Post Office Best Scheme: पोस्ट ऑफिसची जबरदस्त योजना, 2 लाखांच्या गुंतवणूकीवर मिळणार ₹90,000; समजून घ्या गणित

Post Office Time Deposit Scheme: पोस्ट ऑफिस टाइम डिपॉझिट योजनेत तुम्हाला जबरदस्त परतावा मिळतो. २ लाखांच्या गुंतवणुकीवर तुम्हाला ९० हजार रुपयांचा फायदा मिळू शकतो. याचं गणित पुढील बातमीत समजून घ्या.
post office
post office monthly income scheme Saam tv
Published On

प्रत्येक व्यक्तीला गुंतवणूक केल्याने भविष्यात मोठा फायदा होऊ शकतो. जर योग्य वेळी आणि योग्य वयात गुंतवणुक करायला सुरुवात केली तर भविष्यात तुम्हाला त्याचा डबल फायदा होतो. जर तुम्ही आता गुंतवणुकीचा विचार करत असाल तर पोस्ट ऑफिसच्या सरकारी योजना तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरतील. चला जाणून घेऊयात याची माहिती.

गुतंवणूकीवर व्याज किती?

पोस्ट ऑफिस टाइम डिपॉझिट स्कीममध्ये तुम्हाला गुंतवणूक केल्याने भविष्यात जास्त प्रमाणात फायदा मिळू शकतो. यामध्ये तुम्हाला २ लाखांच्या गुंतवणुकीवर ९०००० रुपयांचा परतावा मिळतो. अशा अनेक योजना पोस्ट ऑफीसमध्ये राबविल्या जातात. त्यामध्ये लहान मुलांपासून ते जेष्ठ नागरिक, तरुण आणि महिलांसाठी अनेक बचतीच्या योजना राबविल्या जातात. पोस्ट ऑफिस मुदत ठेव योजनेचे असे अनेक फायदे आहेत. तर या योजनांमध्ये गुंतवणूक दारांना ७.५ टक्के इतकं व्याज मिळतं.

post office
High Blood Pressure: हाय ब्लड प्रेशरचा धोका टाळायचा आहे? आजच आहारातून गायब करा 'हे' ५ पदार्थ; आठवड्याभरात दिसेल फरक

एकूण कालावधी आणि गुतंवणूकीचा आकडा Post Office Time Deposit Scheme योजनेमध्ये तुम्हाला ५ वर्षे गुंतवणूक करावी लागते. यामध्ये १,००० रुपयांपासून गुंतवणूक करता येते. १० वर्षांवरील मुलांचे अकाउंट हे त्यांच्या पालकांच्यामार्फत उघडता येतं. गुंतवणुकीची यामध्ये मर्यादा नाही. तुम्हाला हवी तितकी रक्कम तुम्ही महिन्याला गुंतवू शकता आणि तुम्हाला त्यावर ७ टक्क्यांनी व्याज मिळतं.

महत्वाचा मुद्दा

पोस्टाच्या या सरकारी योजनेत तुम्हाला तुम्ही तुम्हाला हवे तितकी दिवस गुंतवणुक करू शकता. म्हणजे, हे. १ वर्ष, २ वर्षे, ३ वर्षे आणि ५ वर्षांपर्यंतचे कालावधी वेगवेगळ्या व्याजदरांसह निवडता येतो. पण तुम्हाला १ वर्षाच्या गुंतवणुकीवर ६.९ टक्के व्याज मिळतं. तर २ किंवा ३ वर्षांच्या गुंतवणुकीवर ७ टक्के व्याज मिळतं. तर ५ वर्षांच्या गुंतवणुकीवर ७.५ टक्के सर्वात जास्त व्याज मिळतं. यामध्ये तुम्ही २ लाख रुपये गुंतवून ९०,००० रुपये कमवू शकता. जर तुमची रक्कम पाच वर्षात २ लाख झाली तर तुम्हाला ७ टक्क्यांनी २,८९,९९० रुपये व्याजासकट मिळतील.

post office
Raja Shivaji Movie: 'राजा शिवाजी' सिनेमामुळं उलगडला इतिहास; छत्रपती शिवरायांच्या जवळच्या व्यक्तींबद्दल माहितीये का?
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com