Lagnanantar Hoilach Prem Saam Tv
मनोरंजन बातम्या

Lagnanantar Hoilach Prem: काव्याच्या हातून दिवा पडला अन् पार्थ…; 'लग्नानंतर होईलच प्रेम'च्या नवीन प्रोमोवर नेटकऱ्यांचा संताप

Lagnanantar Hoilach Prem Marathi Serial: स्टार प्रवाहवरील लोकप्रिय मालिका ‘लग्नानंतर होईलच प्रेम’ सध्या चर्चेत आली आहे. मालिकेच्या नवीन प्रोमोमुळे सोशल मीडियावर नेटिझन्सनी संताप व्यक्त केला आहे.

Shruti Vilas Kadam

Lagnanantar Hoilach Prem: स्टार प्रवाहवरील लोकप्रिय मालिका ‘लग्नानंतर होईलच प्रेम’ सध्या चर्चेत आली आहे. मालिकेच्या नवीन प्रोमोमुळे सोशल मीडियावर नेटिझन्सनी संताप व्यक्त केला आहे. ‘लग्नानंतर होईलच प्रेम’ या मालिकेच्या नवनवीन प्रोमोमध्ये दाखवण्यात आलेल्या पार्थ गंभीर जखमी असून रुग्णालयात मरणाशी झुंज देत आहे आणि त्याला वाचवण्यासाठी त्याची बायको काव्या मंदिरात १०१ दिवे लावण्यासाठी आणि त्याच्यासाठी प्रार्थना करते.

प्रोमोमध्ये आणखी एक वळण येते तेव्हा मानिनी काव्याला सांगते की “पार्थसाठी १०१ दिवे लाव”, आणि दिव्यांच्या लॉजिकवर आधारित काही संवाद दाखवले जातात. याच प्रसंगामुळे काही प्रेक्षकांनी या प्रोमोवर टीका केली आहे. मालिकेने मेडिकल डिग्रीचा अपमान केला असल्याचे बोलले जातं आहे.

एक प्रेक्षकाने कमेंट केला, “यांच्या डॉक्टरांच्या डिग्री चेक करायला पाहिजेत, एकाने लिहीले, या दिव्याच्या लॉजिकच्या नादात मेडिकल डिग्रीला व्हेंटिलेटर लावायची वेळ आलीये.” एका नेटकऱ्याने लिहीले किती ओव्हररिएक्ट” तर, आणखी एकाने लिहीले, काय आहे हे किती ओव्हररिएक्ट कराव."

सोशल मीडियावर सध्या हा प्रोमो व्हायरल होत असून, #LagnanantarHoilachPrem या हॅशटॅगखाली टीका आणि चर्चा दोन्ही रंगल्या आहेत. काही नेटकरी ट्रोल तर काही नेटकरी मालिकेचे कौतुक करत आहेत आता येणाऱ्या भागात काय होईल हे या आठवड्यात संध्याकाळी 7 वाजता प्रेक्षकांना समजेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Silver Pooja Items Cleaning: दिवाळीपूर्वी घरीच स्वच्छ करा चांदीची भांडी, फक्त १० रूपयांच्या वस्तूने येईल चमक

पुणेकरांसाठी खूशखबर! १०० वर्षे जुन्या भुयारी मार्गाचे रूंदीकरण होणार, वाहतूक कोंडीतून लवकरच सुटका

Govind Pansare Case: मोठी बातमी! गोविंद पानसरे हत्या प्रकरणी तावडेंसह 3 आरोपींना जामीन मंजूर|VIDEO

Bihar Election: बिहार निवडणुकीसाठी भाजपकडून ७१ उमेदवारांची पहिली यादी जाहीर, ९ महिलांना संधी

मला टार्गेट करा, पण त्याला सोडा; २३ वर्षीय हर्षित राणाच्या ट्रोलिंगवर भडकला गौतम गंभीर

SCROLL FOR NEXT