Delhi Metro Womens Fighting Saam TV
व्हायरल न्यूज

Delhi Metro Womens Fighting: आधी अंगावर पाणी ओतलं मग बुटाने धू धू धुतलं; दिल्ली मेट्रोत महिलांचा धिंगाणा

Women Fighting in Delhi Metro: महिलांच्या हाणामारीचेही बरेच व्हिडीओ व्हायरल झालेत. अशात आता समोर आलेल्या व्हिडीओने साऱ्यांचेच रेकॉर्ड मोडलेत.

Ruchika Jadhav

Delhi Metro News:

दिल्ली मेट्रोमध्ये आतापर्यंत इतके राडे झालेत की येथून एखादा चांगला व्हिडीओ समोर आल्यास सर्वांना नवलच वाटेल. दिल्ली मेट्रोत तरुणांचे स्टंट, कपल्स रोमान्स असे अनेक व्हिडीओ व्हायरल होतात. महिलांच्या हाणामारीचेही बरेच व्हिडीओ व्हायरल झालेत. अशात आता समोर आलेल्या व्हिडीओने साऱ्यांचेच रेकॉर्ड मोडलेत.

सोशल मीडियावर (Social Media) महिलांच्या हाणामारीचा थ्रिलर व्हिडीओ समोर आला आहे. यामध्ये एक महिला दुसऱ्या महिलेच्या अंगावर आपल्या बॉटलने पाणी ओतते. पाणी ओतल्यावर समोरची महिला या महिलेला मारण्यासाठी पुढे येते. यावेळी महिला थेट आपल्या पायातील बुट काढून हातात घेते. बुटांनी समोरच्या महिलेला मारण्यासाठी ती तिला आव्हान करते.

तू ये आता माझ्या समोर, बघतेच तुला असं ही महिला म्हणत आहे. अशात समोरची महिला देखील हो ये, कशी मारते ते बघतेच असं म्हणते. एकमेकींनी आव्हान करत या दोघीही हाणामारी करताना दिसत आहेत. या दोघी इतक्या आक्रमक झाल्यात की त्या कोणाचंही काहीच ऐकण्यास तयार नाहीत. मेट्रो ट्रेनमध्ये असलेल्या इतर महिला या दोघींना शांत बसण्यास आणि भांडण न करण्यास सांगत आहेत.

मात्र दोघीही कुणाचेच ऐकत नाहीत. दोघी एकमेकींना भीडतात. दिल्ली मेट्रोतून (Delhi Metro) प्रवास करताना सतत अशा गोष्टी घडतात की त्याने अन्य प्रवाशांचे चांगलेच मनोरंजन होते. @desi_mojito या इंस्टाग्राम अकाउंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. तसेच दिल्ली मेट्रोमध्ये आपलं स्वागत आहे, असंही या व्हिडीओवर लिहिण्यात आलं आहे.

यावर आलेल्या मजेशीर कमेंट्समध्ये एका तरुणाने लिहिलंय की, महिलांसाठी स्वतंत्र वेगळा डब्बा का दिलाय हे मला आता समजलं. दिल्ली मेट्रोत WWE सुरू आहे, असंही एकाने लिहिलंय. काही दिवसांनी सरकार आपल्याकडून दिल्ली मेट्रोतल्या या मनोरंजनाचे देखील पैसे घेईल, असंही एकाने कमेंटमध्ये म्हटलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: तुमसरमध्ये राजू कारेमोरे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

महाराष्ट्राचा महानिकाल, निवडणूक निकालाचं हेडक्वार्टर SAAM TV

Maharashtra Election Result : महाराष्ट्र कुणाचा? मतमोजणी कधीपासून आणि कुठे पाहाल?

SCROLL FOR NEXT