Income Tax Return: दोन कोटी करदात्यांना मिळाला रिफंड, आयकर विभागाकडून ६ कोटी रिटर्नची प्रक्रिया, अशाप्रकारे तपासा तुमचा रिफंड

Tax Refund online : केंद्रीय प्रत्यक्ष कर बोर्डकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार,आतापर्यंत २.४५ कोटी करदात्यांना कर रिफंड करण्यात आलेत.
Income Tax Return
Income Tax ReturnSaam Tv
Published On

Income Tax Return online:

आयकर विभागानुसार आर्थिक वर्ष २०२२-२३ साठी ३१ जुलै २०२३ पर्यंत एकूण ६.७७ आयकर परतावा अर्ज दाखल करण्यात आले होते. यातील ६ कोटी आयटीआर पुढील प्रक्रियेसाठी पाठवण्यात आलेत. आतापर्यंत २.४५ कोटी करदात्यांना कर रिफंड करण्यात आलेत. तुम्हीही कर भरणारे असाल तर तुम्हाला रिफंड मिळालाय का? याची माहिती करण्यासाठी तुम्हाला ऑनलाईन रिफंड स्टॅटेस तपासावे लागतील.(Latest News on business)

केंद्रीय प्रत्यक्ष कर बोर्ड(सीबीडीटी) नुसार, आयकर विभागानं वर्ष २०२३-२४ साठी आतापर्यंत पडताळी करण्यात आलेले ६.८४ कोटीमधील ६ कोटीपेक्षा जास्त करदात्यांचे रिटर्न प्रोसेस करण्यात आलेत. ५ सप्टेंबर२०२३ पर्यंत ६.९८ कोटी आयटीआर दाखल करण्यात आले होते. तर ६.७७ कोटी आयटीआर ३१ जुलैपर्यंत दाखल करण्यात आले. केंद्रीय प्रत्यक्ष कर बोर्डानुसार दाखल करण्यात आलेल्या ६.९८ आयटीआरपैकी २.४५ कोटी करदात्यांना कर परतावा देण्यात आलाय. तर इतर करदात्यांनाही लवकरच रिफंड केली जाण्याची प्रक्रिया केली जातेय.

Income Tax Return
Gold Silver Price (7th September) : दहीहंडीला फुटला सोन्याचा भाव, चांदीही गडगडली; मुंबईत आज सोन्याचा दर किती?

ज्या करदात्यांना आतापर्यंत कराचा परतावा मिळाला नाही. तसेच ज्या करदात्यांना परतावा मिळाला नाही, अशा लोकांनी कर रिफंड स्टेटस तपासून घ्यावं. यासाठी त्यांना अधिकृत वेबसाईट incometaxindiaefiling.gov.in वर जाऊन स्टेटस तपासावे लागेल. दरम्यान जेव्हा आयकर विभागाकडून रिफंड दिला जातो. तेव्हा आयकर विभागाकडून नोंदणीकृत असलेल्या मोबाईल नंबर आणि इमेलवर माहिती दिली जाते.

दरम्यान जेव्हा करदात्यांकडून आयटीआरला व्हेरिफाय केलं जातं, तेव्हा आयकर विभाग कर रिटर्न करण्याची प्रक्रिया सुरू करते. करदात्याच्या बँक खात्यात कर रिफंड केलं जातं. करदात्यांच्या बँकखात्यात कर रिफंड होण्यासाठी साधारण ४ ते ५ आठवडे लागतात. तर काही प्रकरणात रिटर्न दाखल होण्यास ७ ते ८ दिवसाचा वेळ लागत असतो.

Income Tax Return
LIC Pension Scheme: एलआयसीची जबरदस्त योजना! फक्त एकदा गुंतवणूक करा, दरमहा मिळेल पेन्शन

ऑनलाईन कर रिफंड स्टेटस तपासण्याची पद्धत

  • आयकर विभागाची अधिकृत वेबसाईट incometaxindiaefiling.gov.inवर जावे लागेल.

  • आता आपला यूझर आयडी, पॅनकार्ड, आणि कॅप्चा कोड टाकावा लागेल.

  • आता कर रिफंड पाहण्यासाठी पर्यायाला निवडावे लागेल.

  • यानंतर एक पर्याय निवडल्यानंतर आयकर रिटर्नवर क्लिक करावं लागेल.

  • आर्थिक वर्ष निवडून सबमिट केल्यानंतर तुम्ही तुमचा कर रिफंड स्टेटस पाहू शकतात.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com