7th Pay Commission : केंद्र सरकारचा मोठा निर्णय! कर्मचाऱ्यांच्या भत्त्यांवर होणार परिणाम, पण कोणत्या? वाचा

7th Pay Commission News : केंद्र सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांच्या भत्त्याबाबतच्या नियमांमध्ये सुधारणा केली आहे. याचा फायदा १ जुलै २०२५ नंतर सेवेत रुजू होणाऱ्या नवीन कर्मचाऱ्यांनाही लागू होईल.
7th Pay Commission
7th Pay Commissionx
Published On
Summary
  • केंद्र सरकारने ७ व्या वेतन आयोगानुसार कर्मचाऱ्यांच्या भत्त्यांमध्ये सुधारणा केली आहे.

  • वर्षाच्या मध्यात रुजू होणाऱ्या किंवा निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांनाही ड्रेस भत्ता मिळेल.

  • जुलै २०२५ नंतर नोकरीत रुजू होणाऱ्या कर्मचाऱ्यांना नवीन नियमांचा फायदा होईल.

7th Pay Commission Updates : केंद्र सरकारच्या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांच्या भत्त्यांवर मोठा परिणाम होणार असल्याचे म्हटले जात आहे. सरकारने ड्रेस भत्त्याबाबतच्या नियमांत सुधारणा केल्या आहेत. निवृत्त आणि नव्याने भरती होणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी परिस्थिती स्पष्ट करताना टपाल विभागाने नवा आदेश जारी केला आहे. या आदेशामुळे वर्षाच्या मध्यात रुजू होणाऱ्या किंवा निवृत्ती घेणाऱ्या कर्मचाऱ्यांना दिलासा मिळणार आहे. नव्या नियमांनुसार, १ जुलै २०२५ नंतर नोकरीत रुजू होणाऱ्या कर्मचाऱ्यांना याचा फायदा होईल.

२४ सप्टेंबर २०२५ रोजी जारी करण्यात आलेल्या आदेशानुसार, वर्षाच्या मध्यात रुजू होणाऱ्या किंवा निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना आता प्रो-रेटा आधारावर ड्रेस भत्ता दिला जाईल. कर्तव्यावर असताना गणवेश घालणे आवश्यक असलेल्या कर्मचाऱ्यांना ड्रेस भत्ता दिला जातो. ड्रेस भत्ता हे वेगवेगळ्या भत्त्यांचा एकत्रित रूप आहे. यामध्ये कपड्यांचा भत्ता, मूलभूत उपकरणांचा भत्ता, गणवेश देखभाल भत्ता, गाऊन भत्ता आणि बूट भत्ता यांचा समावेश होतो, असे अर्थ मंत्रालयाने ऑगस्ट २०१७ च्या परिपत्रकात म्हटले होते.

7th Pay Commission
Shreyas Iyer : लेट आला पण थेट उपकर्णधार झाला! भारताचा भावी Captain ठरला? श्रेयस अय्यरवर मोठी जबाबदारी

जुलै २०२५ नंतर निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी अर्थ मंत्रालयाकडून स्पष्टीकरण मागवण्यात आले. तोपर्यंत २०२० चे जुने नियम लागू राहतील, असे जून २०२५ च्या आदेशात म्हटले होते. नव्याने भरती होणाऱ्या कर्मचाऱ्यांना वर्षानुसार ड्रेस भत्ता मिळतो, त्याचप्रमाणे वर्षाच्या मध्यात निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना देखील प्रमाणानुसार ड्रेस भत्ता मिळेल, असे आता अर्थ मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.

7th Pay Commission
Zubeen Garg Death : अपघाताचा बनाव; बॉलिवूड गायकाच्या मृत्यूबाबत मोठी अपडेट, सिंगापूरमध्ये विषबाधा झाल्याचा खुलासा

ड्रेस भत्ता जुलैच्या पगारासह दिला जातो. त्यामुळे या वर्षी निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांनी आधीच पूर्ण किंवा अर्धा भत्ता मिळणार आहे. नवीन नियमांनुसार, ऑक्टोबर २०२५ पासून निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना आवश्यक असल्यास अतिरिक्त देयकाची वसुली करावी लागेल. पण ३० सप्टेंबर २०२५ पूर्वी निवृत्ती घेणाऱ्या कर्मचाऱ्यांकडून कोणतीही वसुली केली जाणार नाही. जुलै २०२५ पूर्वी रुजू होणाऱ्या कर्मचाऱ्यांना जून २०२५ पर्यंत लागू असलेल्या नियमांनुसार ड्रेस भत्ता मिळेल.

7th Pay Commission
Pune Crime : दुचाकीला धक्का लागल्यावरुन वाद! तरुणांमध्ये तुफान हाणामारी; एकाचा मृत्यू, दुसरा गंभीर जखमी

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com