Rajasthan Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Hit and Run Video: भरधाव कारच्या धडकेत तरुण 20 फूट उंच हवेत उडाला, थरारक CCTV व्हिडिओ आला समोर

Rajasthan Viral Video: हिट अँड रनचा एक थरारक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओत भरधाव कारच्या धडकेत तरुण 20 फूट उंच हवेत उडाला आणि रस्त्याच्या कडेला फेकला गेल्याच दिसत आहे.

Satish Kengar

राजस्थानमधून एक थरारक व्हिडिओ समोर आला आहे. हा व्हिडिओ पाहून तुमच्या अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही. या व्हिडिओत भरधाव कारच्या धडकेत तरुण 20 फूट उंच हवेत उडाला आणि रस्त्याच्या कडेला फेकला गेल्याच दिसत आहे.

राजस्थानमधील धौलपूर जिल्ह्यातील कौलारी पोलीस स्टेशन हद्दीतील बसैनवाब शहरातील मनियान रोडवर हा अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. कारच्या धडकेत तरुण गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळत आहे.

सध्या तरुणाची प्रकृती चिंताजनक असल्याचं सांगण्यात येत आहे. दरब सिंह, असं अपघातात जखमी झालेल्या तरुणाचे नाव असून तो नागला हरलाल गावातील रहिवासी आहे. दरब सिंह गेल्या बुधवारी पायीच आपल्या घरी परतत होता. यावेळी तो रास्ता ओलांडत असताना त्याच क्षणी भरधाव वेगाने येत असलेल्या कारने त्याला जोरदार धडक दिली.

ही धडक इतकी भीषण होती की, तो 20 फूट उंच हवेत उडाला आणि रस्त्याच्या कडेला जाऊन पडला. यात तो गंभीर जखमी झाला आहे. कारला येताना पाहून तो वाचण्याचा प्रयत्न करत होता, मात्र कारचा वेग इतका जास्त होता की, त्याला काहीच करता आलं नाही आणि कारने त्याला धडक दिली.

दरम्यान, या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आला आहे. जो आता सोशल मीडियावरही व्हायरल होत आहे. घटनेनंतर कारस्वार भरधाव वेगात गाडी चालवत घटनास्थळावरून पळून गेल्याच सांगण्यात येत आहे. सध्या या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी कारस्वाराचा शोध सुरू केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shukra Gochar 2024: नोव्हेंबर अखेरीस शुक्राचं नक्षत्र गोचर वाढवणार डोकेदुखी; आर्थिक हानी होण्याचा धोका

Air Pollution : राजधानीची हवा अत्यंत विषारी! शाळा बंद, वाहनांना बंदी, दिल्लीमध्ये अनेक निर्बंध

Weather Update : थंडीची चाहूल, कमाल अन् किमान तापमानात घट

Assembly Election: साकोलीचं महाभारत ! जातीय समीकरण कुणाच्या पथ्यावर? पटोलेंपुढे अविनाश ब्राह्मणकरांचं आव्हान

Horoscope Today : काहींना नको असलेल्या गोष्टींचा होईल त्रास, तर कोणाचे शत्रू काढतील डोके वर, वाचा तुमचे आजचे राशिभविष्य

SCROLL FOR NEXT