Deadline End In March : ३१ मार्चपूर्वी करा ही महत्त्वाची कामे, अन्यथा होईल मोठं नुकसान

31st March 2024 Financial Deadline Last Date : मार्च महिना संपण्यापूर्वी काही महत्त्वाची कामे न केल्यास तुम्हाला आर्थिक फटका बसू शकतो. मार्च महिन्यात वर्षभराच्या आर्थिक कामांची नोंद केली जाते.
Deadline End In March, 31st March 2024 Financial Deadline Last Date
Deadline End In March, 31st March 2024 Financial Deadline Last Date Saam Tv
Published On

Financial Deadline :

मार्च महिना संपण्यापूर्वी काही महत्त्वाची कामे न केल्यास तुम्हाला आर्थिक फटका बसू शकतो. मार्च महिन्यात वर्षभराच्या आर्थिक कामांची नोंद केली जाते. एप्रिल महिन्यापासून नवीन आर्थिक वर्ष सुरु होते.

३१ मार्च संपण्यापूर्वी काही आर्थिक कामे लवकरात लवकर पूर्ण करा. ऑनलाइन पेमेंट करण्यापासून ते बँकेशी (Bank) संबंधित कामांपर्यंत अनेक कामे आहेत जी वेळेवर पूर्ण करायला हवी. जाणून घेऊया त्याबद्दल सविस्तर

1. आयटीआर फाइल करण्याची अंतिम मुदत

आर्थिक वर्षाचा आयटीआर फाइल करण्याची अंतिम मुदत ही ३१ मार्च २०२४ आहे. हा अंतिम मुदत अशा करदात्यांसाठी आहे ज्यांनी आर्थिक वर्ष २०२०-२१ चे रिटर्न भरले नसेल. किंवा त्यांची माहिती व्यवस्थित भरली नसेल. करदात्यांना २४ महिन्यांच्या आत म्हणजेच मूल्यांकन वर्षाच्या शेवटच्या दिवसापासून ते २ वर्षाच्या आत रिटर्न भरण्याची सुविधा आहे.

Deadline End In March, 31st March 2024 Financial Deadline Last Date
Petrol Diesel Rate (26th March 2024): महाराष्ट्रात आज पेट्रोल-डिझेलचा भाव किती? १ लीटर इंधनासाठी किती पैसे मोजावे लागतील?

2. कर बचत योजना

जर तुम्ही जुनी कर (Tax) प्रणाली योजना निवडली असेल आणि आर्थिक वर्ष २०२३-२४ साठी कर सवलत मिळवण्यासाठी जर तुम्ही कोणत्या योजनेत गुंतवणूक (investment) करत असाल तर अंतिम तारीख ३१ मार्च २०२४ आहे. यासाठी तुम्ही सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (PPF), इक्विटी-लिंक्ड सेव्हिंग स्कीम (ELSS) आणि मुदत ठेव (FD) सारख्या विविध कर बचत योजनेत गुंतवणूक करु शकता. तसेच याशिवाय तुम्ही आरोग्य विमा प्रीमियम, शैक्षणिक कर्ज आणि गृह कर्ज यांसारखे खर्च यांसारख्या काही इतर पर्यायही आहेत.

3. गुंतवणुकीची अंतिम मुदत

PPF किंवा सुकन्या समृद्धी योजना (SSY)सारख्या सरकारी लहान बचत योजनांसाठी ५०० रुपये आणि २५० रुपये वार्षिक किमान गुंतवणूक आवश्यक आहे. जर यामध्ये तुमची किमान ठेवी चुकल्यास तुमचे खाते डिफॉल्टमध्ये जाऊ शकते. यामध्ये तुम्हाला दंडही आकारला जाऊ शकतो.

Deadline End In March, 31st March 2024 Financial Deadline Last Date
Tax Savings : पत्नीच्या खात्यात पैसे ट्रान्सफर करुनही वाचवता येईल कर; वाचा काय आहे नियम?

4. TDS प्रमाणपत्र

करदात्यांना ३१ मार्च २०२४ पूर्वी टीडीएस प्रमाणपत्र जारी करावे लागेल. त्यांना विविध कलमांतर्गत कपात केलेल्या कर कपातीचा तपशील द्यावा लागेल.

5. फास्टॅग केवायसी

भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI)ने FASTag KYC तपशील अपडेट करण्याची अंतिम मुदत २९ फेब्रुवारी ते ३१ मार्च २०२४ पर्यंत वाढवण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com