8th Pay Commission: शिक्षकांचा पगार किती वाढणार? किती मिळणार पेन्शन?

8th Pay Commission Update: शिक्षक संघटनांनी आठव्या वेतन आयोगांतर्गत वेतन रचनेत महत्त्वपूर्ण बदल करण्याची मागणी केली आहे. या मागण्यांमध्ये 'फिटमेंट फॅक्टर' वाढवणे, किमान वेतन ६५,००० रुपये निश्चित करणे, तसेच घरभाडे भत्ता आणि वार्षिक वेतनवाढ वाढवणे यांचा समावेश आहे.
8th Pay Commission Update
Teachers across the country are demanding major salary and pension revisions under the proposed 8th Pay Commission.
Published On
Summary
  • 8व्या वेतन आयोगामुळे शिक्षकांच्या पगारात मोठी वाढ होण्याची अपेक्षा आहे.

  • शिक्षक संघटनांनी किमान वेतन ६५ हजार रुपये करण्याची मागणी केली आहे.

  • एन्ट्री-लेव्हल शिक्षकांचे मूळ वेतन १.३४ लाख रुपये करण्याचा प्रस्ताव चर्चेत आहे.

देशभरातील सरकारी कर्मचारी आणि शिक्षकांमध्ये सध्या '८ वा वेतन आयोग' हा चर्चेचा मुख्य विषय बनलाय. विविध मंत्रालये, विभाग आणि कर्मचारी संघटनांकडून सूचना व माहिती संकलित करण्याची प्रक्रिया सुरू असतानाच, शिक्षक संघटनांनी वेतन रचनेत महत्त्वपूर्ण बदल करण्याची मागणी केलीय. सध्या 'एन्ट्री-लेव्हल ६' शिक्षकांचे सुरुवातीचे मूळ वेतन थेट १,३४,५०० रुपये निश्चित करण्याची मागणी करणारा प्रस्ताव सर्वाधिक चर्चेत आहे.

8th Pay Commission Update
Aadhaar Address Update : आता घरबसल्या बदला आधारवरील पत्ता; नवीन Aadhaar App मुळे प्रक्रिया झाली सोपी

सरकारी शिक्षकांच्या वेतनात किती वाढ होऊ शकते?

८ व्या वेतन आयोगांतर्गत 'फिटमेंट फॅक्टर' वाढवण्याची मागणी ही सर्वात महत्त्वाची मागणी आहे. ७ व्या वेतन आयोगाच्या काळात हा फॅक्टर २.५७ इतका होता, तर आता तो २.८६ ते ३ च्या दरम्यान वाढवण्याची मागणी केली जातेय. जर ही मागणी मान्य झाली तर मूळ वेतनात मोठी वाढ होऊ शकते. विविध अंदाजानुसार 'फिटमेंट फॅक्टर' २.२८ ते २.८६ च्या दरम्यान असू शकतो, ज्यामुळे किमान वेतन ४१,००० ते ₹५१,००० च्या दरम्यान वाढण्याची शक्यता आहे.

सरकारी शिक्षकांच्या वेतनात किती वाढ होऊ शकते?

८ व्या वेतन आयोगांतर्गत 'फिटमेंट फॅक्टर' वाढवण्याची मागणी ही सर्वात महत्त्वाची मागणी आहे. ७ व्या वेतन आयोगाच्या काळात हा फॅक्टर २.५७ इतका होता, तर आता तो २.८६ ते ३ च्या दरम्यान वाढवण्याची मागणी केली जातेय. जर ही मागणी मान्य झाली तर मूळ वेतनात मोठी वाढ होऊ शकते. विविध अंदाजानुसार 'फिटमेंट फॅक्टर' २.२८ ते २.८६ च्या दरम्यान असू शकतो, ज्यामुळे किमान वेतन ४१,००० ते ₹५१,००० च्या दरम्यान वाढण्याची शक्यता आहे.

8th Pay Commission Update
EPFO Update: PF खात्यावर ८.२५ टक्के व्याज जमा होण्यास सुरूवात, तुम्हाला मिळाले का? जाणून घ्या स्टेप बाय स्टेप

वेतनाव्यतिरिक्त कशात वाढ होणार आहे?

केवळ वेतनवाढच नाहीतर घरभाडे भत्ता (HRA) आणि इतर भत्त्यांमध्येही वाढ करण्याची मागणी केली जातेय. मोठ्या शहरांमधील वाढत्या राहणीमानाच्या खर्चामुळे घरभाडे भत्त्यात वाढ करणे आवश्यक असल्याचे शिक्षकांचे म्हणणे आहे. यासह ते '१०-२०-३०' ही करिअर प्रोग्रेशन योजना लागू करण्याची आणि वार्षिक वेतनवाढ ३ टक्क्यांवरून ५ टक्क्यांपर्यंत वाढवण्याची मागणी करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com