A still from the viral video showing the youth running on the railway bridge after jumping from a moving train. Saam Tv
व्हायरल न्यूज

धावत्या रेल्वेतून उडी मारली अन् उंच पुलावर पळू लागला; तरुणाचा संताप आणणारा व्हिडिओ व्हायरल

Dangerous Stunt Video: धावत्या रेल्वेतून उतरून उंच पुलावर पळालेल्या तरुणाचा व्हिडीओ सध्या प्रचंड व्हायरल झाला आहे. हा प्रकार पाहून सोशल मीडियावर संताप व्यक्त होत आहे. तुम्हीही तरुणाचा हा व्हिडिओ एकदा पाहाच.

Tanvi Pol

Trending Viral Video: सोशल मीडियावर दररोज अनेक प्रकारचे व्हिडिओ व्हायरल होत असतात. काही मनोरंजनासाठी असतात, तर काही व्हिडिओ स्टंटबाजीचे असतात. असाच एक धक्कादायक आणि संतापजनक व्हिडिओ सध्या चर्चेत आहे. एका तरुणाने धावत्या रेल्वेच्या दरवाजातून उडी मारली नाही, पण अजूनच धोकादायक कृत्य करत उंच पुलावरून धावत जाण्याचा प्रकार केला आहे. हा प्रकार पाहून लोक त्यावर संताप व्यक्त करत आहेत.

काय आहे व्हिडीओमध्ये?

व्हायरल (Viral) व्हिडिओमध्ये दिसतंय की, एक तरुण रेल्वेच्या दरवाजाजवळ उभा आहे. रेल्वे वेगात धावत असून ती एका उंच पुलावरून जात आहे. अचानक तो तरुण दरवाजातून अंग बाहेर काढतो आणि रेल्वे रुळांच्या कडेला असलेल्या अरुंद पुलाच्या कडेवरुन धावू लागतो. हा तरुण ज्या ठिकाणी धावत आहे, ती जागा इतकी अरुंद आहे की, तिथून थोडीशी चूक झाली तर तो थेट पुलावरून खाली कोसळू शकतो. पुलाखाली खोल दरी आहे. तरीदेखील त्याच्या चेहऱ्यावर कुठलाही भीतीचा लवलेश नाही.

या व्हिडीओनंतर लोकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. अनेक यूजर्संनी म्हटलं आहे की, ''हा तरुण केवळ सोशल मीडियावर व्हायरल होण्यासाठी आणि लाईक्ससाठी आपला जीव धोक्यात घालत आहे'' तर काही जणांनी याला ''स्टंट'' (Stunt) म्हटले, तर काहींनी ''अगदी मूर्खपणा''. काही नेटकऱ्यांनी थेट रेल्वे प्रशासनाकडे या तरुणावर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

हा प्रकार नक्की कोणत्या राज्यातील आहे ते अद्याप समजू शकले नाही. पण गेल्या २ दिवसांपूर्वी हा व्हिडिओ इन्स्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील sorry.sirji या अकाउंटवर अपलोड करण्यात आलेला आहे. व्हिडिओ अपलोड होताच तब्बल १ लाखांहून अधिकचे लाईक्स आणि मोठ्या प्रमाणात याला व्ह्यूज मिळालेले आहेत. ऐवढेच नाही तर या व्हिडिओला काही यूजर्संनी फेसबूक, एक्स(ट्वीटर) अशा विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर केले आहे.

टीप: हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sanjay Shirsat : सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचं वक्तव्य चर्चेत

Pune Crime : कॅफेमधील 'ते' फोटो व्हायरल करण्याची धमकी; ब्लॅकमेलिंगला कंटाळून २२ वर्षीय तरुणीची आत्महत्या

Maharashtra Live News Update : समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, उभ्या ट्रकला दुसऱ्या ट्रकची मागून धडक, एक ठार

ना पाणी - ना जेवण, फक्त बिअर, बायकोसोबत डिव्होर्स अन् दुरावा सहन झाला नाही; शेवट झाला भयानक

Avika Gor: बालिका वधूचा 'आनंदी'चा हटके लूक पाहिलात का?

SCROLL FOR NEXT