World Cup Trophy Sand Art Video:  Saamtv
व्हायरल न्यूज

Viral Video: लेहरा दो तिरंगा! ५६ फुटांची वर्ल्डकप ट्रॉफी... वाळूशिल्प साकारत टीम इंडियाला खास शुभेच्छा; VIDEO

World Cup Trophy Sand Art Video: सुदर्शन पटनायक यांनी 500 स्टीलचे बाऊल आणि 300 क्रिकेट बॉल्स वापरून वर्ल्ड कप ट्रॉफीचे वाळू शिल्प तयार केले आहे.

Gangappa Pujari

56 Feet World Cup Trophy Video:

करोडो भारतीयांसाठी आजचा दिवस ऐतिहासिक ठरणार आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील टीम इंडिया विश्वविजयी होण्यासाठी सज्ज झालीय. विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात भारतीय संघ बलाढ्य ऑस्ट्रेलियाशी दोन हात करेल. देशभरातून टीम इंडियाच्या विजयासाठी प्रार्थना केल्या जात आहेत. मुंबईतील प्रसिद्ध वाळू कलाकार सुदर्शन पटनायक यांनी खास शिल्प साकारून भारतीय संघाला शुभेच्छा दिल्यात.

विश्वचषक (World Cup 2023) उंचावण्यासाठी भारतीय संघावर (Team India) देशभरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. प्रसिद्ध वाळू कलाकार सुदर्शन पटनायक यांनी सँड आर्ट बनवून भारतीय संघाला शुभेच्छा दिल्या आहेत. सुदर्शन पटनायक (Sudarshan Patnaik) यांनी 500 स्टीलचे बाऊल आणि 300 क्रिकेट बॉल्स वापरून वर्ल्ड कप ट्रॉफीचे वाळूचे शिल्प तयार केले आहे. ही ट्रॉफी अंदाजे 56 फूट लांब आहे.

हे सुंदर वाळूशिल्प साकारण्यासाठी त्यांना सुमारे सहा तास लागले. या कामात त्यांच्या सॅण्ड आर्ट इन्स्टिट्युटच्या विद्यार्थ्यांनीही हे चित्र पूर्ण करण्यास त्यांना मदत केली. वाळूत ‘गुड लक टीम इंडिया’ या शब्दांतील शुभेच्छा इंग्रजी भाषेतील चेंडूंनी लिहिली आहे. विविध रंगांच्या सजावटीद्वारे ही खास कलाकृती खूपच सुंदर दिसत आहे.

या सुंदर कलाकृतीचा व्हिडिओ त्यांनी आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केला आहे. लेहरा दो तिरंगा हे गाणी लावून त्यांनी शेअर केलेला व्हिडिओ सध्या क्रिकेटप्रेमींचे लक्ष वेधत आहे. दरम्यान, सुदर्शन पटनायक सुप्रसिद्ध वाळू कलाकार आहेत. कला क्षेत्रातील त्यांच्या योगदानाबद्दल त्यांना २०१४ मध्ये भारत सरकारने ‘पद्मश्री’ पुरस्काराने सन्मानित केले आहे. (Latest Marathi News)

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Aadhaar Card Update: आधार कार्ड मोफत अपडेट करा; मुदत वाढली; शेवटची तारीख कधी?

Maharashtra Weather Update : दुपारी उन्हाचा चटका, पहाटे गारठा, वाचा राज्यातील हवामानाचा अंदाज

IRCTC App: रेल्वे प्रवाशांचं काम झटक्यात अन् सोपं होणार, तिकीट बुकिंगपासून सगळ्या सुविधा एकाच अ‍ॅपवर

मोठी कारवाई! अमरावतीमध्ये तब्बल ६ कोटींचे सोनं-चांदी जप्त, नागपूरवरुन निघालेल्या गाडीत सापडले घबाड!

Maharashtra Election : ऐन निवडणुकीत बेधडक कारवाई, एकनाथ शिंदेंनी बंडखोर महेश गायकवाड यांच्यासह १० जणांची केली हकालपट्टी!

SCROLL FOR NEXT