8th Pay Commission: पेन्शनर्ससाठी मोठी खुशखबर! 8व्या वेतन आयोगात होणार हे 6 मोठे बदल

8th Pay Commission Pension : आठव्या वेतन आयोगाकडे पेन्शनर्सनी सात मोठ्या मागण्या मांडल्या आहेत. किमान पेन्शन ६७ टक्के, जास्त पेन्शन, कम्यूटेशन कालावधी घट आणि OPS, UPS,NPS निवडीची मागणी आहे.
8th Pay Commission
8th Pay Commissionmeta ai
Published On

तुम्ही सरकारी कर्मचारी असाल तर तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. केंद्र सरकारच्या जवळपास ६५ लाख पेन्शनधारक आणि संरक्षण कर्मचाऱ्यांसाठी आठव्या केंद्रीय वेतन आयोग महत्त्वाचा ठरणार आहे. न्यायमूर्ती रंजना प्रकाश देसाई यांच्या अध्यक्षतेखालील आयोग कर्मचारी, पेन्शनर्स आणि विविध संघटनांकडून सूचना आणि मागण्या जाणून घेत आहे. यामध्ये पेन्शनशी संबंधित अनेक महत्त्वाच्या मागण्या पुढे आल्या आहेत.

बेसिक पेन्शन ६७ टक्के करण्याची मागणी : कर्मचारी संघटनांनी अंतिम आहरित वेतन किंवा अंतिम १० महिन्यांच्या सरासरी वेतनाच्या बेसिक ६७ टक्के इतकी पेन्शन निश्चित करण्याची मागणी केली आहे.

8th Pay Commission
Gold Rate Today: खुशखबर! सोन्याच्या दरात मोठी घसरण; चांदीही झाली स्वस्त, वाचा 24, 22 आणि १८ कॅरटचे आठवडाभराचे दर

वयानुसार जास्त पेन्शन : ६५ वर्षांनंतर टप्प्याटप्प्याने जास्त पेन्शन देण्याची मागणी करण्यात आली आहे. ६५ वर्षे वयात ७० टक्के वयात ७५ टक्के वयात ८० टक्के , ८० वर्षात ८५ टक्के, ८५ वर्षात ९० टक्के आणि ९० वर्षांनंतर १०० टक्क्यांपर्यंत अतिरिक्त लाभ देण्याचा प्रस्ताव आहे.

8th Pay Commission
Healthy Breakfast : रोज एकच नाश्ता खाणाऱ्यांनो सावधान! या 6 गोष्टींकडे अजिबात दुर्लक्ष करू नका

कम्यूटेशन कालावधी कमी करणे: पेन्शनचा एक भाग कम्यूट केल्यानंतर पूर्ववत होण्यासाठी लागणारा १५ वर्षांचा कालावधी १० ते १२ वर्षांपर्यंत कमी करण्याची मागणी आहे.

पेन्शन रिव्हिजन आणि फिटमेंट फॅक्टर : १ जानेवारी २०२६ आधी रिटायर झालेल्या कर्मचाऱ्यांची पेन्शन आणि फॅमिली पेन्शन यांचे पुनरीक्षण स्पष्टपणे करण्यात यावे, तसेच फिटमेंट फॅक्टरमध्ये बदल करावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

महागाई भत्त्यात सुधारणा : वाढत्या महागाईचा विचार करून DR व्यवस्थेचा आढावा घेऊन त्याचे पेन्शन लाभांशी जास्त प्रभावी एकत्रीकरण करण्याची मागणी आहे.

ग्रेच्युटी आणि फॅमिली पेन्शन : ग्रेच्युटीची कमाल मर्यादा वाढवण्यासोबतच कुटुंबीयांना मिळणाऱ्या पेन्शनच्या व्याप्ती वाढवण्याची मागणी करण्यात आली आहे.

OPS, UPS किंवा NPS निवडीचा पर्याय : कर्मचाऱ्यांना त्यांच्या गरजेनुसार जुनी पेन्शन योजना (OPS), युनिफाइड पेन्शन स्कीम (UPS) किंवा NPS यापैकी योजना निवडण्याचा पर्याय द्यावा, अशीही मागणी आहे. आयोगाला अंतिम अहवाल सादर करण्यासाठी १८ महिन्यांची मुदत देण्यात आली असून, मिळालेल्या माहितीनुसार मे २०२७ पर्यंत अहवाल येण्याची शक्यता आहे. मात्र, शिफारशींची अंमलबजावणी केंद्र सरकार आणि केंद्रीय मंत्रिमंडळाच्या मंजुरीनंतरच होईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com