
Ahmedabad Fire Video: गुजरातच्या अहमदाबादमध्ये मंगळवारी एका बहुमजली इमारतीत आग लागली. आगीचा विळखा इतका वाढला की, पाचव्या मजल्यावर अडकलेल्या एका महिलेने आपला जीव वाचवण्यासाठी उडी मारली. मात्र, यानंतर नेमके काय घडले ते पाहण्यासाठी व्हायरल झालेला व्हिडिओ पाहा.
व्हायरल(Viral) होत असलेल्या घटनेत घडले असे की, इमारतीला आग लागली होती. सुरुवातील साधारण वाटणाऱ्या या आगीने रौद्र रुप धारण केले. दरम्यान या इमारतीच्या पाचव्या मजल्यावर एक महिला अडकली गेली. परंतू घरात झालेल्या आगीच्या लोटामुळे महिलेला बाहेर पडणे शक्य झाले नाही. अखेर महिलेने घराच्या खिडकीतून उडी मारली आणि खाली असलेल्या लोकांनी महिलेला दुखापत न होऊन देता वाचवले. दरम्यान ही घटना एका नागरिकाने मोबाईलमध्ये टिपली आणि सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.
काही वेळानंतर पोलीस आणि अग्निशमन विभागाने घटनास्थळी पोहोचून आग आटोक्यात आणली. इमारतीतील इतर रहिवाश्यांनाही सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले, पण या धाडसी महिलेचे सर्वांकडून कौतुक करण्यात येत असून सोशल मीडियावरही अनेक प्रतिक्रिया आलेल्या आहेत. त्यातील एका यूजरने कमेंट केली,''खूप भयंकर घडलं'' तर दुसऱ्या यूजरने कमेंट केली,''नशीब चांगले होते'' अशा अनेक प्रतिक्रिया आलेल्या आहेत.
@kathiyawadiii या एक्स सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर हा व्हिडिओ(Video) व्हायरल होत आहे. मात्र,अहमदाबादमधील या घटनेमुळे अपार्टमेंट्समधील सुरक्षा व्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. प्रत्येक वर्षी अशा दुर्घटनांमुळे अनेक निष्पाप जीव धोक्यात येतात. प्रशासनाने नियमितपणे सुरक्षा तपासणी करण्याचे धोरण राबवावे, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
टीप: महिलेचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.