Public Holiday Saam Tv
महाराष्ट्र

Public Holiday: गुरुवारी राज्यातील सर्व शाळा अन् बँका बंद; कारण काय?

Bank Holiday Tommorrow 19th February: उद्या राज्यातील सर्व बँका आणि शाळांना सुट्टी असणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

Siddhi Hande

उद्या महाराष्ट्रातील बँका बंद

छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त सुट्टी

या सर्व्हिस राहणार सुरु

उद्या राज्यातील सर्व बँका बंद राहणार आहे. त्यामुळे तुमचे जर तुमचे बँकेत काही काम असेल तर आजच जा. उद्या तुम्हालाही बँकेच्या शाखेत जाऊन काम करता येणार नाहीये. १९ नोव्हेंबर रोजी छत्रपती शिवाजी महाराज जयंती आहे. त्यानिमित्त राज्यातील बँकांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. बँकांसोबतच शाळादेखील बंद असणार आहेत.

उद्या बँका बंद (Bank Holiday Tommorrow 19th February In Maharashtra)

महाराष्ट्राचे आराध्यदैवत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांची उद्या १९ फेब्रुवारी रोजी जयंती आहे. महाराजांच्या जयंतीनिमित्त सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे. फक्त बँका नव्हे तर शाळांनादेखील उद्या सुट्टी असणार आहे. त्यामुळे बँकेत काही काम असेल तर उद्या जाऊ नका.

या सेवा सुरु

बँका बंद असल्या तरीही ऑनलाइन सर्व्हिस सुरु राहणार आहे. ऑनलाइन बँकिंग, नेटबँकिंग, यूपीआय अॅप सुरु राहणार आहे. याचसोबत NEFT आणि RTGS सेवा सुरु राहणार आहे. याचसोबत एटीएम सेवादेखील सुरु राहणार आहे. परंतु तुमचे कॅश डिपॉझिट, चेक क्लिअरन्स अशी कामे असतील तर ती होणार नाहीत. ही कामे तुम्हाला बँकेत जाऊन करायची आहेत.

पुढच्या आठवड्यात बँकांच्या सुट्ट्यांची यादी (Bank Holiday in February Last Week)

१९ फेब्रुवारी- छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त महाराष्ट्रात सुट्टी

२० फेब्रुवारी- राज्य स्थापना दिनानिमित्त मिझोराम आणि अरुणाचल प्रदेशमध्ये बँका बंद असणार आहे.

२२ फेब्रुवारी- रविवारनिमित्त बँका बंद

२८ फेब्रुवारी- चौथा शनिवार असल्याने देशातील सर्व बँका बंद असणार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: पंढरपुरात भीषण अपघात, तिघेजण जखमी

Nauvari Saree Hairstyles: नऊवारी साडीवर 5 मिनिटांत करा केसांची स्टाईल, मराठमोळा लूक उठून दिसेल

Siddharth Malhotra: 'तुम्ही नेहमीच माझ्यासोबत...'; वडिलांच्या निधनानंतर सिद्धार्थ मल्होत्राची पहिली भावनिक पोस्ट

VIDEO: चिमुकल्याच्या कानात तीव्र वेदना, पालकही गोंधळले...; मशीनने तपासल्यावर डॉक्टरही झाले शॉक!

Vastu Tips: तुमच्या किचनमध्ये चुकूनही अशा टाईल्स वापरू नका; घरात कलह होण्याची वाढते शक्यता

SCROLL FOR NEXT