Bollywood & Drugs : बाॅलिवूडचा हा कोणता चेहरा?

प्रत्येक बाॅलिवूड पार्टीमध्ये ड्रग्जचं सेवेन होत आहे, हेच चित्र समोर येत आहे. सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूनंतर बाॅलिवूडमध्ये ड्रग्जचा मोठा शिरकाव झाला आहे हे लोकांसमोर आलं आहे.
Bollywood & Drugs : बाॅलिवूडचा हा कोणता चेहरा?
Bollywood & Drugs : बाॅलिवूडचा हा कोणता चेहरा? साम टीव्ही
Published On

बाॅलिवूड एक स्वप्न नगरी! या स्वप्ननगरीमध्ये येऊन किती तरी लोकांनी आपली स्वप्न पूर्ण केली आहेत. या क्षेत्रात येऊन कित्येक लोकांनी आपलं आयुष्य बदलून टाकलं आहे. पण आता याच बाॅलिवूडचा चुकीचा चेहेरा लोकांसमोर येतोय.

तो चेहरा आहे DRUGS चा! मागच्या वर्षापासून बाॅलिवूडचं ड्रग्ज कनेक्शन हे लोकांसमोर आलं आहे. प्रत्येक बाॅलिवूड पार्टीमध्ये ड्रग्जचं सेवेन होत आहे, हेच चित्र समोर येत आहे. सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूनंतर बाॅलिवूडमध्ये ड्रग्जचा मोठा शिरकाव झाला आहे हे लोकांसमोर आलं आहे. काल, रात्री शाहरूख खानचा मुलगा आर्यन खान याला NCB ने एका रेल पार्टीत ड्रग्ज प्रकरणात चौकशीसाठी ताब्यात घेतलं. आर्यन खान आणि आणखी ६ लोकांना अटक करण्यात आली आहे.

Bollywood & Drugs : बाॅलिवूडचा हा कोणता चेहरा?
Aaryan Khan : अखेर शाहरुखचा मुलगा आर्यन खानला अटक! पहा Video

पण हे काय पहिल्यांदा झालं नाही, बाॅलिवूडमध्ये नेहमीच ड्रग्जचे कनेक्शन समोर आल्याचे आपल्याला पाहायला मिळाले आहे. या अगोदर दिपीका पदुकोनला सगळ्यात पहिल्यांदा NCB ने चौकशीसाठी बोलावलं होतं. त्यांनतर भारती सिंग आणि तिचा नवरा हर्ष यांच्या ही घरी देखील ड्रग्ज सापडले होते आणि त्यांना देखील अटक ही करण्यात आली होती. खरं तर बाॅलिवूडमध्ये ड्रग्जचा विषय काही नवीन नाही. मात्र, या सगळ्यांमध्ये जर ही गोष्ट कलाकारांच्या मुलांपर्यंत पोहचली असेल तर मात्र यावरती विचार होणे आवश्यक आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com