठी अजून वेळ देण्यात आला नाही असं सांगत नाराजी व्यक्त केली. त्यांच्या मते, राज्य कर्मचाऱ्यांशी संबंधिक संघटनांचे मतही आयोगाने जाणून घेतले पाहिजे. कारण आठव्या वेतन आयोगाच्या मागण्यांचा थेट परिणाम वीज क्षेत्रातल्या कर्मचाऱ्यांवर होणार आहे.

कंत्राटी आणि आउटसोर्सिंग पद्धतीने काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनाही प्रतिनिधित्व मिळावं अशी मागणी संघटनांनी केली आहे. त्यांच्या समस्या, सूचना आणि अपेक्षा आयोगाने विचारात घ्याव्यात असं मत व्यक्त करण्यात आले आहे.

सध्या केंद्रीय कर्मचाऱ्यांमध्ये फिटमेंट फॅक्टर वाढीबाबत खूप चर्चा सुरू आहेत. कर्मचारी आणि पेन्शनधारक संघटनांकडून फिटमेंट फॅक्टर वाढवण्याची जोरदार मागणी केली जातेय. फिटमेंट फॅक्टर जितका वाढेल तितकी बेसिक सॅलरीत वाढ होईल.

Central Government Employees
Bank Holiday News: पुढील आठवड्यात सलग 4 दिवस बँका बंद; SBI, HDFC सह सर्व बँकांच्या ग्राहकांनी आधीच तपासा सुट्ट्यांची यादी

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com