Propose in Flight Video Saam TV
व्हायरल न्यूज

Propose in Flight Video : माझ्याशी लग्न करशील का? तरुणीनं थेट विमानात बॉयफ्रेंडला केलं प्रपोज, रोमँटीक VIDEO तुफान व्हायरल

Woman Proposes Boyfriend in Aeroplane Video Viral : प्रपोज करताना काही जण अगदी फिल्मी स्टाईलने सुद्धा मनातील गोष्ट व्यक्त करतात. सध्या सोशल मीडियावर असाच एक खास आणि रोमँटीक व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

Ruchika Jadhav

प्रेम व्यक्त करणे, लग्नासाठी विचारणे या प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यातील फार खास गोष्टी असतात. आपल्या आयुष्यातील सर्वात सुंदर आणि स्पेशल क्षण अनेक व्यक्ती विविध पद्धतीने सेलिब्रेट करतात. प्रपोज करताना काही जण अगदी फिल्मी स्टाईलने सुद्धा मनातील गोष्ट व्यक्त करतात. सध्या सोशल मीडियावर असाच एक खास आणि रोमँटीक व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

प्रेमाच्या भावना दोघांच्या मनात असल्या तरी सहसा प्रपोज करण्याचं धाडस मुलंच करतात. मुलं आपल्या मनातील भावना व्यक्त करत मुलीला प्रपोज करतात. मात्र एका तरुणीने स्वत:तिच्या प्रियकराला सर्वांसमोर प्रपोज केलं आहे. तसेच तू माझ्याशी लग्न करणार का? हे विचारलं आहे. याच घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय.

ऐश्वर्या असं या तरुणीचं नाव आहे. तिने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर हा व्हिडिओ पोस्ट केला आहे. व्हिडिओमध्ये दिसत आहे की, तरुण सुरुवातीला विमानात येतो आणि त्याच्या सिटवर बसतो. त्यानंतर तरुणी सुद्धा विमानात प्रवेश करते. ती त्याच्याकडे पाहून गोड स्माईल देत समोर येते. त्यानंतर व्हिडिओ थोडा कट करण्यात आला आहे.

व्हिडिओमध्ये पुढे दिसत आहे की, तरुण विमानात समोर उभा आहे. तो उभा राहताच विमानात रोमँटीक म्यूजिक सुरू होतं. तसेच समोर बसलेले अन्य चार प्रवाशी आपल्या हातात माझ्याशी लग्न करणार का? असं लिहिलेलं पोस्टर घेऊन उभे राहतात. तर त्याचवेळी तरुणी आपले दोन्ही गुडघे खाली टेकवून त्याला प्रपोज करते. हे सर्व पाहून तरुण फार खुश होतो. तो तरुणीला नक्कीच मी तुझ्याशी लग्न करणार, असं म्हणतो.

सोशल मीडियावर @aishwaryabansal_ या इंस्टाग्राम अकाउंटवर हा व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे. सध्या हा व्हिडिओ तुफान व्हायरल होतोय. व्हिडिओ पोस्ट करत तरुणीने कॅप्शनमध्ये आपल्या मनाती आनंद व्यक्त केला आहे. तसेच इंडिगो फ्लाइटने सहकार्य केल्याबद्दल त्यांचे आभार मानले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Todyas Horoscope: 'या' राशींना नवीन संधी आणि वाटा सहज उपलब्ध होतील, वाचा राशीभविष्य

Maharashtra Live News Update: अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून नगर परिषदेसाठी पहिला उमेदवार जाहीर

Pune : पुणे-मुंबईत लाखो कोटींचा जमीन घोटाळा? सत्ताधारी-बिल्डरांच्या अभद्र युतीतून भ्रष्टाचार

Sulakshana Pandit Death: बॉलिवूडच्या प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्रीचं निधन, चित्रपटसृष्टीवर शोककळा

हे तुम्हाला दाखवण्यासाठीच...; मुलीच्या महागड्या साखरपुड्यावरून टीकाकारांना कीर्तनकार इंदोरीकर महाराजांचं उत्तर

SCROLL FOR NEXT