Breaking News Live Updates: INDIA आघाडी बैठक; आधी जागा जिंकू मगच पंतप्रधान ठरवू: खरगे

Maharashtra Breaking Updates Live in Marathi: आज मंगळवार १९ डिसेंबर २०२३, देश विदेशासह महाराष्ट्रातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट वाचा फक्त साम टीव्हीवर...
Maharashtra  latest batmya 19 December 2023 Vidhan Sabha Hiwali adhiveshan maratha reservation marathi news Maharashtra Politics Assembly Winter Session 2023 Live
Maharashtra latest batmya 19 December 2023 Vidhan Sabha Hiwali adhiveshan maratha reservation marathi news Maharashtra Politics Assembly Winter Session 2023 Live SAAM TV
Published On

INDIA आघाडी बैठक; आधी जागा जिंकू मगच पंतप्रधान ठरवू: खरगे

आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपचा पराभव करण्याच्या उद्देशाने स्थापन करण्यात आलेल्या विरोधी पक्षांच्या 'INDIA' आघाडीच्या नेत्यांची आज दिल्लीत महत्त्वाची बैठक पार पडली. आघाडी स्थापन झाल्यापासूनची ही चौथी बैठक होती. या बैठकीतून काँग्रेसचे विद्यमान अध्यक्ष मल्लिकार्जन खर्गे 'INDIA' आघाडीचे पंतप्रधानपदाचे उमेदवार असू शकता, असे संकेत मिळाले.

सुधाकर बडगुजर यांची आज पुन्हा चौकशी

ठाकरे गटाचे महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर यांची आज पुन्हा चौकशी होत आहे. आज चौथ्यांदा बडगुजर यांची चौकशी होत आहे. काल प्रकृती अस्वास्थतेमुळे बडगुजर चौकशीसाठी गैरहजर होते.नाशिक पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या कार्यालयात चौकशी सुरू आहे. नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक हे स्वतः चौकशी करत आहेत. सुधाकर बडगुजर यांच्यावर बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी सलीम कुत्ता याच्यासोबत पार्टी केल्याचा आरोप आहे.

Maratha Reservation : फेब्रुवारीत विशेष अधिवेशन घेणार; मराठा आरक्षणावर CM शिंदेंची विधानसभेत मोठी घोषणा

मराठ समाजाच्या आरक्षणाविषयी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत मोठी घोषणा केलीय. आरक्षणासाठी क्युरेटिव्ह याचिका हा एक आशेचा किरण आहे. त्यातील त्रुटी दूर करण्याचा प्रयत्न सरकार करत आहे. मराठा समाजाला कायद्याच्या चौकटीत बसवणारा आरक्षण देणार आहे.

INDIA Allaince Meeting : इंडिया आघाडीच्या बैठकीत कोणत्या मुद्द्यावर चर्चा?

नवी दिल्लीत इंडिया आघाडीची बैठक झाली. संसदेतून विरोधी पक्षांच्या खासदारांच्या निलंबनाच्या मुद्द्यावर या बैठकीत चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. तसेच ईव्हीएमच्या मुद्द्यावरही चर्चा झाल्याचे सांगण्यात येते.

सुधाकर बडगुजर यांची पुन्हा चौकशी

ठाकरे गटाचे महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर यांची आज पुन्हा चौकशी

काल प्रकृती अस्वास्थ्यामुळे बडगुजर चौकशीला गैरहजर

आज चौथ्यांदा बडगुजर यांची होत आहे चौकशी

नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्याकडून चौकशी

नाशिक पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या कार्यालयात सुरू आहे चौकशी

सुधाकर बडगुजर यांच्यावर बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी सलीम कुत्ता याच्यासोबत पार्टी केल्याचा आरोप

मराठ्यांना आरक्षण मिळालंच पाहिजे - एकनाथ शिंदे

मराठा समाजाला आरक्षण मिळालंच पाहिजे, असं विधान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत केलं. मराठा समाजाला टिकणारं आरक्षण मिळायला हवं, असा पुनरुच्चारही त्यांनी केला.

मातोश्रीबाहेर हनुमान चालीसा पठण प्रकरण- राणा दाम्पत्याला सत्र न्यायालयाचा झटका

राणा दाम्पत्याला सत्र न्यायालयाचा झटका

गुन्ह्यातून दोषमुक्त करण्यासाठी केलेला अर्ज न्यायालयाने फेटाळला

तांत्रिक कारणांवर दोषमुक्त करण्यासाठी केला होता अर्ज

न्यायाधीश राहुल रोकडे यांनी दिला निर्णय

राणा दाम्पत्याला दोषमुक्त करण्यास पोलिसांनी केली होता विरोध

मनोज जरांगे पुन्हा कडाडले; म्हणाले, २४ तासांनंतर एकही तास सरकारला देणार नाही!

मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला पुन्हा निर्वाणीचा इशारा दिला आहे. मराठा आरक्षणाच्या मुद्यावर विशेष अधिवेशन घेण्यापेक्षा याच अधिवेशनाचा कालावधी वाढवून त्यात कायदा करावा, असे जरांगे म्हणाले.

२४ डिसेंबरनंतर एकही तास सरकारला देणार नाही. दिलेल्या तारखेवर आम्ही ठाम आहोत. अधिवेशनाचा कालावधी वाढवा, आम्ही मुदत वाढवणार नाही, असंही त्यांनी ठणकावून सांगितलं.

बहुमताच्या जोरावर अधिवेशन गुंडाळण्याचा निर्णय, विरोधकांचा सत्ताधाऱ्यांवर आरोप

दोन दिवस विदर्भातील मुद्द्यांवर चर्चा व्हावी अशी भूमिका विरोधी पक्षांची होती, पण बहुमताच्या आधारावर अधिवेशन गुंडाळण्याचा निर्णय घेतला, असा आरोप विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला.

मराठा आरक्षणासाठी आणखी एका तरूणानं संपवलं जीवन, बीडमधील घटना

Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी आणखी एका तरूणानं मृत्यूला कवटाळलं. धर्मराज डाके असं या तरुणाचं नाव आहे. आरक्षण मिळत नाही. आर्थिक परिस्थिती बिकट असल्यानं मुलांना शिक्षण देता येत नाही, असं त्यानं मृत्यूपूर्वी चिठ्ठीत लिहून ठेवलं होतं. बीडमधील माजलगाव तालुक्यात ही घटना घडली.

Manmad News : करवाढीविरोधात ठाकरे गट आक्रमक, पालिकेच्या गेटवर ठिय्या

मनमाड नगरपालिकेने केलेल्या करवाढीच्या विरोधात; तसेच नागरिकांना भेडसावणाऱ्या समस्यांप्रश्नी शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख गणेश धात्रक यांच्या नेतृत्वाखाली पालिकेच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर शिवसैनिकांनी ठिय्या मांडला. प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. शहरातील पाणीपुरवठ्याचे नियोजन, शहरातील स्वच्छता राखावी यांसह अन्य मागण्या आंदोलनकर्त्यांनी केल्या.

Supriya Sule Reaction: लोकसभेतून निलंबित केल्यानंतर सुप्रिया सुळे कडाडल्या; म्हणाल्या, लोकशाहीतील हा काळा दिवस!

संसदेच्या हिवाळी अधिवेशनात निलंबनाची कारवाई केल्यानंतर सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ही निषेधार्ह बाब आहे. भारतीय लोकशाहीतील काळा दिवस आहे. ही आणबाणीच असल्यासारखे आहे, असं त्या म्हणाल्या.

INDIA Allaince Meet : इंडिया आघाडीच्या बैठकीला थोड्याच वेळात सुरुवात

INDIA आघाडीच्या बैठकीला थोड्याच वेळात सुरुवात होणार

उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खर्गे बैठकीसाठी पोहोचले

मेहबुबा मुफ्ती देखील बैठकीसाठी पोहोचल्या

Varsha Gaikwad : देशाची लोकशाहीच सस्पेंड झाली, खासदारांच्या निलंबनावरून वर्षा गायकवाड यांचा केंद्र सरकारवर हल्लाबोल

संसदेची सुरक्षा भेदून काहीजण सभागृहात प्रवेश करतात. सभागृहात गोंधळ घालतात. या घटनेनंतर देशाच्या सुरक्षेचा निर्माण झाला असताना देशाच्या गृहमंत्र्यांनी स्वत:हून राजीनामा देण्याची गरज होती. मात्र यावरून प्रश्न विचारणाऱ्या खासदारांचंच निलंबन करण्यात आलं आहे. केंद्रातील मोदी सरकारकडून दडपशाही सुरू असून आपण आधीपासूनच याविषयी बोलत आलो आहोत की लोकशाहीच सस्पेंड झाली आहे, अशी गंभीर टीका काँग्रेसच्या आमदार वर्षा गायकवाड यांनी केली आहे. यावर जनतेने चिंतन करण्याची गरज आहे. तसेच त्या खासदारांना का निलंबित केलं हा देखील प्रश्न विचारण्याची गरज असल्याच त्या म्हणाल्या

Fishing Boat Fire at Karanja : उरणमधील करंजा जेट्टीवर मच्छिमार बोटीला आग

उरण येथील करंजा येथे जेट्टीवर उभ्या मच्छिमार बोटीला लागली आग

अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहोचल्या

अग्निशमन दलाच्या जवानांनी आगीवर मिळवले नियंत्रण

आगीचे कारण अद्याप अस्पष्ट

आगीत मच्छिमार बोट पूर्ण जळून खाक

सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही.

Ajit Pawar NCP Faction : घरपट्टीवाढीच्या विरोधात राष्ट्रवादी अजित पवार गट आक्रमक

धुळे महानगरपालिकेच्या महासभेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नगरसेवक, पदाधिकारी आक्रमक

महासभेमध्ये मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी करत सत्ताधाऱ्यांना वाढीव घरपट्टीसंदर्भात केला विरोध

राष्ट्रवादी अजित पवार गटाने गदारोळ केल्यामुळे महासभेत उडाला गोंधळ

सत्ताधाऱ्यांच्या विरोधामध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाने घोषणाबाजी करत नोंदवला निषेध

Breaking News Live Updates: मंत्री छगन भुजबळांसह कुटुंबियांना हायकोर्टाचा दिलासा

मंत्री छगन भुजबळ यांच्यासह भुजबळ कुटुंबियाना हायकोर्टाने मोठा दिलासा दिला आहे. आयकर विभागाने बेनामी अपसंपदा सदर्भात केलेल्या ४ तक्रारी कोर्टाने रद्द केल्या आहेत. छगन भुजबळ, समीर आणि पंकज यांच्याशी निगडीत या मालमत्ता होत्या.

सप्टेंबर २०२१ मध्ये आयकर विभागाने विशेष कोर्टात तक्रारी दाखल करत मालमत्ता तात्पुरत्या स्वरुपात जप्त केल्या होत्या. मात्र, आज न्यायाधीश आर एन लढ्ढा यांच्या एक्कल पीठाने आयकर विभागाच्या तक्रारी केल्या रद्द केल्या आहेत. २०१६ चा कायदा जुन्या प्रकरणांना लागू होत नाही, अशी टिप्पणी करत कोर्टाने हा निर्णय दिला आहे.

पंढरपुरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे नियोजन; ५ लाख भाविक पंढरीत येणार

मार्गशीर्ष महिन्यात पंढरपुरात 25 डिसेंबर ते 1 जानेवारी दरम्यान प्रदीप शर्मा यांच्या शिव‌पुराण कथा व रस महोत्सवासह विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमासाठी विविध राज्यातून सुमारे पाच ते सहा लाख भाविक पंढरीत येणार आहेत.

पंढरीत येणाऱ्या भाविकांना विठ्ठल रूक्मिणीचे सुलभ दर्शन व्हावे, यासाठी मंदिर समितीने दर्शन बारीची व्यवस्था केली आहे. गोपाळपूर रोडवरील मैदानात ४ नवीन पत्रशेड उभे केले आहेत. मंदिर समितीकडून दर्शन रांगेतील भाविकांना पाणी, चहा आणि नाष्टा देण्यात येणार आहे.

पुणे-नाशिक महामार्गावर कंटेनरला भीषण आग

पुण्यातील चाकण एमआयडीसीतून नाशिकच्या दिशेने जाणाऱ्या कंटेनरचा अचानक समोरील टायर फुटला. त्यामुळे कंटेनर अनियंत्रित होऊन रस्त्याच्या कडेला उतरला. क्षणार्धात आगीचा भडका उडाल्याने चालक-वाहकांनी उड्या घेत आपले प्राण वाचविले. परंतु कंटेनरमधील लाखो रुपयांचे ऑटो स्पेयर पार्ट जळून खाक झाले आहेत.

मोठी बातमी! स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर पोलिसांच्या ताब्यात

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. तुपकर यांनी शेतकरी प्रश्नावर आक्रमक भूमिका घेत नागपूर येथील विधिमंडळावर मोर्चा काढला होता. या मोर्चामध्ये अनेक शेतकऱ्यांनी सहभाग घेतला होता. दरम्यान,विधानभवानावर मोर्चा धडकण्याआधीच पोलिसांनी रविकांत तुपकर यांच्यासह स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं आहे.

मध्य प्रदेशात शिवराजसिंह बदलले तसं मोदींनाही बदलू शकतात - उद्धव ठाकरे

Breaking News Live Updates: उपमुख्यमंत्री अजित पवार CM शिंदेंच्या भेटीला; मराठा आरक्षणावर मोठा निर्णय होणार?

मराठा आरक्षणासंदर्भात आज मोठा निर्णय होण्याची शक्यता आहे. कारण, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात मराठा आरक्षणावर निवेदन मांडणार आहे. मात्र, त्यांच्या निवेदनापूर्वीच उपमुख्यमंत्री अजित पवार हे शिंदेंच्या भेटीला गेले आहेत. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी रामगिरी निवास्थानी दाखल झाले आहेत. अजित पवार यांच्यासोबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील आहेत. त्यामुळे या तीन बड्या नेत्यांमध्ये काय चर्चा होणार? याकडेच सर्वांचं लक्ष लागून आहे.

Breaking News Live Updates: दिल्ली, महाराष्ट्रासह ४ राज्यांमध्ये NIA ची छापेमारी; अनेक संशयित ताब्यात

राष्ट्रीय तपास संस्थेने देशभरात पुन्हा एकदा छापेमारी केली आहे. सोमवारी दिल्ली आणि महाराष्ट्रासह ४ राज्यांमध्ये एनआयएचे पथक धडकले. यावेळी अनेक संशयितांना अटक करण्यात आली. अटक करण्यात आलेले संशयित इस्लामिक स्टेट ऑफ सीरिया अँड इराक (इसिस) नेटवर्कशी संबंधित असलयाचं सूत्रांनी सांगितलं. कट्टरपंथी जिहादी नेटवर्कला दणका देण्यात एनआयला मोठं यश मिळालं आहे.

Breaking News Live Updates: पुणेकरांसाठी आनंदाची बातमी; पिंपरी ते निगडी मेट्रोचे काम लवकरच सुरू होणार

पुणेकरांसाठी आनंदाची बातमी आहे. नवीन वर्षात पिंपरी ते निगडी मेट्रोचे काम सुरु होणार आहे. भक्ती-शक्ती चौकापर्यंत मेट्रो विस्तारीकरणाला केंद्राची मान्यता मिळाली आहे. त्यामुळे नवीन वर्षात या मार्गाच्या बांधकामाला सुरुवात होणार आहे. १३० आठवड्यात हे बांधकाम पूर्ण करण्याचे प्रशासनाचे नियोजन आहे. या मार्गावर चिंचवड स्टेशन, आकुर्डी आणि निगडी ही स्थानके असणार आहेत.

Breaking News Live Updates: मराठा आरक्षणासंदर्भात आज मोठा निर्णय होणार?

नागपूर येथे विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन सुरू आहे. अधिवेशनात आज मराठा आरक्षणाबाबत मोठा निर्णय होण्याची शक्यता आहे. दुसरीकडे मराठा आरक्षणासाठी नेमलेल्या न्या. शिंदे समितीने आपला दुसरा अहवाल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सोपवला आहे.

त्यासंदर्भात आज कॅबिनेटची बैठक होणार आहे. शिवसेना ठाकरे गटाचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची आज भेट घेणार आहेत. यासह देशविदेश आणि राज्यातील घडामोडींचे अपडेट्स वाचा फक्त साम टीव्हीवर

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com