Manasvi Choudhary
शिवजंयती उत्सव म्हंटला की, महिला व पुरूष पारंपारिक पोशाख करतात. महिला खास नऊवारी साडी लूक करतात.
नऊवारी साडीवर महिला दागिने, केसांची स्टाईल करत मराठमोळा लूक करतात. यासाठी आज आम्ही तुम्हाला नऊवारीसाडीवर सुंदर दिसणाऱ्या केसांच्या स्टाईल सांगणार आहोत.
कोणत्याही रंगाच्या नऊवारी साडीवर तुम्ही पारंपारिक स्टाईल अंबाडा बांधू शकता. त्यावर तुम्ही गजरा लावा यामुळे लूक फारच सुंदर दिसतो.
केसांचा खालच्या बाजूला सैलसर अंबाडा बांधा. पुढच्या बाजूने काही बटा सोडा असा लूक थोडा मॉडर्न दिसतो.
जर तुमचे केस खूप लांब असतील, तर वरून सागर वेणी घालत खाली या किंवा साधी तीन पदरी वेणी घाला. वेणीच्या प्रत्येक वळणावर लहान फुले किंवा 'मणी' लावा.
ठणी किंवा सिल्कच्या नऊवारीवर तुम्ही केसांची खजुरी वेणी घाला यावर तुम्ही गुलाबाचे फूल देखील लावू शकता.
पुढच्या केसांचा थोडा पफ काढून तुम्ही मागे अंबाडा बांधा यामुळे तुमचा लूक रॉयल दिसतो.