Women Dance Video: सोशल मीडियावर दररोज विविध व्हिडिओ व्हायरल होत असतात. बरेच व्हिडिओ मजेशीर असतात, तर काही व्हिडिओ पाहून अक्षरश: लोक थक्क होतात. सध्या असाच एक व्हिडिओ इंटरनेटवर धुमाकूळ घालत आहे. या व्हायरल व्हिडिओमध्ये काकूंनी बिलनची नागीण निघाली या गाण्यावर इतका जबरदस्त डान्स केला आहे की, लोक ते पाहून अक्षरश: शॉक झाले आहेत.
व्हायरल(Viral) होत असलेल्या व्हिडिओत अनेक महिला जबरदस्त एनर्जीने डान्स करताना दिसत आहेत. मात्र, त्यातील एक काकू नागीण स्टेप्स अगदी हटके अशा अंदाजात करत आहेत. इतकेच नाही तर काकूंनी अक्षरश: जमिनीवरही झोपून डान्स केलेला आहे. काकूंचा असा डान्स पाहून तेथील सर्वज अवाक झाले आहेत शिवाय उपस्थित असलेले सर्वजण टाळ्या आणि शिट्ट्या वाजवू लागले.
हा व्हिडिओ इन्स्टाग्राम या सोशल मीडियावर जबरदस्त व्हायरल होत असून तो फेसबूक आणि ट्विटरवरही शेअर करण्यात आलेला आहे. हा व्हिडिओ इन्स्टाच्या uttkeshwani या अकाउंटवर अपलोड करण्यात आलेला आहे. आतापर्यंत या व्हिडिओला लोकांनी हजारो लाईक्स केलेले आहेत तर लाखोंचे व्ह्यूज मिळालेले आहेत.
काकूंचा डान्स (Dance)व्हिडिओ पाहून बऱ्याचजणांना आपल्याही घरातील लग्नसमारंभात असा डान्स करण्याची इच्छा झाली असेल. ऐवढेच नाही तर व्हिडिओ पाहिल्यानंतर अनेक प्रतिक्रियाही आलेल्या आहेत. त्यातील एका यूजरने कमेंट केली,''बेस्ट नागीण डान्स'' तर दुसऱ्या यूजरने कमेंट केली,''तरुणाई फेल या डान्ससमोर'' तर अशा अनेक कौतुकास्पद प्रतिक्रिया आलेल्या आहेत.
टीप: काकूंचा हा डान्स व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.