Girl Marriage Age: १८ नव्हे तर २१ वर्षी मुलींना करता येणार लग्न; हिमाचल प्रदेशात विधेयक पारित; महाराष्ट्रात किती आहे लग्नाच वय?

Girl Marriage Age Bill: हिमाचल प्रदेशातील विधानसभेत मुलींच्या लग्नाविषयी विधेयक मांडण्यात आले. लग्नासाठी मुलीचं वय किती असावं यासंदर्भात नवा कायदा बनवण्यात आलाय. राज्यात आतापर्यंत मुलींचे लग्नाचे किमान वय १८ वर्षे होतं. आता राज्य सरकारने यात बदल केलाय.
Girl Marriage Age: १८ नव्हे तर २१ वर्षी मुलींना करता येणार लग्न; हिमाचल प्रदेशात विधेयक पारित; महाराष्ट्रात किती आहे लग्नाच वय?
Published On

हिमाचल प्रदेशात मुलींच्या लग्नाच वयासंदर्भात नवा कायदा पास करण्यात आलाय. राज्यातील मुलींचे वय १८ वरून आता २१ वर्ष करण्यात आले आहे. यासाठी सरकारने विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात 'हिमाचल प्रदेश बालविवाह प्रतिबंध विधेयक- २०२४ सादर केले. हे विधेयक चर्चेविनाच एकमताने मंजूर करण्यात आले. आता हे विधेयक राज्यपालांकडे मंजुरीसाठी पाठवण्यात येणार आहे. हिमाचल प्रदेशात आतापर्यंत मुलींचे लग्नाचे वय १८ वर्षे आहे. विधेयकाला राज्यपालांची मंजुरी मिळाल्यानंतर मुलींच्या लग्न वयात वाढ होणार आहे.

आरोग्य, सामाजिक न्याय आणि अधिकारिता मंत्री धनीराम शांडिल यांनी बालविवाह प्रतिबंध (हिमाचल प्रदेश सुधारणा विधेयक, २०२४) सादर केले. सध्या राज्यात मुलींचे लग्नाचे किमान वय १८ वर्षे आहे. राज्य सरकार त्यात तीन वर्षांनी वाढ करत आहे. त्याचा सुधारित मसुदा राज्य मंत्रिमंडळाने ७ महिन्यांपूर्वी मंजूर केला होता. हे दुरुस्ती विधेयक मंगळवारी सभागृहात मंजूर करण्यात आले.

विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात मुख्यमंत्री सुखविंदर सिंग सुखू म्हणाले की, आमच्या सरकारने कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई केलीय. हिमाचल प्रदेशात गुन्हेगारीला जागा नाही. सभागृहात अर्थपूर्ण चर्चेसाठी सरकारची पूर्ण तयारी आहे, मात्र विरोधक त्यापासून पळ काढत आहेत. दिशाहीन विरोधकांकडे कोणताही ठोस मुद्दा नसल्याचं मुख्यमंत्री सुखू म्हणालेत.

जेव्हा राज्यावर आपत्ती आली तेव्हा आमचे सरकार तातडीने मदत आणि मूलभूत सुविधा देऊन आपत्तीग्रस्तांना धीर दिला त्यांच्या पाठी उभे राहिले. उलट या कठीण काळातही केंद्र सरकारने कोणतीही मदत केली नाही. त्यांची ही भेदभावपूर्ण वृत्ती त्यांची असंवेदनशीलता दर्शवत असल्याचं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.

Girl Marriage Age: १८ नव्हे तर २१ वर्षी मुलींना करता येणार लग्न; हिमाचल प्रदेशात विधेयक पारित; महाराष्ट्रात किती आहे लग्नाच वय?
Girl Marriage Age: मुलींच्या लग्नाचं वय कमी होणार, लग्नाचं वय 9 वर्ष करण्यासाठी कायदा

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com