8th Pay Commission: खुशखबर! आठवा वेतन आयोग या दिवसापासून लागू होणार; संभाव्य तारीख आली समोर

8th Pay Commission Implementation Date: आठव्या वेतन आयोगाबाबत महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. आठवा वेतन आयोग कधीपासून लागू होणार याबाबत माहिती समोर आली आहे.
8th Pay Commission
8th Pay CommissionSaam Tv
Published On
Summary

सरकारी कर्मचाऱ्यांना आठव्या वेतन आयोगाची प्रतिक्षा

या दिवसापासून होऊ शकतो वेतन आयोग लागू

या दिवसापासून पगार वाढण्याची शक्यता

केंद्र सरकारी कर्मचारी आठव्या वेतन आयोगाची वाट पाहत आहेत. आठवा वेतन आयोग जानेवारी २०२६ पासून लागू झाला आहे. परंतु प्रत्यक्षात पगारवाढ येण्यासाठी अजून बराच वेळ वाट पाहावी लागणार आहे. यासाठी आठव्या वेतन आयोगाची समिती स्थापन केली आहे. समिती स्थापन करुन ६ महिने होऊन गेले आहेत. यानंतर आता देशातील अनेक कर्मचारी संघटनांमध्ये बैठका सुरु आहे. त्यानंतर आता प्रत्यक्षात पगारवाढ आणि पेन्शनवाढ कधी होणार याकडे सर्वांचेच लक्ष आहे.

8th Pay Commission
8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगात पगार किती वाढेल?

आठव्या वेतन आयोगाबाबत महत्त्वाची अपडेट

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. एका मुलाखतीत ऑल इंडिया एनपीएस एम्प्लॉईज फेडरेशन आणि नॅशनल मिशन फॉर ओल्ड पेन्शन स्कीम इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. मनजीत सिंग पटेल यांनी आठव्या वेतन आयोगाबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. कर्मचाऱ्यांना सुधारित वेतन कधीपासून मिळेल, याबाबत खुलासा केला आहे.

या दिवसापासून लागू होऊ शकतो आठवा वेतन आयोग (8th Pay Commission Implementation Date)

डॉ. मनजीत सिंग यांच्या म्हणण्यांनुसार, केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना आठव्या वेतन आयोगात वाढीव पगार आणि पेन्शनसाठी जास्त वेळ वाट पाहावी लागणार नाही. अंबजबजावणीसाठी योग्य वेळ एप्रिल २०२७ असल्याचे त्यांनी म्हटले आहे. त्यांनी यामागचे कारणदेखील सांगितले आहे.

केंद्र सरकारने ऑक्टोबर २०२५ मध्ये आठव्या वेतन आयोगाच्या स्थापनेला मंजुरी दिली. नोव्हेंबर २०२५ मध्ये याची अधिसूचना जाहीर करण्यात आली. आयोगाला अंतिम अहवाल सादर करण्यासाठी १८ महिन्यांचा कालावधी देण्यात आला आहे. नोव्हेंबर २०२५ पासून ते १८ महिन्यांचा कालावधी म्हणजे अंदाजे एप्रिल-मे २०२७ पर्यंत येतो. डॉ. मनमीत पटेल यांच्या मते, आयोग हे काम दोन-तीन महिने आधीच पूर्ण करण्याची शक्यता आहे.

8th Pay Commission
8th Pay Commission: 8वा वेतन आयोग रखडणार? कर्मचारी आणि निवृत्ती वेतनधारक टेन्शनमध्ये

नवीन आर्थिक वर्षापासून गिफ्ट मिळणार

जर आठव्या वेतन आयोगाने अहवाल लवकर सादर केला तर कर्मचाऱ्यांना नवीन आर्थिक वर्षापासून वाढीव पगार मिळू शकतो. एप्रिल २०२७ पासून पगार मिळू शकतो. यासाठी दोन महिन्यांला विलंबदेखील होऊ शकतो. परंतु २०२७ हाच अंबलबाजवणीचा मुख्य टप्पा राहिल.

8th Pay Commission
8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगाबाबत मोठी अपडेट; महागाई भत्त्याबाबत मोठा निर्णय होण्याची शक्यता

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com