lagnacha porga fukat Saam TV
व्हायरल न्यूज

Viral Video: लग्नाचा पोरगा फुकट! कपडे, भांड्यासह तरुणाचं घरजावई पॅकेज Viral

Ruchika Jadhav

Marriage Offer Viral Video:

सध्याच्या युगात सर्वच मुली सुशिक्षित आहेत. मुली शिकत असल्याने त्यांना आपल्या तोडीसतोड आणि बक्कळ पैसे कमवणारा मुलगा हवा असतो. या सर्वांत ज्या मुलांना घर, संपत्ती आणि बड्या पगाराची नोकरी नसेल तर मुलगी मिळणं फार कठीण झालं आहे. लग्नाला मुलगी मिळत नसल्याने एका तरुणाने घरजावई व्हायची भलतीच शक्कल लढवली आहे.

घर जावई होणारा हा तरुण आता सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, हा तरुण रस्त्याच्या कडेला बाजारात एका ठिकाणी सतरंजी टाकून बसला आहे. आपलं लग्न ठरावं आणि मुलगी मिळावी यासाठी तरुण 'लग्नाचा पोरगा फुकट' असं जोरजोरात बोलत आहे. भाजी विक्रेते ज्या पद्धतीने ओरडुन आपल्या भाजीची माहिती देतात, जाहिरात करतात अगदी तशाच पद्धतीने हा तरुण स्वतःला विकातोय की काय? असा प्रश्न व्हिडीओ पाहिल्यावर तुम्हालाही पडेल.

लग्नासाठी मुलगी मिळत नसल्याने हा तरुण फार हताश झालेला दिसतोय. घरजावई म्हणून कोणीतरी आपली निवड करावी यासाठी त्याने त्याला येत असलेली कामे देखील सांगितली आहेत. भांडी, कपडे, लादी अशी सर्व कामे मला येतात असं तो सांगत आहे. घरजावई म्हणून मी राहणार यासाठी काही हरकत नाही आणि सगळी कामे देखील करणार असं तो म्हणत आहे.

लग्नाळू मुलाचा हा व्हिडीओ @marathicomedyshorts या इंस्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट करण्यात आलाय. व्हिडीओ गरजू व्यक्तीला पाठवा असं कॅप्शन व्हिडीओला देण्यात आलं आहे. सोशल मीडियावर हा व्हिडीओ सध्या जोरदार व्हायरल होत आहे.

नेटकऱ्यांनी या व्हिडीओवर भन्नाट प्रतिक्रिया दिल्यात. अनेक तरुणांनी या व्हिडीओवर आपल्या मनातील गोष्टी व्यक्त केल्यात. लग्नात मुलगी फार कमवत नसली तरी देखील मुंबईत मुलाकडे स्वतःच घर पाहिजे. शिवाय गावी शेती करत नसला तरी देखील त्याच्याकडे गावी जमीन पाहिजे. चांगल्या पगाराची नोकरी पाहिजे अशा अनेक अटी मुलींच्या असतात, असं काही तरुणांनी म्हटलंय. तर काही तरुणांनी या व्हिडीओवर हसण्याचे ईमोजी पाठवले आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shukraditya Rajyog: सूर्य-शुक्राच्या युती बनला शुक्रादित्य राजयोग; 'या' राशींच्या सर्व इच्छा होणार पूर्ण

Maharashtra Politics : महायुतीसाठी २०९ जागांवर अनुकूल वातावरण, शिवसेनेच्या सर्व्हेक्षणातून दावा

Maharashtra Weather: गणेश विसर्जनानंतर राज्यात पावसाची एन्ट्री! आज 'या' भागात बरसणार, हवामान खात्याचा अंदाज; वाचा सविस्तर...

Today Horoscope : जुना अबोला मिटेल,घरात उत्साहाचे वातावरण राहील; वाचा आजचे राशीभविष्य

Horoscope Today : आज विनाकारण शत्रुत्व ओढवून घ्याल, दानधर्मासाठी खर्च कराल; वाचा तुमच्या नशिबात आज काय लिहिलंय?

SCROLL FOR NEXT