व्हायरल न्यूज

Viral Video: बापरे...जीवघेणा स्टंट! तरुणाने चक्क पाण्यात जाऊन मासे नाही तर मगरीला पकडले, VIDEO व्हायरल

Shocking Video: सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे, ज्यात एक व्यक्ती पाण्यात उतरून निर्धास्तपणे मगरीशी झुंज देत तिला पकडताना दिसतो, आणि त्याला कोणतीही भीती नाही.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मगरींना नेहमीच मानवांसाठी धोकादायक मानले जाते. संधी मिळाल्यास ते हल्ला करून जीवघेणा धोका निर्माण करू शकतात. त्यामुळेच लोक मगरींना पाहताच पळून जातात. मात्र, काही लोक धाडस करून या प्राण्यांच्या जवळ जातात आणि त्यांना पकडण्याचाही प्रयत्न करतात. असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत आला आहे, जो पाहून अनेकांना धक्का बसला आहे.

या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती मगरीच्या दिशेने धावत जाताना दिसतो आणि काही क्षणांतच त्याला पकडतो. गंमतीची बाब म्हणजे मगरच या व्यक्तीला पाहून घाबरते आणि पळून जाण्याचा प्रयत्न करते. व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसते की हा माणूस बोटीवरून खाली उतरतो आणि हळूहळू मगरीकडे सरकतो. मगरीला काहीतरी संशय येताच ती वळून पळू लागते, पण त्या व्यक्तीने तिचा पाठलाग करून तिला गाठले. त्याने इतक्या घट्ट पकडले की मगरीला सुटणे अवघड झाले. त्याने थेट तिच्या गळ्यावर पकड बसवली होती.

या धाडसी प्रयत्नात मात्र त्याला हातापायांवर किरकोळ दुखापत झाली आणि थोडे रक्तही वाहू लागले. हा धाडसी व्यक्ती म्हणजे माइक होल्स्टन, जो एक प्रसिद्ध प्राणी तज्ञ म्हणून ओळखला जातो. हा थरारक व्हिडिओ इन्स्टाग्रामवरील therealtarzann या आयडीवरून शेअर करण्यात आला आहे. आतापर्यंत २९ दशलक्षांहून अधिक म्हणजेच तब्बल २.९ कोटी वेळा हा व्हिडिओ पाहिला गेला असून, १५ लाखांहून अधिक लोकांनी त्याला लाईक केले आहे.

सोशल मीडियावर या व्हिडिओला पाहून लोकांच्या प्रतिक्रिया मिश्र आहेत. काहींनी कौतुक करून त्याला खरा शूरवीर म्हटले आहे. एका यूजर्सने लिहिले की, ही खरी ताकद आहे. तर दुसऱ्या यूजर्सने माइकच्या कृतीवर नाराजी व्यक्त केली आहे. त्याचे म्हणणे आहे की, ही कृती मगरींसाठी धोकादायक आहे. गोड्या पाण्यातील मगरी तणावग्रस्त होतात आणि अशा तणावामुळे त्यांचा मृत्यूही होऊ शकतो. खरा संशोधक किंवा मगरींचा अभ्यास करणारा तज्ञ नेहमी प्राण्यांचा ताण कमी करण्याचा प्रयत्न करतो. हा व्हिडिओ संवर्धनासाठी नसून फक्त मानवी अहंकाराचे प्रदर्शन आहे. प्राण्यांना अनावश्यकपणे पकडू नका.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

The Bengal Files OTT Release : थिएटरनंतर पल्लवी जोशीचा 'द बंगाल फाइल्स' ओटीटीवर कधी येणार? वाचा अपडेट

Maharashtra Live News Update: अन्यथा दसरा मेळाव्याला मोठा निर्णय घ्यावा लागेल- मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा

Jamner Accident : भरधाव डंपरने तरुणाला चिरडले; संतप्त ग्रामस्थांचा मृतदेहासह रास्ता रोको

Ashwini Kedari: PSI मध्ये मुलींमध्ये पहिली, IAS होण्याचं स्वप्न पण अश्विनी केदारींवर काळाचा घाला, अवघ्या ३०व्या वर्षी मृत्यू

सचिन तेंडुलकर बीसीसीआयचा अध्यक्ष होणार? कारणही आले समोर आले

SCROLL FOR NEXT