Mallapuram Accident Video: केरळमधील मलाप्पुरम शहरातून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे, ज्यात चिमुकल्याच्या डोळ्यासमोरच त्याच्या आईला भरधाव वाहनाने उडवलं. या अपघातानंतर आईच्या देहाजवळ लहानग्याचा हंबरडा आणि टाहो पाहून उपस्थित सर्वजण सुन्न झाले. रस्त्यावर लावलेल्या सीसीटीव्हीमध्ये हा दुर्दैवी प्रसंग कैद झाला असून, तो सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.
व्हायरल(Viral) होत असलेल्या या घटनेत तुम्ही पाहू शकता, रस्त्याच्या कडेतून एक महिला तिच्या मुलासोबत चालत असते. रस्त्यावर वाहनांची आणि लोकांची जास्त गर्दीही नसते. मात्र, त्या वेळी रस्त्याच्या कडेवरुन जाणाऱ्या या महिलेला पाठून येणारी कार जोरदार धडक मारते आणि महिला काही अतरांवर जाऊन एका भितींला आदळते. यात तुम्ही पाहिले तर चिमुकल्याचा जीव धोडक्यात बचावला जातो.
आईला वाहनाने उडवल्यानंतर चिमुकला आईच्या दिशेने पळत जातो. संपूर्ण घटना घडल्यानंतर परिसरातील काही नागरिक महिलेच्या दिशेने धाव घेतात. विशेष म्हणजे ज्या वाहनाने महिलेला उडवलं होते तो कारचालकही वाहनातून बाहेर येतो आणि झालेला प्रकार पाहतच राहतो. सर्व घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालेली आहे.
हा व्हिडिओ @gharkekalesh या एक्स अकाउंटवर अपलोड करण्यात आलेला आहे. सोशल मीडियावरील हा व्हिडिओ (Video) पाहताच सर्वांना धक्का बसला आहे आणि त्यावर विविध प्रतिक्रिया दिलेल्या आहेत. त्यातील एका यूजरने कमेट केली,''अद्दल नसते का वाहन चालवताना'' तर दुसऱ्या यूजरने कमेंट केली,''यांना कायमसाठी वाहन चालवण्यासाठी बंदी आणली पाहीजे'' अशा अनेक संतापजनक प्रतिक्रिया आलेल्या आहेत.
टीप: अपघाताचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.