Aaryan Khan : अखेर शाहरुखचा मुलगा आर्यन खानला अटक! पहा Video

मुंबईतील जेजे रुग्णालयात वैद्यकीय चाचणी पार पडल्यानंतर आर्यन खानला NCB कडून अटक करण्यात आली असून, थोड्याच वेळात त्याला कोर्टात हजर करण्यात येणार असल्याची सूत्रांकडून समोर आली आहे.
Aaryan Khan : अखेर शाहरुखचा मुलगा आर्यन खानला अटक! पहा Video
Aaryan Khan : अखेर शाहरुखचा मुलगा आर्यन खानला अटक! पहा Video SaamTvNews
Published On

मुंबई : मुंबईहून गोव्याला जाणाऱ्या क्रूझ जहाजावर चाललेल्या ड्रग्ज पार्टीवर NCB विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्यासह अधिकाऱ्यांनी काल रात्री केलेल्या छापेमारीत बॉलिवूडचा किंगखान शाहरुखचा मुलगा आर्यन खानचा देखील समावेश असल्याचे समोर आले होते. नुकत्याच हाती आलेल्या वृत्तानुसार, मुंबईतील जेजे रुग्णालयात वैद्यकीय चाचणी पार पडल्यानंतर आर्यन खानला NCB कडून अटक करण्यात आली असून, थोड्याच वेळात त्याला कोर्टात हजर करण्यात येणार असल्याची सूत्रांकडून समोर आली आहे.

क्रूझवर चाललेल्या या ड्रग पार्टीत चरस, कोकेन आणि एमजी ड्रग्ज सारख्या अमली पदार्थाचे सेवन आर्यनसह इतर तरुण-तरुणींनी केल्याचे समोर आले आहे. एनसीबीने मुंबईहून गोव्याला जाणाऱ्या क्रूझ जहाजावर चालणाऱ्या ड्रग पार्टीवर छापा टाकला आणि दहा जणांना ताब्यात घेतले. एक वरिष्ठ पोलिस अधिकारीही या जहाजावर पार्टीत सहभागी होण्यासाठी आला होता.

Aaryan Khan : अखेर शाहरुखचा मुलगा आर्यन खानला अटक! पहा Video
Breaking : पक्षप्रवेशापुर्वीच साबणेंना भाजपची उमेदवारी; प्रदेशाध्यक्षांनी केले ट्विट!

क्रूझवर आठ तासांहून अधिक काळ हा छापा सुरू होता. ही क्रूझ मुंबई सोडून समुद्रात पोहोचताच ड्रग्ज पार्टी सुरु झाली. मात्र, या ड्रग्ज पार्टीची कुणकुण या पूर्वी NCB ला लागल्याने NCBच्या टिमने क्रूझवर सापळा रचला होता. पार्टीत ड्रग्ज सेवन केलं जात असल्याचं लक्षात आल्यानंतर ही पार्टी थांबवून क्रूझ पून्हा मुंबई पोर्टवर घेण्यात आलं.

Edited By : Krushnarav Sathe

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com