September Rule Changes : 1 सप्टेंबरपासून 5 मोठे नियम बदलणार! तुमच्या खिशावर होणार थेट परिणाम

FD Rules : 1 सप्टेंबरपासून LPG e-KYC, ITR, अशा महत्त्वाच्या गोष्टींमध्ये महत्त्वाचे बदल होणार आहेत. या नियमांचा सामान्य नागरिकांच्या खर्च, बचत आणि आर्थिक व्यवहारांवर परिणाम होऊ शकतो.
September Rule Changes
September Rule Changesmeta ai
Published On

सर्वसामान्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. ऑगस्ट महिना संपत आला असून १ सप्टेंबर २०२६ पासून अनेक महत्त्वाचे नियम आणि प्रोसेसमध्ये बदल होणार आहेत. याचा थेट परिणाम सामान्य नागरिकांच्या खर्च, बचत, प्रवास आणि आर्थिक व्यवहारांवर होऊ शकतो. LPG सिलेंडर, FD, आयकर आणि आंतरराष्ट्रीय प्रवासाशी संबंधित बदलांकडे विशेष लक्ष देणं गरजेचं आहे.

September Rule Changes
8th Pay Commission: सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार वाढणार! Fitment Factor पासून Pay Matrix पर्यंत 5 मोठे अपडेट

आंतरराष्ट्रीय प्रवाशांना बोर्डिंग पासवर स्टॅम्पची गरज नाही

१ सप्टेंबरपासून भारतातून परदेशात जाणाऱ्या प्रवाशांना इमिग्रेशन काउंटवर बोर्डिंग पासवर स्टॅम्प घेण्याची आवश्यकता राहणार नाही. मोबाईलवरील इलेक्ट्रॉनिक बोर्डिंग पास किंवा त्याची प्रिंटेड कॉपी दाखवून इमिग्रेशन प्रोसेस पूर्ण करता येईल. यामुळे प्रोसेस जास्त सोपी आणि जलद होण्याची शक्यता आहे.

September Rule Changes
Gold Price Today: सोनं खरेदी करणाऱ्यांसाठी मोठी बातमी! आज पुन्हा सोनं स्वस्त, वाचा २४, २२ आणि १८ कॅरेटचा भाव

ITR भरण्यासाठी महत्त्वाची मुदत

Assessment Year 2026-27 साठी ज्या करदात्यांच्या खात्याचे ऑडिट गरजेचं नाही, त्यांच्यासाठी ३१ ऑगस्ट २०२६ पर्यंत ITR दाखल करण्याची मुदत दिली आहे. ITR-4 हा प्रिझम्प्टिव्ह टॅक्सेशन अंतर्गत पात्र व्यक्तींसाठी वापरला जातो, तर ITR-3 इतर व्यावसायिक किंवा ट्रेडिंग उत्पन्न असलेल्या व्यक्तींसाठी लागू होऊ शकतो.

मोठ्या FD संदर्भातले नियम

३ कोटी किंवा त्याहून जास्त रकमेच्या मोठ्या ठेवींवरच्या व्याजदरांमध्ये पारदर्शकता वाढवण्यासाठी नियम बदलणार आहेत. बँकांना संबंधित व्याजदर वेबसाइटवर नियमितपणे जाहीर करायला लागतील. मात्र सामान्य ग्राहकांच्या छोट्या FD वर या बदलाचा थेट मोठा परिणाम होण्याची शक्यता कमी आहे.

LPG e-KYC साठी शेवटची संधी

ज्या ग्राहकांनी २३ ऑगस्टपर्यंत LPG e-KYC पूर्ण केली नाही, त्यांच्यासाठी अंतिम मुदतही ३१ ऑगस्ट २०२६ पर्यंत वाढवण्यात आल्याचे सांगितले आहे. त्यामुळे 1 सप्टेंबरनंतर e-KYC न केलेल्या ग्राहकांना घरगुती दराचा लाभ मिळण्यावर परिणाम होऊ शकतो.

LPG, FD आणि इतर दरांवर लक्ष ठेवा

सप्टेंबरमध्ये LPG सिलेंडरचे दर, FD व्याजदर आणि ATFच्या किमतींमध्ये बदल होण्याची शक्यता आहे.तसेच ATM शुल्कातही बदल होऊ शकतो. त्यामुळे महिन्याच्या सुरुवातीला नवीन दर आणि नियम तपासणे महत्त्वाचे ठरणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com