8th Pay Commission: सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! पगारवाढ कधी होणार? एरियर आणि फिटमेंट फॅक्टरबाबत मोठी अपडेट समोर

8th Pay Commission Latest Update: आठव्या वेतन आयोगाचा अहवाल, संभाव्य पगारवाढ, फिटमेंट फॅक्टर आणि एरियरबाबत जाणून घ्या महत्त्वाचे अपडेट्स.
8th Pay Commission
8th Pay Commissionmeta ai
Published On: 

केंद्र सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांचं लक्ष सध्या आठव्या वेतन आयोगाकडे लागलं आहे. नवीन वेतन कधी लागू होणार, पगारात किती वाढ होणार आणि खात्यात थकबाकी म्हणजे एरियर जमा होणार का, असे अनेक प्रश्न कर्मचाऱ्यांना पडलेले आहेत. मात्र, ऑक्टोबर २०२६ पर्यंत नवीन वेतनाची निश्चित तारीख आणि फिटमेंट फॅक्टर जाहीर झालेला नसल्याने कर्मचाऱ्यांना आणखी प्रतीक्षा करावी लागू शकते.

आठव्या वेतन आयोगाचं काम कुठपर्यंत आलं?

दिलेल्या माहितीनुसार, ३ नोव्हेंबर २०२५ रोजी आठव्या वेतन आयोगाची स्थापना करण्यात आली. आयोगाला आपल्या शिफारशी सादर करण्यासाठी १८ महिन्यांचा कालावधी देण्यात आला आहे. त्यानुसार अहवाल सादर करण्याची निर्धारित मुदत ३ मे २०२७ आहे. सध्या आयोग कर्मचारी संघटना आणि संबंधित घटकांकडून वेतन, भत्ते आणि पेन्शनविषयीच्या सूचना घेत आहे.

8th Pay Commission
Money Saving Tips : मित्र असो वा नातेवाईक, पैशांच्या बाबतीत या ७ चुका कधीच करू नका

नवीन पगार कधी मिळणार?

आठव्या वेतन आयोगाच्या शिफारशी सादर झाल्यानंतर केंद्र सरकार त्यांचा विचार करेल. त्यानंतर अंमलबजावणीबाबत निर्णय घेतला जाईल. त्यामुळे मे २०२७ ही अहवाल सादर करण्याची मुदत असली, तरी त्याच दिवशी वाढीव पगार मिळेल असं नाही. नवीन वेतन प्रत्यक्षात कधी मिळणार, याची अधिकृत तारीख अद्याप स्पष्ट झालेली नाही.

8th Pay Commission
Gold Rate Today: नवरात्रीच्या पहिल्या दिवशी सोन्याचे दर वाढले की घसरले? जाणून घ्या आजचे २२ अन् २४ कॅरेटच्या किंमती

१ जानेवारी २०२६ पासून एरियर मिळणार?

आठवा वेतन आयोग १ जानेवारी २०२६ पासून लागू होण्याची चर्चा आहे. मात्र, ही संभाव्य तारीख आहे आणि प्रत्यक्ष पगार मिळण्याची तारीख वेगवेगळी असू शकते. सरकारने पूर्वलक्षी प्रभावाने वेतनवाढ लागू करण्याचा निर्णय घेतल्याने संबंधित कालावधीची थकबाकी मिळण्याची शक्यता आहे. मात्र, एरियरची तारीख आणि रक्कम अद्याप ठरलेली नाही.

फिटमेंट फॅक्टर किती असणार?

सातव्या वेतन आयोगात २.५७ फिटमेंट फॅक्टर वापरण्यात आला होता. आठव्या वेतन आयोगासाठी २.०, २.५ किंवा २.८ अशा आकड्यांची चर्चा होत असली, तरी अधिकृत फिटमेंट फॅक्टर जाहीर झालेला नाही. त्यामुळे सध्या पगारवाढीची ठरलेली रक्कम सांगता येत नाही.

किती कर्मचारी आणि पेन्शनधारकांना फायदा?

आठव्या वेतन आयोगामुळे केंद्र सरकारच्या सुमारे ५० लाख कर्मचारी आणि ६९ लाख पेन्शनधारकांना फायदा होण्याची अपेक्षा आहे. मात्र, अंतिम लाभ वेतन आयोगाच्या शिफारशी आणि केंद्र सरकारच्या निर्णयावर अवलंबून असतील.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com